मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग| कलि प्रभाव संत नामदेवांचे अभंग आत्मस्वरूपस्थिति उपदेश आत्मसुख भक्तवत्सलता १ श्रीचांगदेवांची समाधी ध्रुवचरित्र श्रीज्ञानेश्वरांची आदि कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना नाममहिमा संत नामदेव रचित गवळण द्रोणपर्व ह्माळसेन कथा करुणा श्रीकृष्णमाहात्म्य श्रीकृष्णलीला मुक्ताबाईची समाधी नामसंकीर्तन माहात्म्य श्रीनामदेव चरित्र श्रीनिवृत्तिनाथांची समाधी पंढरीमाहात्म्य पौराणिक चरित्रें प्रल्हाद चरित्र श्रीराममाहात्म्य रूपके श्रीज्ञानेश्वरांची समाधी श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा संतमहिमा संतचरित्रे शिवरात्रमाहात्म्य शुकाख्यान श्रीसोपानदेवांची समाधी सुदामचरित्र तीर्थावळी उपदेश विठाचे अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या भेट मागणें संतस्तुति जनाबाईचा निश्चय भाट आऊबाईचे अभंग लाडाईचा अभंग कलि प्रभाव संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल कलि प्रभाव Translation - भाषांतर १.ऐका कलियुगाचा धर्म । पुत्र सांगे पितयास काम । ब्राह्मन त्यजिती ब्रह्मकर्म । ऐसें वर्तमान मांडलें ॥१॥माया बहिणी दवडिती । स्त्री आपुली आणविती । ऐका ऐका नवल गती । अगा श्रीपति परियसा ॥२॥भार्या न करिती पतिची सेवा । नाहीं कवणा धर्माचा हेवा । वर्ततसे पापाचा ठेवा । अगा केशवा परीयेसी ॥३॥अरे वैराग्याच्या घराचारू । आणि संन्यासा मोह थोरू । संता बहुत अहंकारू । रुसणें नलगे कोणासी ॥४॥झाला कलीचा प्रवेशु । तुह्मा नामाचा विश्वासु । ह्लदयीं ह्लषिलेशु । विष्णु-दास नामा म्हणे ॥५॥२.ऐका कलियुगींचा आचार । अधर्मपर झाले नर ॥१॥मंचकावरी बैसे राणी । माता वाहतसे पाणी ॥२॥स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ॥३॥स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडीं ॥४॥सासुसासर्यां योग्य मान । मायबापा न घाली अन्न ॥५॥साळी सासवा आवडती । बहीणभावां तोंडीं माती ॥६॥स्त्रियेसी एकांतगोडी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥७॥म्हणे विष्णुदाम नामा । ऐसा कलियुगींचा महिमा ॥८॥३.कांहीं सांगोनि गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडुनं-दना । येथें राहतां पाविजे बंधना । थोर वर्तमान कलियुगीं ॥१॥ये कलिमाझारीं । पुत्र पित्याचे वैरी । घरची माता होय कामारी । पुरुषांतें नारी अव्हेरिती ॥२॥न येती वृक्षाफळें आटती धेनु । न पिके मही न वर्षे घनु । यापरी आटेल सकळ जनु । ऐसें जगज्जी-वनु बोलिले ॥३॥आणिक एक वर्तेल अपवित्र । ब्राह्मण सांडितील वेदमंत्र । आचार सांडूनि होती शूद्र । ऐसे अपवित्र कलियुगीं ॥४॥थोर वर्तमान पडेल काळु । चहूं वर्णांचा होईल एकचि मेळु । कोणी कोणाचा न धरिती विटाळु । मग गोपाळु निघते झाले ॥५॥आतां वेळोवेळां सांमों किती । मोडला धर्म झाली प्रवृत्ति । विष्णु-दास नामा येतो काकुळती । कैसेनि करूं भक्ति पंढरिराया ॥६॥४.गृहस्थ बैसला ओसरीवरी । गृहस्वाभिणी स्वयंपाक करी । तंव मार्गस्थ ब्राह्मण आला द्वारीं । अन्न द्यावें स्वामिया ॥१॥पडली कुर्हाड कपाळी । रागें सूप चाटू आफळीं । जळत काष्टातें हातीं कवळी । जैसी आसाळी गर्जतसे ॥२॥ब्राह्मणें घेतलें धरणें । तंव बाईलेसी गेला शरण । म्हणे माझ्या ग्रासांतून ग्रास देणें । लज्जा राखणें आजिची ॥३॥मग ह्मणे वो बाईल । कैंचा आलासे बईल । तुजसारिखा असेल । वैलसि बैल सोइरे ॥४॥गृहस्थें धरोनि वेणी । तिनें शेंडीत हात घालोनि । अंगजूठ होऊनि । बाईल हु-मण्या मारितसे ॥५॥त्याचे मागें सुटली शेंडी । सवेंचि धरि-लासे अंडीं । पहिली असे मुर्कुंडी । तोंडिच्या तोडीं मारी-तसे ॥६॥शेजारीं व्याही होता तो धांवला । येतांचि तोंडावरी मारिला । चौकीचा दांत पाडिला । केला बोचिरा व्याही तो ॥७॥आधींच व्याही होते रोडके । आणि हाणी तल्प-ठाण वईच्या बुडखे । निथळत निथळत बोडकें । घेऊनि सुडकें पुसितसे ॥८॥तिकडूनि धांवला मेहुणा । तोहि पाडिला उताणा । केला तिनें घोळाणा । तया मेहुण्याचा ॥९॥ब्राह्मणाकडे दांत रगडी । तंव ब्राह्मण हळु हळु पाय काढी । ओल्या धोतराची घडी । पळतां वेंगडी वळतसे ॥१०॥ऐसा ओलंडिला दारवंटा । तंव धाविन्नली पाठोवाटा । सीण घालून हाणिल्या बरोटा । कोठें थोटया पळसील ॥११॥ऐसा कलियुगीं स्त्रियांचा विचार । एक बुडविती बेताळीसनर एक दाविती स्वर्गीचें द्वार । नामा निरंतर विनवीतसे ॥१२॥५.पाप्या नावडे संतसंगति । लोभिया नावडे उदारवृति । व्व्यभिचारिणी नावडे पति । नावडे ज्योति उजियेडा ॥१॥चांदणें नाचडे तया चोरां । सावधान नावडे तया हेरां । सद्बुद्धि नावडे रांडपोरा । सत्य कुचरां आवडेना ॥२॥तीर्थ नावडे तया दुष्टां । न्याय नावडे सत्य नष्टां । कवण नावडे तया पापिष्ठां । अभिमान नष्टां न सांडवे ॥३॥भक्ति नावडे तया खळां । पुण्य नावडे तया चांडाळां । देखत देखत जन आंधळा । कांरे घननीळा विसरलेती ॥४॥पारखी नावडे तया खोटयांला । स्नान नावडे तया विटाळां । सुसंग नावडे नाठाळां । न्याय तंटाळा नावडे ॥५॥धर्म नावडे तया कृपणां । शुद्धि नावडे दुर्जनां । कर्म नावडे अब्राह्मणां । ऐसी दुष्त वासना पापियातें ॥६॥नाम नावडे तया नष्ट भक्तां । वृत्त नावडे तयां सर्वथा । नावडे भजन कैची कथा । नाहीं पतिव्रता कलियुगीं ॥७॥ऐसा झाला कलीचा प्रवेश । धरा नामाचा विश्वास । जीवीं धरा ह्लषीकेश । विष्णुदास नामा म्हणे ॥८॥६.देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं ॥१॥लटिक्याचा साच जिंकियेला कली । पाखांडी वेदातें न मानिती बळी । अधर्म प्रवर्तला महीतळीं । ऐसीं पापें कळीं थोर झालीं ॥२॥ह्मणोनि करुणा भाकितु आहे । जैसी व्याघ्रें वेढिली गाय । तेंवि पंचानन प्रासूं पाहे । तैसा दिसतो नारायणा ॥३॥भक्ति भावो नावडे पैं गा । जैसें कां अमृत मुखीं भुजंगा । डंख करूं आवडे जगां । ऐसें श्रीरंगा नवल चोज ॥४॥भ्रतारभीक्त सोडियली नारीं । परपुरुषीं मन निर्धारीं । पितियासि पुत्र असों नेदी घरीं । नित्य निंदा करी रे अपमान ॥५॥म्हणोनियां जिबें त्रासु घेतला । सत्य लोपलें धर्म बुडाला । अझूनि काय पाहतोसि उगला । धांवें विठ्ला म्हणे नामा ॥६॥७.वेदांवेगळें कर्म करी । मनीं पाखंड धरी । तो पचिजे अघोरीं । चिरकाळ वरी ॥१॥तो न आणावा पैं दृष्टी । तोचि दोशी एक या सृष्टी । तो होईल महा कष्टी । हरीसिन भजतां ॥२॥संध्या स्नान नेणे दान । नेणे हरिकथा श्रवण । तोहि पतीत जाण । महापातकी चांडाळ ॥३॥सांडूनि ब्राह्मणपण । शूद्ररीती आच-रण । तो दृष्टी पडलिया जाण । पहादोष घडेल ॥४॥निंदा करी जो संतांची । पूजा नेणे जो देवाची । तोचि राशि पापाची । प्र-त्यक्ष जाणावी ॥५॥तीर्थ न करी हिंडतां । व्रत न करी बोलतां । पुराण नायके पाहतां । तो तंव राक्षस जाणावा ॥६॥सदा अमं-गळ अशुची । गुरु आज्ञा भंगी साची । अखंद निंदा करी सं-तांची । तो स्वामिद्रोही जाणावा ॥७॥कपट शिके नानाविध । गोत्रजांशीं करी विरोध । तो जाणावा हें प्रसिद्ध । महापातकी चां-डाळ ॥८॥गृहदारावरी नाहीं चित्त । परस्त्रियेसीं करी स्तुत । तो प्रत्यक्ष महा दैत्य । त्याचें मुख पाहों नये ॥९॥नाठवी जो उप-कार । स्वामीसी न करी जो नमस्कार । तो जन्मांतरचिं होय नर । पतीत चांडाळ बोलिजे ॥१०॥पाखांड रची कवित्व । माता पितियाचें न करी महत्व । पंच पातकी जीवित्व । तो पूर्वीचा बोका होता ॥११॥नामा म्हणे तैसे दोषी । न आणावे पंढरीसी । काय करावे ते पाषाण जन्मासी । जे विठ्ठलनामासी मिळतीना ॥१२॥८.कृष्णाचें कीर्तन नावडे ज्या नरा । जन्मोनि अघोर पडे नरकीं ॥१॥कृष्णश्रवण नाइके जो कानीं । तयासि मेदिनीं ठाव कैंचा ॥२॥कृष्णविष्णुकथा नावडे पैं नित्य । तयासी पैं सत्य ग्रहबाधी ॥३॥रामकृष्ण हरी न ध्याय जो मूर्ति । तया यम नेती अंतीं जाणा ॥४॥नामा ह्मणे हे नर कलियुगीं उदंड । घरो-घरीं पाखांड करिताती ॥५॥९.पलंगीं नारी वैसवूनि । माये हातीं वाहे पाणी ॥१॥ऐसा कलियुगीं आचार । क्रिया भ्रष्ट झाले नर ॥२॥स्त्रीसी पाटावाची चोळी । माता सिवती सोंवळीं ॥३॥स्त्रियेचा कै-वार वोढी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥४॥स्त्रीचें ऐकोनि उ-त्तर । सख्या बंधूसि पाडी वैर ॥५॥म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगाचा महिमा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP