मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग| हरिश्चंद्रराजाचें चरित्र संत नामदेवांचे अभंग आत्मस्वरूपस्थिति उपदेश आत्मसुख भक्तवत्सलता १ श्रीचांगदेवांची समाधी ध्रुवचरित्र श्रीज्ञानेश्वरांची आदि कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना नाममहिमा संत नामदेव रचित गवळण द्रोणपर्व ह्माळसेन कथा करुणा श्रीकृष्णमाहात्म्य श्रीकृष्णलीला मुक्ताबाईची समाधी नामसंकीर्तन माहात्म्य श्रीनामदेव चरित्र श्रीनिवृत्तिनाथांची समाधी पंढरीमाहात्म्य पौराणिक चरित्रें प्रल्हाद चरित्र श्रीराममाहात्म्य रूपके श्रीज्ञानेश्वरांची समाधी श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा संतमहिमा संतचरित्रे शिवरात्रमाहात्म्य शुकाख्यान श्रीसोपानदेवांची समाधी सुदामचरित्र तीर्थावळी उपदेश विठाचे अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या भेट मागणें संतस्तुति जनाबाईचा निश्चय भाट आऊबाईचे अभंग लाडाईचा अभंग हरिश्चंद्रराजाचें चरित्र संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवहरिश्चंद्र हरिश्चंद्रराजाचें चरित्र Translation - भाषांतर सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । स्वप्नीं हें समग्र दिलें राज्य ॥१॥ ब्राह्मणासी सुवर्ण औटभार । संकल्प हा त्वरें सोडियेला ॥२॥जागृतीमाजी येऊनि ब्राह्मण । मागती सुवर्ण राजयासी ॥३॥वंदूनि चरण राजा बोले त्यासी । चला आश्रमासि स्वामि आतां ॥४॥समारंभें रूपें घेऊनि ब्राह्मण । अयोध्येकारणें आले तेव्हां ॥५॥राजद्वारापाशीं येऊनि ब्राह्मण । मागत सुवर्ण राजयासी ॥६॥भांडारियासी आज्ञा करी हरिश्चंद्र । आणा वेगीं त्वरें सुवर्ण हें ॥७॥ऐकूनियां शब्द क्रोधें तो ब्राह्मण । करीत ताडण राजियासी ॥८॥माझें मज देसी काय समजोनि । विचार हा मनीं कैसा केला ॥९॥वंदूनि चरण बोले हरिश्चंद्र । कृपेचे सागर स्वामी तुम्ही ॥१०॥कृपा करुनियां केले हें सावध । करा अपराध क्षमा माझे ॥११॥तारामती त्यासी करी विनवणी । धरूनियां वेणी मारी तिसी ॥१२॥रोहिदास बोले वंदूनि चरण । ऐकीं विज्ञापना एक माझी ॥१३॥स्वामीपाशीं मी तों रहातों गहाण । देऊनि सुवर्ण जाऊं आम्ही ॥१४॥राजा बोले स्वामी द्यावी जी अवधि । तुम्ही कृपानिधि महाराजा ॥१५॥नवखंडा वेगळी असे वाराणसी । विकूनि देहासी देऊं आम्ही ॥१६॥बोलावूनि मंत्री सांगे हरिश्चंद्र । करा कारभार स्वामीपाशीं ॥१७॥स्वामी सांगतील तेंच करा मान्य । कार्य विचारूनि करीत जावें ॥१८॥आह्मी जातों आलां कृपा असों द्यावी । सकळां सांगावी विनंति माझी ॥१९॥ठेवूनियां सर्व अलंकार भूषण । झालीं तिघेजण मार्गस्थही ॥२०॥राजा हरिश्चंद्र मागें तारामती । चिमणीही मूर्ति रोहिदास ॥२१॥पाहूनियां लोक करिताती शोक । पशुपक्षादिक सर्व तेही ॥२२॥कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । कां आम्हां सर्वत्रां मोकलीसी ॥२३॥लेंकुराचेपरी केलासे सांभाळ । मातेविण बाळ राहे कैसें ॥२४॥लागेल तें द्रव्य घेईं आह्मापाशीं । देईं या विप्रासी महाराजा ॥२५॥येती काकुळती करिती नमस्कार । नको तूं अंतर देऊं आम्हां ॥२६॥विप्रासी लोक येती काकुळती । देईं हा नृपति आम्हापासीं ॥२७॥द्विगुणी सुवर्ण देतों तुज आतां । सोडीं कृपावंता हरिश्चंद्रा ॥२८॥स्वामी तुम्ही करा राज्यकारभार । ठेवा हरिश्चंद्र आम्हापाशीं ॥२९॥नका करूं गाईवत्सा ताडातोडी । येती घडोघडी काकुळती ॥३०॥ऐकोनियां बोले क्रोधें तो ब्राम्हण । जा राजा त्वरेनें येथूनियां ॥३१॥राजियानें केली सर्वां विनवणी । निघाला तेथूनि हरिश्चंद्र ॥३२॥आदित्यासी तेव्हां सांगे विश्वामित्र । तपा तुम्ही तीव्र सोळा कळा ॥३३॥वरूणासी सांगे आटवावें पाणी । जळशोष मेदिनी पाडियेला ॥३४॥वायुलागीं सांगे नका येऊं येथें । जात तया पंथें हरिश्चंद्र ॥३५॥वृक्ष हे जळाले पाषाण उलले । त्या पंथें चालिलीं तिघेजण ॥३६॥शरीरें तिघांचीं करपोनियां गेलीं । तृषा ते लागली रोहिदासा ॥३७॥रोहिदास बोले माते दे जीवन । कासावीस प्राण होतो माझा ॥३८॥तशामध्यें वृद्ध ब्राम्हण होऊनि । आला तया वनीं विश्वामित्र ॥३९॥येऊमि राजास आशिर्वाद केला । सत्त्वधीर मला राजया तूं ॥४०॥आम्हीं तिघेजण पुत्न आणि दारा । जात हरिश्चंदा भिक्षेलागीं ॥४१॥उष्णकाळदीन पायां आले फोड । देई चर्मजोडे तिघांजणा ॥४२॥ऐकतांचि ऐसें केलें त्या अर्पण । झालीं तिघेजण मार्गस्थही ॥४३॥पांया आले फोड वाहती रुधिर । राजा हरिश्चंद्र चालतांना ॥४४॥रोहिदास बोले ताता पाजीं पाणी । बोलतां वदनीं शब्द नये ॥४५॥कडे घेऊनियां रोहिदास बाळ । धुंडितसे जळ वनामाजी ॥४६॥विश्वामित्रें वनीं लाविला वणवा । चुकली हे तेव्हां तारामती ॥४७॥घाबरी ते झाली पाहे वेडयावाणी । न दिसे नयनीं हरिश्चंद्र ॥४८॥कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । कां मज उदारा मोकलीलें ॥४९॥रोहिदास बाळ घेऊनि सांगातें । गेलां कोण्या पंथें महाराजा ॥५०॥तृषाक्रांत झालें होतें माझें ताम्हें । पाजिलें जिवन कोठें त्यासी ॥५१॥तारामती शोक करी त्या वनांत । आले अकस्मात् । विश्वामित्र ॥५२॥कोणीची तूं कांता फिरसी या वनीं । बोले त्यालागुनी तारामती ॥५३॥भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । चुकले भूपाळ बनामाजी ॥५४॥येरु बोले दोघे नेले आहाळोनी । प्रेतें तिसी दोन्ही दाखविलीं ॥५५॥पाहूनियां प्रेते पिटीलें वदन । आक्रोशें रुदन करी तेव्ही ॥५६॥कां हो स्वामी मज सांडियेलें येथें । धरीयला पंथ वैकुंठींचा ॥५७॥रोहिदास बाळ सांगातें घेउनी । मजला कां वगीं सांडियेलें ॥५८॥सकुमार शरीर पंथीं झाले क्लेश । ह्मणोनी उदास झालां तुम्ही ॥५९॥तशामध्यें तुम्हां साह्य झजला अग्नि । माझें काम स्मरण विसरलां ॥६०॥सवें असे बाळ हळू चाला पंथ । येतें मी धांवत मागें आतां ॥६१॥रोहिदास बाळ घेतला ओसंगा । कांहो पांडुरंगा ऐसें केलें ॥६२॥कांहो चुकविलें माझिया पाडसा । पाहूं राजहंसा कोठें आतां ॥६३॥तृषाक्रांत झालें होतें माझें तान्हें । मिळालें जीवन नाहीं त्यासी ॥६४॥पतिपुत्र दोघे गेले निजधामा । भेट मेघ:शामा करीं माझी ॥६५॥वनीं ऐसा शोक करी तारामती । गेला तो गभस्ती अस्तमाना ॥६६॥विश्वामित्न म्हणे ऐक आतां बाई । होणार तें कांहीं न चुकेची ॥६७॥देईं यांसी अग्नी झालीसे यामिनी । भय या काननीं श्वापदाचें ॥६८॥बोले तारामती ऐका तुम्ही ताता । पतिसवें आतां अग्नि द्यावा ॥६९॥येरु म्हणे तुझा पति आहे ऋणी । ऐकिलें श्रवणीं आम्हीं ऐसें ॥७०॥पतीचें जें ऋण फेडी प्रतिव्रता । गोष्ट हे अनंता मानता हे ॥७१॥बोले तारामती ऋणी तिघेजण । मागुती हें येणें जन्मालागीं ॥७२॥ताता तुम्ही आतां अग्नि द्यावा त्वरें । करुनी अव्हेर गेला तेव्हां ॥७३॥दोन प्रहर रात्र झालीसे यामिनी । व्याघ्र हा होउनी आला तेथें ॥७४॥ओढी रोहिदासा करुनी गर्जना । आली ते मूर्च्छना सतीलागी ॥७५॥गेली ती यामिनी अरुणोदय झाला । अकस्मात् आला हरिश्चंद्र ॥७६॥सवें असे त्याच्या रोहिदास बाळ । भेटला वेल्हाळ मातेलागीं ॥७७॥तिघांसही तेव्हां झालें समाधान । वसिष्ठ चरण आठविती ॥७८॥एकामागें एक चालताती पंथ । देखियलें तेथें अन्नछत्न ॥७९॥रम्य स्थळ जागा अपूर्व ते फार । सुंगध तरुवर डोलताती ॥८०॥विश्वामित्नें तेथें केलेंसे निर्माण । होताती भोजन ब्राह्मणाचें ॥८१॥त्याची पंथें जाण राजा हरिश्चंद्र । येऊनियां विप्र बोले त्यासी ॥८२॥चला महाराजा माझ्या आश्रमासी । करी भोजनासी आवडीनें ॥८३॥राजा म्हणे नव्हे आमुचा हा धर्म । नका करुं श्रम तुम्ही आतां ॥८४॥वंदुनी चरण पुढें चाले पंथ । आली अकस्मात् तारामती ॥८५॥विश्वामित्रें तेथें केलेंसे विचित्र । मायेचा हरिश्चंद्र निर्मियेला ॥८६॥आणिक प्रकारें विलास भोगीत । असे हर्षयुक्त आनंदानें ॥८७॥येऊनियां विप्र बोले सतीलागीं । चला बाई वेगीं आश्रमासी ॥८८॥अन्नोदक सेवीं रुचेल हें तूतें । असे तुझा कांत तेथें बाई ॥८९॥बोलावितो तुज पाहे विलोकुनी । देखे त्या नयनीं तारामती ॥९०॥स्मरूनियां तेव्हां वसिष्ठ चरणा । कां गा नारायणा ऐसें केलें ॥९१॥पूर्वेचा हा सूर्य पश्चिमे उगवेल । समुद्र सांडील मर्यादेसी ॥९२॥ऐसेंही घडेल कळे कोणकाळें । परी सत्वासी न ढळे हरिश्चंद्र ॥९३॥दीपक हा कैसा अंधारीं पडला । वायुसुत भ्याला भुतालागीं ॥९४॥ऐसें सांगा कोठें झालें विपरीत । तैसा नव्हे सुत शिबीचा हा ॥९५॥तैसा हरिश्चंद्र नोहे हा निश्चित । चाले पुढें पंथ तारामती ॥९६॥ताता तुम्ही आतां नका करूं श्रम । नोहे ऐसा धर्म आमुचा हा ॥९७॥रोहिदास बाळ आला तयेवेळीं । ऋषि त्या जवळी पातलासे ॥९८॥हातीं घेऊनियां उदकाची झारी । प्राशन तूं करीं बाळा आतां ॥९९॥तुझी मातापिता असे अन्नछत्रीं । बोलाविती नेत्नीं पाहें आतां ॥१००॥पाहूनियां त्यानें विस्मय तो केला । अगस्ती ग्रासिला समुद्रानें ॥१०१॥ऐसें कोठें नाहीं झालें विपरीत । दोघेंहिनिश्चित नोहेती हे ॥१०२॥आमुचा हा धर्म नोहे ऐसा स्वामी । कृपा आतां तुम्ही असों द्यावी ॥१०३॥विस्मय तो ऋषि करितो मनांत । नाहीं सिद्धि जात पण माझा ॥१०४॥मार्ग हा क्रमितां तिघां भेट झाली । वार्ता सांगितली एकमेकां ॥१०५॥हरिश्चंद्र बोले नेणें मी हें कांहीं । लक्ष असे पायीं वसिष्ठाच्या ॥१०६॥पुढें देखियलें वोस तें नगर । असे भयंकर पिशाच्य तें ॥१०७॥तेथें स्मरूनियां वसिष्ठ चरण । ध्यानीं नारायण आठविती ॥१०८॥पुढें देखियली नगर वाराणसी । वंद्य सर्वासी ते देवादिकां ॥१०९॥भूमीवरी शिवें आणिलें कैलास । करिताती वास पूण्यप्राणी ॥११०॥काळबहिरवाची तेथें कोतवाली । भय नाहीं बोली यमाची ते ॥१११॥पवित्र हें वाहे भागिरथीचें जल । हरती सकळ दोष सर्व ॥११२॥देखोनि हरिश्चंद्रें केला नमस्कार । पोहोंचलें तें तीर भागिरथीचें ॥११३॥तिघांजणीं तेव्हां केलें तेथें स्नान । आला तो ब्राम्हाण तेचि वेळां ॥११४॥धुंडितांना तुम्हां मोठा झाला श्रम । कासयासी धर्म केला ऐसा ॥११५॥हरिश्चंद्रें केलें त्यासी दंडवत । असावें सांगात स्वामी आतां ॥११६॥तिघांजणीं माथां बांधोनियां तृण । बैसलीं जाऊन हाटवलीं ॥११७॥पाहती सकळ नगरीचे लोक । अयोध्येचा नृप हरिश्चंद्र ॥११८॥सकुमार त्याची कांता तारामती । सगुणही मूर्ति रोहिदास ॥११९॥ब्राम्हीणासी यानें राज्य दिलें दान । राहिलें सुवर्ण याचें याचें कांहीं ॥१२०॥म्हणोनियां उभीं केलीं ही बाजारी । प्रारब्धाची दोरी पाहें कैसी ॥१२१॥विकावया आणिली लावण्य वनिता । समजली वार्ता वेश्येलागीं ॥१२२॥येऊनि ब्राम्हाणा पुसे तिचें मोल । सुवर्ण एक तुळ घेऊं इचें ॥१२३॥मानली हे गोष्टी वेश्येचिया चित्ता । घेतली हे आतां तारामती ॥१२४॥चाल बाई आतां माझिये सदनीं । होशील स्वामिनी सर्वस्वीं तूं ॥१२५॥आवडे तितुके लेईं अलंकार । विलास समग्र भोगीं आतां ॥१२६॥देखूनि लावण्य आतां तुझें रूप । वश्य होईल भूप नगरीचा ॥१२७॥हरलें हें दैन्य आतां तुझें बाई । नाहीं तुज कांहीं भय चिंता ॥१२८॥ऐकोनियां शब्द तेव्हां तारामती । येती काकुळती विप्रालागीं ॥१२९॥नका इसी देऊं मज महाराजा । नोहे धर्म माझा ऐसा ताता ॥१३०॥तथापिही तुम्ही दिलें इचे हातीं । प्राण हा निगुती देईन मी ॥१३१॥करा उपकार विकावें आणिका । तुम्ही मायबापा कृपावंता ॥१३२॥वेश्येचें हें द्रव्य दिलें तें माघारें । आला एक विप्र घ्यावयासी ॥१३३॥दशग्रंथी निपुण षडशास्त्रीं प्रवीण । धर्म परायण महाराज ॥१३४॥काळ हें कौशिक नाम तयाप्रती । त्यानें तारामती घेतली हे ॥१३५॥पाकशाळेमाजी करावया अन्न । घेतली अन्नपूर्णा ब्राम्हाणानें ॥१३६॥धर्माची तूं कन्या माझिये तूं बाई । सुखें आतां राहीं अन्नछत्रीं ॥१३७॥तारामती करी दोघां नमस्कार । कृपा दिनावर असों द्यावी ॥१३८॥विलोकिलें तेव्हां नृपाचें वदन । कधीं हे चरण पाहीन आतां ॥१३९॥मुक्ताफळ झालें समुद्राचे पोटीं । परी झाली तुटी प्राक्तनानें ॥१४०॥विचित्र हा असे प्रारब्धाचा खेळ । काय तळमळ करूनियां ॥१४१॥येतें स्वामी आतां कृपा असों द्यावी । सांड न करावी पुन्हा माझी ॥१४२॥दीपक प्रकाश नोहे हा वेगळा । तैसी मी दयाळा जडलें अंगीं ॥१४३॥हेंचि जन्मोजन्मीं देगा चक्रपाणी । चालिली तेथूनि तारामती ॥१४४॥रोहिदास बाळ धांवे तिचे मागें । आवरीत अंगें राजा त्यासी ॥१४५॥घेऊनियां येतों मातेचें दरुशन । विलोकी वदन तारामती ॥१४६॥प्रेमपान्हा तेव्हां आला तिचे स्तनीं । पाजी त्यालागुर्नी बैसूनियां ॥१४७॥पाहुनी सर्वांचें सद्नद अंतर । बोलतां उत्तर नये वाचे ॥१४८॥नको करूं देवा मायबाळा तुटी । पाहावेना द्दष्टी कोणासी हें ॥१४९॥काळ कौशिकासी बोले तारामती । ऐकावी विनंति एक ताता ॥१०५॥घ्यावा रोहिदस करील हा सेवा । तुम्ही कृपार्णवा महाराजा ॥१५१॥ऐकोनियां ऐसें विप्रासी तो बोले । काय याचें मोल सांगा स्वामी ॥१५२॥अर्ध तुक हें घेऊं येचि क्षणीं । दिलें त्यालागुनी कौशिकानें ॥१५३॥तारामती आणि रोहिदास बाळा । घेउनी दयाळ गेला तेव्हां ॥१५४॥हाटवतीं उभा असे हरिश्चंद्र । आला तो महार वीरबाहू ॥१५५॥ब्राह्मणासी पुसे काय याचें मोल । हेम दोन मोल घेऊं याचें ॥१५६॥मानली हे गोष्टी डोंबाचिया चित्ता । घेतला हा आतां हरिश्चंद्र ॥१५७॥विप्राचे चरणीं नृप ठेवी माथा । कृपा दयावंता असों द्यावी ॥१५८॥घेउनी हरिश्चंद्र गेला आश्रमासी । सांगतो कांतेसी वीरवाहू ॥१५९॥सांगा यासी काम आणिला चाकर । पाहुनी उत्तर करी कांता ॥१६०॥कृश सकुमार आणिला कासया । काय द्रव्य वायां जात होतें ॥१६१॥सांगती त्या काम डोंबाच्या कामिनी । जाय आणीं पाणी हरिश्चंद्रा ॥१६२॥त्वरें करूनियां भरीं हे रांजण । दिला उचलुनी कुंभ हातीं ॥१६३॥जळ आणावया गेला हरिश्चंद्र । मागें विश्वामित्रें काय केलें ॥१६४॥छिद्र पाडियेलें रांजणाचे तळीं । कुंभ तयेवेळीं फुटिन्नला ॥१६५॥ताडण करिती डोंबाच्या कामिनी । दिला उचलोनी दुजा कुंभ ॥१६६॥दोन प्रहर त्यानें वाहिलें उदका । नसे थेंब एक रांजणांत ॥१६७॥वीरबाहुनें त्या केलेंसे ताडण । दिलें तेव्हां धान्य कोरडें तें ॥१६८॥दळूं कांडूं लागे करी सर्व धंदा । ध्यानीं त्या गोविंदा आठवीत ॥१६९॥भागिरथीचे तीरीं करीत स्वयंपाक । आला तेव्हां एक विप्र तेथें ॥१७०॥घालीं महाराजा मजा आतां अन्न । बैसला येऊन त्याजपाशीं ॥१७१॥हरोश्चंद्रें त्यासी केला नमस्कार । बैसा क्षणभर स्वामी येथें ॥१७२॥हरिश्चंद्रें केले दोन भाग अन्न । ब्राह्मणाकारणें दिला एक ॥१७३॥खाऊनियां अन्न पाहे दुजाकडे । ठेवी तयापुढें हरिश्चंद्र ॥१७४॥नित्यानित्य तेथें जेवीतसे विप्र । घडे निराहार हरिश्चंद्रा ॥१७५॥शरीर झालें कृश अंगीं नसे शक्ति । तयासि बोलती वीरबाहू ॥१७६॥स्मशानीं रक्षण करीं तूं हें आतां । अवश्य म्हणे ताता हरिश्चंद्र ॥१७७॥म्हणसणखांबा नाम ठेविलें तयासी । राहे दिवसनिशीं स्मशानीं तो ॥१७८॥द्रव्यावांचोनियां जाळों न देईं प्रेत । अहोरात्र ध्यात देवाजीशी ॥१७९॥काळकौशिकाचे घरीं तरामती । वाढीतसे पंक्ति ब्राम्हाणींच्या ॥१८०॥उत्तम स्वादिष्ट पवित्र तें अन्न । जेविती ब्राम्हाण आवडी प्रेमें ॥१८१॥रोहिदास करी कौशिकाची सेवा । तुळसी पुष्पें दुर्वा आणितसे ॥१८२॥फुलें तोडितसे रोहिदास बाळ । दंश केला व्याळें त्याजलागीं ॥१८३॥सांगातीयांस तेव्हां बोले रोहिदास । सांगावा मातेस नमस्कार ॥१८४॥नाशिवंत देह गेलासे विलया । नको शोक वांयां करूं याचा ॥१८५॥वारंवार तिच्या संबोखावें मना । तुम्हांसी प्रार्थना हेचि माझी ॥१८६॥ऐकोनि सांगाती करिती रुदन । सोडियेला प्राण रोहिदासें ॥१८७॥पाकशाळेमाजी होती त्याची माता । श्रुत केली वार्ता सांगात्यांनीं ॥१८८॥ऐकोनियां ऐसें चिंतावली मनीं । कांहो चक्रपाणी ऐसें केलें ॥१८९॥आटोपोनि सर्व तेथील हा धंदा । निघाली हे शोधा बाळकाच्या ॥१९०॥झालीसे यामिनी कांहीं न दिसे वाट । मोडताती कांटे पायांलागीं ॥१९१॥नाहीं त्याची शुद्ध चालली धांवतां । लागलें तें प्रेत पायां तिच्या ॥१९२॥ओळखूनि तिनें पिटिलें कपाळ । आलंगिला बाळ ह्रदयीं तिनें ॥१९३॥दर्दरुनी तिचे स्तनीं आला पान्हा पाजूं आतां कोणा रोहिदासा ॥१९४॥सखया रोहिदासा कां बा रुसलासी । टाकूनि गेलासि मजलागीं ॥१९५॥पाहात मी होतें नित्य तुझें मुख । विसरलें दु:ख भ्रताराचें ॥१९६॥घडी घडी माझा हरिसी तूं श्रम । फुटकें हें कर्म माझें देवा ॥१९७॥ काय घडले दोष कीं दैवाची मी हीन । हरपलीं रत्नें दोन माझीं ॥१९८॥कंठूं आतां काळ कवणाचिये बळें । जाहलें हें निर्मूळ वंशाचें कीं ॥१९९॥आकोशें करून ह्रदय पिटित । आले अकस्मात् विश्वामित्र ॥२००॥सांगा बाई कैसें झालें वर्तमान । केलें हें श्रवण त्याजलागीं ॥२०१॥नको करूं बाई शोक कांहीं आतां । ही समजेल वार्ता आतां डोंबा ॥२०२॥द्रव्याविण तो हा जाळों नेदी प्रेत । नको करूं मात प्रगट ही ॥२०३॥आणितों साहित्य अग्नि दे झडकरी । आली तेव्हां तिरीं भागिरथीच्या ॥२०४॥पेटवूनि अग्नि करी ते रुदन । आला तो धांवून म्हाअणखांबा ॥२०५॥न देतांना द्रव्य जाळिसी तूं प्रेत । मारीतसे हातें तिजलागीं ॥२०६॥विखरूनि त्यानें दिला तेव्हां अग्नि । घालुनी जीवन विझविला ॥२०७॥प्रेत घेऊनियां रडे तारामती । प्रारब्धाची गती कैसी देवा ॥२०८॥सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । त्याचा कीं हा पुत्र रोहिदास ॥२०९॥अंतकाळीं यास ठाव अग्नि नेदी । स्पर्शला येऊन अनामिक ॥२१०॥काय ऐसें कर्मीं लिहिलें विधीनें । झाल्या तिघां तीन वाटा देवा ॥२११॥भ्रतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे । दु:ख कोणापुढें सांगूं आतां ॥२१२॥ऐकोनी हरिश्चंद्र खोंचला तो मनीं । आला तो धांवुनी तिजपाशीं ॥२१३॥सांगे वर्तमान बोले गहिंवरून । करी निवेदन तारामती ॥२१४॥सांगितला त्यासी सकळ वृत्तांत । ह्रदय पिटीत हरिश्चंद्र ॥२१५॥येरी म्हाणे कोण सांग तूं हें आतां । श्रुत केली वार्ता मुळींहुनी ॥२१६॥तुम्हां दोघां दिल्हें कौशिकाचे घरीं । दास्यत्व मी करीं डोंबाचें हें ॥२१७॥म्हासणखांबा नांव ठेविलें हें त्यानें । करितों रक्षण म्हासणामाजी ॥२१८॥अद्याप सेविलें नाहीं म्यां हें अन्न । शरीर कृश तेणें झालें माझें ॥२१९॥ऐकोनियां दु:ख पडली विकळ । घेतला तो बाळ हरिश्चंद्र ॥२२०॥सख्या रोहिदसा कं बा रुसलासी । टाकूनि गेलासी मजलागीं ॥२२१॥मजपाशीं तुझें गुंतलेंसे मन । म्हाणुनी धांवून आलासी तूं ॥२२२॥अंतकाळीं केल्या तिघांसही भेटी । दैवाचीं करंटीं आम्ही दोघें ॥२२३॥कैसें झालें माझें ह्रदय पाषाण । दिलें म्यां लोटून तुजलागीं ॥२२४॥जळोत हे हात जावो माझा प्राण । व्यर्थ हा वांचून काय आंता ॥२२५॥आक्रोशें करुनी ह्रदय पिटीत । त्यासी संबोखीत तारामती ॥२२६॥नका स्वामी शोक करूं कांहीं आतां । होतें जें संचिता झालें माझें ॥२२७॥धन्यापाशीं आतां आज्ञा घ्या मागून । द्यावयासी अग्नि महाराजा ॥२२८॥आज्ञा मागावया गेला हरिश्चंद्र । मागें विश्वामित्न काय करी ॥२२९॥एकली तूं येथें लावीचें हें भय । देउळांत राहें क्षणभरी ॥२३०॥ऐकोनि देउळीं गेली तारामती । निद्रा तयेप्रती लागलीसे ॥२३१॥विश्वामित्र तेव्हां आले देउळांत । काढोनियां आर्त बाळकाची ॥२३२॥रक्त मांस तिच्या लाविलें मुखासी । सांगत लोकां सि लाव आली ॥२३३॥बाळ भक्षितसे देउळाभीतरीं । देखोनियं दुरी पळालों मी ॥२३४॥धीट धीट लोक आंत प्रवेशोनि । बांधिली ते क्षणीं तारामती ॥२३५॥श्रुत केली वार्ता गांवींच्या राजाला । तो म्हणे लावेला जीवें मारा ॥२३६॥बोलाविला त्यानेम वीरबाहू डोंब । सांगतसे अंगें राजा त्यासी ॥२३७॥चालविली तेव्हां भागिरथीचे तीरीं । प्राहती नरनारी द्दष्टीं तेव्हां ॥२३८॥काळकौशिकाचे घरीं हे देखियेली । नाहीं समजली तेव्हां कोणा ॥२३९॥एकमेकां ऐसें करिती उत्तर । आला तो महार वीरबाहु ॥२४०॥,म्हसणखांबा त्यानें बोलाविला त्वरें । छेदीं इचें शिर आज्ञा केली ॥२४१॥ओळखिली त्यानें तेव्हां तारामती । प्रारब्धाची गति कैसी देवा ॥२४२॥घालियेलें तिसी भागिरथीचें स्नान । करीं तुं स्मरण देवाजीचें ॥२४३॥काय इच्छा असेल माग तुझे मनीं । पुरवील चक्रपाणी तुझी आशा ॥२४४॥स्वर्गीं सुरव्र बैसोनी विमानीं । पाहती नयनीं कवतुक ॥२४५॥भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । मागता स्नेहाळ विश्वामित्न ॥२४६॥श्रीगुरु वसिष्ठ कृपेचा सागर । असो त्याचा कर मस्तकीं हा ॥२४७॥होंचि जन्मोजन्मीं दे गा नारायणा । नाहीं हे वास्ना आणिकांची ॥२४८॥तारामती ह्मणे एक्या घायें हाणीं । लक्ष हें चरणीं वसिष्ठांच्या ॥२४९॥उचलितां कर आले नारायण । धरी आलिंगून हरिश्चंद्रा ॥२५०॥पितांबरधारि सगुण मेघ:शाम । योग्याचा विश्राम तोचि बाप ॥२५१॥त्यानें कृपाद्दष्ठि विलोकिलें तिघां । पुढें असे उभा रोहिदास ॥२५२॥विश्वामित्न तेव्हां संतोपले चित्तीं । आलिंगिलें प्रीति तिघांजणां ॥२५३॥पुष्पवृष्टी केली स्वर्गीं सुरवरांनीं । धन्य त्रिभुवनीं कीर्ति ज्याची ॥२५४॥श्रीगुरु वसिष्ठ आले तयेवेळां । सवें असे मेळा ऋषींचा तो ॥२५५॥त्यानें आइलंगिलें तिघां कृपाद्दष्टि । धेनुवत्सा भेटी झाली जैसी ॥२५६॥तिघांजणीं केला तेव्हां नमस्कार । प्रेम अश्रु नीर वाहे डोळां ॥२५७॥ह्रदयी धरुनी आलिंगिलीं त्यानें । मायबाळ तान्हें न विसंबे ॥२५८॥काळ तो कौशिक वीरबाहु डोंब । विमानीं श्रीरंगें बैसविलें ॥२५९॥कोटी वरुषें तप विश्वामित्रें केलें । तें समग्र अर्पिलें हरिश्चंद्रा ॥२६०॥समारंभें नेली अयोध्येसी तिघें । बैसविलीं अंगें राज्यास्थानीं ॥२६१॥साठसह्स्र वरुषें राज्य करा सुखें । दिला हा स्वमुखें आशिर्वाद ॥२६२॥सत्त्वधीर राजा सत्त्वाच्या ह्या कीर्ति । ऐकतांचि जाती दोष भंगा ॥२६३॥नामदेव यासी लागली ती गोडी । वर्णितो आवडी गुण त्यांचे ॥२६४॥ N/A References : N/A Last Updated : January 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP