मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|साम्राज्यवामनटीका| श्लोक १४१ ते १५५ साम्राज्यवामनटीका श्लोक १ ते २० श्लोक २१ ते ४० श्लोक ४१ ते ६० श्लोक ६१ ते ८० श्लोक ८१ ते १०० श्लोक १०१ ते १२० श्लोक १२१ ते १४० श्लोक १४१ ते १५५ साम्राज्यवामनटीका - श्लोक १४१ ते १५५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक १४१ ते १५५ Translation - भाषांतर ब्रम्हा सर्वहि वृत्तींच्या निरोधानेंच पावणें ।अंतर्मुख पूरक तो प्रपंचिं रेचक सुटे ॥१४१॥अद्वैत स्थिर वृत्ती जे तो प्राण स्थिर कुंभक ।प्राणायम असा त्याचा न होय इतरांस तो ॥१४२॥व्यतिरेकें आवरणा विक्षेपा अन्वयें तसी ।नासे तेव्हांच जाणावें अद्वैत कळलें तया ॥१४३॥गेली आवरणाविद्या विक्षेपा राहते तया ।नाशिती जाणुनी सर्व जड हें चित्स्वरूपची ॥१४४॥आत्माच विषयीं वाटे मन चित्स्वरुपीं असे । प्रत्याहार असा त्यांचा जो मुमुक्षूंस उत्तम ॥१४५॥ब्रम्हीं निराकार वृत्ति स्थिर जें ध्यान त्यास तें ।ब्रम्हाकारपणें वृत्ती स्थिरता जे समाधि तो ॥१४६॥ब्रम्हाचि स्फुरतें तेथें ज्मन जेथेंचि जाय तें ।मनाची धारणा हेची मुमुक्षां अति उत्तम ॥१४७॥तो राजयोगी गुरुदेव भक्त, योगांगमात्रींच समाधियुक्त ।विष्णु स्वयें तो तनु जे तयाची, जीवोद्धरा देवनदीच साची ॥१४८॥वसे प्रपंचीं परि निष्प्रपंच, असा असे ज्या परमार्थ साच ।होऊनि त्या युक्त जरी अशुध, प्रपंचिं साधे परमार्थ शुद्ध ॥१४९॥नारायण पद्मभव नारद व्यास शूकही ।आचार्य जे गौडपाद गोविंद भगवत्पद ॥१५०॥यतींद्र शंकराचार्य पृथ्वीधरहि ते तसे ।यति श्रीसच्चिदानंदरूपें परमहंस जे ॥१५१॥तत्कृपें वामनस्वामी ज्यांहीं गुहय प्रकाशिलें ।परात्पर सामराज्य तुकोबा परमेष्ठि ते ॥१५२॥बाळ कृष्ण ते परम परमानंद श्रीमुरू ।प्रकाशी गुहय तें ऐसें सर्वात्मा वासुदेव हें ॥१५३॥कृतार्थ तें वंदन नित्य ज्यांतें. कृपेन ज्यांच्या वदलों तयांतें ।परंपरा वर्णुनि त्यांच पायीं, पुन:पुन्हा वंदिंच सर्व ठायीं ॥१५४॥काया वाचा मनेंद्रीयें अहंकारें स्वभावेंहि ।म्यां हें केलें कर्म सर्व अर्पीं नारायणाप्रती ॥१५५॥॥ इति श्रीवामनस्वामीकृतानुभूतिलेशस्य साम्राज्यवामनटीका समाप्ता ॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP