मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|साम्राज्यवामनटीका| श्लोक २१ ते ४० साम्राज्यवामनटीका श्लोक १ ते २० श्लोक २१ ते ४० श्लोक ४१ ते ६० श्लोक ६१ ते ८० श्लोक ८१ ते १०० श्लोक १०१ ते १२० श्लोक १२१ ते १४० श्लोक १४१ ते १५५ साम्राज्यवामनटीका - श्लोक २१ ते ४० वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक २१ ते ४० Translation - भाषांतर जो आकाशघटमठीं महदाकाश तो असे ।आत्मा तसा स्वप्रकाश जणती दोहिं ठायिं त्या ॥२१॥जो जेथें देखिला होता तेथें आतां दिसेच तो ।ते देशकाळ टाकीतां असे पुरुष एकची ॥२२॥उभयोपाधिनीराशें ब्रम्हानुभव होतसे ।परि विद्या शुद्धसत्त्व ब्रम्हानुभव हा तिणें ॥२३॥अविद्या उपाधि जसा घटदेह तसा मठ ।विद्योपाधिही ब्रम्हांड निराशें ब्रम्हा जें महत् ॥२४॥देहीं ब्रम्हांडिं त्या बाहय असे एकचि ब्रम्हा तें ।तोचि कूठस्थ जो देहीं अभोक्ता बिंब आत्मता ॥२५॥कूटस्थापासुनी होते वृत्ति सत्त्वजळींच त्या ।तेंचि कूटस्थ चैतन्य प्रतिबिंबें तयासची ॥२६॥जीवात्मा प्रतिबिंबात्मा भोक्ताही वदति श्रुती ।वृत्तियोगें चेततौनी इंद्रियां विषयां भुतां ॥२७॥एवं सर्वहि तें एक अनात्म तद्विलक्षण ।वसे आत्मा वृत्ति ज्यांत साक्षित्वातीत देहिं जो ॥२८॥कूट्स्थ वदती त्यातें ब्रम्हांडींहि मठस्थ तो ।महत् जो त्याहि बाहेरी असे एकचि ब्रम्हा तें ॥२९॥तत्त्वमस्यर्थश्रवणें अविद्याग्रंथिसूटतां ।प्रकटे ब्रम्हा विद्या जों समाधि निर्विकल्प तो ॥३०॥होतां ब्रम्हाकार चित्त तें ब्रम्हा जग पाहती ।‘सवं खलु इदं ब्रम्हा’ अभिप्रायें श्रुतीचिया ॥३१॥निराकारचि हें सर्व निश्चयें वाटतें परी ।होतां अंगीं विकारित्व जाणती त्या गुरूक्तिनें ॥३२॥ठसतां निश्चयो चित्ता देह ब्रम्हांडपासुनी ।जें जें आठवतें तें तेम निराकारचि जाणता ॥३३॥कीं जें भासे जगजळ से आत्माच कीरण ।सत्यें भासे जें असत्य नसे तें सत्यची असे ॥३४॥विनाचैतन्य हें विश्व न भासे जड कांहिंच ।चित्स्फूर्तिनें जड स्फुरे ब्रम्हाद्वैत अखंड तें ॥३५॥दोरची सर्प तंतूच पट मातीच तो घट ।समुद्रलहरी हेम अलंकार असे परी ॥३६॥आत्माच आपला ब्रम्हा तो सर्वात्मपणें असे ।जाणती सर्व भूतांतें आत्मत्वेंच करूनियां ॥३७॥बळें ब्रम्हा चित्प्रकाश प्रपंच पाहतां दिसे ।ये हातासहि तें ब्रम्हा घट मातीबळें जसी ॥३८॥माती हेमीं नग घट शुक्तीं रजत शब्दची ।दोरीं सर्पनाम जसें ब्रम्हीं जीवत्वही तसें ॥३९॥मन प्राण इंद्रियेंही सत्क्रिय ब्रम्हा सर्व तें ।सात्वीक धारणें पाहे स्फुरे नगचि हेम तें ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP