मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|साम्राज्यवामनटीका| श्लोक ६१ ते ८० साम्राज्यवामनटीका श्लोक १ ते २० श्लोक २१ ते ४० श्लोक ४१ ते ६० श्लोक ६१ ते ८० श्लोक ८१ ते १०० श्लोक १०१ ते १२० श्लोक १२१ ते १४० श्लोक १४१ ते १५५ साम्राज्यवामनटीका - श्लोक ६१ ते ८० वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६१ ते ८० Translation - भाषांतर अनंतानंत ब्रम्हांडीं अलंकारीं सुवर्णवत् ।आपणचि निराकार आनंदाद्भववैभव ॥६१॥तेंच हें सगुण ब्रम्हा म्हणूनि श्रुतिवर्णिते ।‘पुरुष एवेदं सर्व’ पुरुष जाण सर्वही ॥६२॥पुरुष म्हणतां येतो प्रकृतीसहि घेउनी ।व्यापी आपणचि जग सगुण ब्रम्हा तें असे ॥६३॥अव्यक्ततत्त्व प्रकृति ब्रम्हानुभूति ब्रम्हा जें ।अनूभवात्मक त्यातें सगुण ब्रम्हा बोलिजे ॥६४॥व्यापिलें जग ब्रम्हानें रज्जूनें सर्प ज्या परी ।असें तें जग ब्रम्हींच सर्प रज्जूमधें जसा ॥६५॥न तें ब्रम्हा जगामाजी न रज्जू सर्पिं त्यापरी ।जग ब्रम्हीं नसे तेंही जसा सर्प न अरज्जुंत ॥६६॥एवं चारी प्रकारेंही जग नाहींच जें असे ।ब्रम्हा तें सगुण ब्रम्हा असावें जाणुनी तया ॥६७॥आकार जो दिसे तोचि योग ऐश्वर्यची असे ।योग तो युक्तिचातुर्य सामर्थ्य ऐश्वरचि तें ॥६८॥आहे वस्तु परब्रम्हा नाहीं तें जग दाखवी ।युक्ति चातुर्य तें ऐसें कीं सामर्थ्यचि तें तसें ॥६९॥ज्याचें सामर्थ्य ऐश्वर्य असें कीं तोचि तें स्वयें ।भगवंताय त्या विश्वाकाराय च नमो नम: ॥७०॥हा अघटीतघटना योगाइश्वर्य गूण जो ।सिद्ध यांत असें ब्रम्हा नाहीं तें जग दाखवी ॥७१॥दिसोनि जग तें नाहीं ऐश्वर्यीं ज्ञान प्राप्त जें ।ज्ञानीं त्या सिद्धस्वरूप त्रिगुणातीत निर्गुण ॥७२॥जाणे चिच्छक्ति त्या ज्ञानीं सतस्वरूप असज्जग ।परी कल्पी जग हि ते कल्पनासह तें जग ॥७३॥मिथ्या स्थाणुत्वीं पुरुष जाणे ज्ञानगुणेंच त्या ।तेव्हां जगचि तें ज्ञान वैराग्य सिद्ध त्यांतची ॥७४॥प्रिय सत्य स्वरूपची असत्य जगिं अप्रिती ।श्रुतिज्ञ जो तया मिथ्या रजतीं अप्रिती जसी ॥७५॥वैराग्य गुण हा त्यांत झाला धर्म फलद्रुप ।भवबंधन त्या धर्मीं मिथ्याच जग जाणतां ॥७६॥धर्में सत्कर्म समता कर्माचें फळ देउनी ।सदयें तरुणोपायें सन्मार्गीं जीव तारिले ॥७७॥धर्में अशा कल्पिलें तं ज्ग कर्म तुझें असे ।तें ब्रम्हा तूं दयायुक्त सगुण समनाथ ही ॥७८॥शुद्ध सत्त्व तुझा धर्म नाहीं तो तुजवांचुनी ।जसें न कनका बाहय कटकत्व असे परी ॥७९॥धर्मगुणीं सिद्ध यश अपेश ज्यांत तें नसे ।यशें त्या तारिलें विश्व अवतारादि निश्चयें ॥८०॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP