साम्राज्यवामनटीका - श्लोक १२१ ते १४०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


आत्मा सत्य असें ज्ञान त्या सत्यत्वींच तेवढें ।
आनंद तेथ तैसाची सच्चिदानंद तो असा ॥१२१॥
सत्पदें जो असे आत्मा चित्पदें तोचि दीसतो ।
आहे आनंद आत्माच सच्चिदानंद तो असा ॥१२२॥
कालत्रयीं असे तेंची सत्य जें नित्य जाणणें ।
असत्य आणि अनित्य नसे त्या वेगळेंच कीं ॥१२३॥
आत्मरज्जू असे सत्य असत्य ज्ग सर्प तो ।
ज्ग सर्प न तो मिथ्या ससे आत्माच दोर तो ॥१२४॥
म्हणा सर्प त्री रज्जू स्वभावें असतो तसा ।
चराचर नाम मात्र आहे ब्रम्हाचि सर्वही ॥१२५॥
चराचर देहसह नाम आकार मात्रची ।
आकारीं त्या निर्विकार आहे एकचि ब्रम्हा तें ॥१२६॥
नेत्रां दिसे जळचि तें बुद्धीस मात्र कीरण ।
इंद्रियां विश्व भासे तैं बुद्धीस ब्रम्हा वाटतें ॥१२७॥
एवं प्राप्ति निराकार स्वरूपाचीच सर्वदा ।
साक्षित्वातीत प्रथम निराकारचि तें असें ॥१२८॥
घट मठ उपाधीच्या निषेधें जें ‘असी’ पद ।
व्यतिरेकमहावाक्यें निराकारचि ब्रम्हा तें ॥१२९॥
तंतू पट माति घट दृष्टान्तें विश्व ब्रम्हाची ।
तें अन्वयमहावाक्यें निराकारचि वाणते ॥१३०॥
षडगुणींही निराकार हेमवत् नगिं पाहणें ।
सत्य ज्ञानानंत जें काम निराकारचि सर्वदा ॥१३१॥
गेली आवरणाविद्या परिविक्षेपयुक्त जे ।
राहे ते जाय कळतां जडही चित्स्वरूपची ॥१३२॥
अनूभव असा त्यांत फलितार्थचि निर्गुण ।
दिसेना कांहिंच जडाजड कांहींच नाहिं तें ॥१३३॥
अखंडानुभवें ऐशा देहीं वर्ते विदेहि जो ।
त्या पूर्ण भगवत्प्राप्ती मुक्तिही हरिभक्तिही ॥१३४॥
ब्रम्हा सर्व अशा ज्ञानें दिसती ब्रम्हा इंद्रियें ।
अभ्यास हा अशा ज्ञानें होतो इंद्रियसंयम ॥१३५॥
पाहे चैतन्य हेमचि जडत्व नग टाकुनी ।
नियमें पाहती ज्ञानी स्वानंदप्रद नेम तो ॥१३६॥
आत्माच पाहतो सर्व प्रपंच जड त्यागितां ।
बोलण्यांच हि तें मौन नि:शब्दीं म्न वर्ततां ॥१३७॥
ब्रम्हाचि आदि अंतीं जें मध्यें ही तेंचि वीजन ।
ब्रम्हा काळ असे ज्यांत निमिषादिक काळची ॥१३८॥
सुख ब्रम्हा स्फुरण जें नित्य आसन सिद्ध तें ।
ब्रम्हाच जड मायेचें मूळ अज्ञानबंध तो ॥१३९॥
तरंग जड चिदब्धि ज्ञान जें समताच ते ।
दृष्टि ते कारण ब्रम्हा जड कार्यचि पाहणें ॥१४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP