साम्राज्यवामनटीका - श्लोक ४१ ते ६०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


नामें रूपें क्रिया सर्व ब्रम्हचि धरिती स्वयें ।
नग शाश्वत् जसें हेम जग शाश्वत ब्रम्हाची ॥४१॥
कारणीं कार्य पाहातो जड दृष्टीस तें नसे ।
चित्स्वरूपीं जड वसे हेमीं नग असे परी ॥४२॥
येतां अनुभवा सर्व निराकारचि ब्रम्हा तें ।
परि आकार जो दृश्य न राहे काळशक्तिनें ॥४३॥
आकार वाटत मना कल्पनेंच करूनियां ।
कल्पना विषयेंद्रीयें जाणती ब्रम्हादृष्टिनें ॥४४॥
व्याप्य व्यापक आत्माचवदताति असें श्रुती ।
ऐसें समजतां तत्त्व जडभेदा नुरे उरी ॥४५॥
प्रियत्वें ज्या प्रीति होय पुत्रवित्तादिकीं परी ।
तुटे काळें स्वप्रियत्व असें दु:खहिभोगितां ॥४६॥
हेम सर्व अलंकारीं ब्रम्हा तैसें चराचरीं ।
दृष्टी हेमावरी आधीं भूषणें मग दीसती ॥४७॥
हे श्रीगुरूकृपाउक्ती जोंवरी मनिं स्थीरता ।
सर्व ब्रम्हा ठसावे तैं समाधीस विशेष तो ॥४८॥
प्रिय आत्मा दु:ख देह दृढ निश्चय्जो असा ।
चित्त चित्स्वरुपाकार समाधि स्थिति ते असे ॥४९॥
विज्ञानमय हा कोश जेथ ब्रम्हाचि अद्वय ।
वैराग्यें आणि अभ्यासें सिद्ध आनंद कोश तो ॥५०॥
जागृती स्वप्न सुषुप्ती अव स्थात्रयतीत जे ।
तुर्या एकपणें पाहे तेव्हां अनुभवी असे ॥५१॥
समुद्रीं लहरी जैसी आत्मत्वीं वृत्तिही तसी ।
ल हरीच जळ जसें वृत्तीच ब्रम्हा तें तसें ॥५२॥
लहरी वृत्ति जे धांवे चित्समुद्रीं न त्या फुढां ।
सिद्ध अस ब्रम्हाजळ वृत्ती लहरिरूपि त्या ॥५३॥
आकार जो कल्पि मन तो निराकार बुद्धिस ।
विश्व जें इंद्रियां भासे बुद्धीस ब्रम्हा तें असे ॥५४॥
जेथें लक्षी शुद्ध सत्त्व ब्रम्हाची अन्य नाठवे ।
जेव्हां वृत्तीशून्य़ चित्त उन्मनी स्थिति ते मग ॥५५॥
लय आणिक विक्षेप विन्घ जें कल्पनात्मक ।
युक्ताहारविहारानें लय निद्रा न बाधते ॥५६॥
मोडे तत्त्व स्मृतीनें तो विक्षेपसह कल्पना ।
तेव्हां आनंद हा कोश सिद्ध होय न त्याविण ॥५७॥
घ्येय नसे अन्य शुद्धचैतन्यची असे ।
अनंतसुख अपार आनंदमय कोश तैं ॥५८॥
नाठवे अन्य कांहींच एक आत्मखुणे विना ।
आठवे जैं जें जितुकें आत्मा आपण तीतुकें  ॥५९॥
आत्मप्रतीतीमात्रच ना ते स्मृति न विस्मृती ।
आनंदाचा अनुभव कोश आनंद यास्तव ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP