मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - वनमाला

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


॥ अभंग. ॥

सद्नुरुरायाची अर्धमात्रा जाण ॥ तत्त्वमसी खूण सोहं मंत्रें ॥१॥
अजपें जपुनी शम दम दिल्हे ॥ जीवशिव केले एकाकारी ॥२॥
ईडा पिंगला शुशुम्ना चालवी ॥ सोहं मंत्र जाईचे ई मार्गीं ॥३॥
त्रिवेणीसंगमीं अनुहातध्वनी ॥ आहे निशिदिनीं वाद्य - गजरीं ॥४॥
कोटी सूर्य प्रभा कोंदाटली ॥ सत्रावी साधली जीवनकळा ॥५॥
अमृत संजिवनी कामधेनु आदणीं ॥ मंत्र सोहं मनीं साधीयेला ॥६॥
अखंड समाधी न मोडेची कधीं ॥ होती भेदबुद्धि गेली लया ॥७॥
सोहं मंत्राचा नेम व्रत धरी ॥ एकाग्रता करी भावबळें ॥८॥
तुर्या वोलांडुनी उन्मनी पावलों ॥ सोहं शब्द जाहालों गुरुकृपें ॥९॥
कोटी अश्वमेध घडती सोहंमंत्रीं ॥ पापाचे पर्वत भस्म होती ॥१०॥
रात्रंदिवा पाही धारणा चालवी ॥ एकवेळ होई रामयोगी ॥११॥
अखंड अभंग त्रिकुटी अनुभवी ॥ देहीं ब्रम्हास्वयें होई गुरुपुत्रा ॥१२॥
सद्नुरुचे शब्द वंदी वचन सदा ॥ पावे ब्रम्हापदा सच्छिष्य तो ॥१३॥
ब्रम्हाविष्णुरुद्र अंश दत्तात्रय ॥ जनीं जनार्दन दावी सोहं ॥१४॥
राजयोगी पूर्ण योगी जनार्दन ॥ एकनाथीं खूण मौन्यमुद्रा ॥धृ०॥१५॥

विश्रांतीचें स्थळ स्वरूप केवळ ॥ द्वैत तळमळ तेथें नाहीं ॥१॥
तेथें नाहीं काया नाहीं मोहमाया ॥ रंका आणि राया सारखेंचि ॥२॥
सारखें सदां सर्वदा स्वरूप ॥ तेंचि तुझें रुप जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वयें तूंचि आपणासी ॥ सोहं स्मरणासी न विसरतां ॥४॥
विसरतां सोहं स्मरण आपुलें ॥ मन गुंडाळेल मायाजाळीं ॥५॥
मायाजाळें तुझा तूंचि गुंतालासी ॥ यातना भोगिसी म्हणोनिया ॥६॥
म्हणोनिया होई सावध अंतरीं ॥ सोहं द्दढ धरीं दास म्हणे ॥७॥
पद.
सोहं हंसा म्हणजे तो मी तो मी ऐसें । हें वाक्य विश्वासें विवरावें ॥१॥
विवरावें अहं ब्रम्हास्मि वचन । ब्रम्हासनातन तूंचि एक ॥२॥
तूंचि एक आहे ऐसें महावाक्यें । परब्रम्हीं ऐक्य अर्थ बोध ॥३॥
अर्थबोध रामीरामदास झाला ।  निर्गुण जोडलें समाधान ॥४॥

ओही राम पच्छानोजी । मेरा कहना मानोजी ॥१॥
परनारीकु षंढ बना है । परनिंदाकु बेहरा ।
परधन देखा अंधा होवे । व्यापक तो (आपही है) जग सारा ॥२॥

सदा रहत उदासी, निंदास्तुति न जाने कोई । ये धेनु ये बाग न जाने, सब आत्मा है भाई ॥१॥
अभंग.
वसंतीं माध्यान्हीं रवितापें तापला । तो जाणे एकला छायासुख ॥१॥
क्षुधेचा ओणवा तो जाणे एकला । अकिंचन आणि कुटुंबाळ ॥२॥
तैसें त्रिविधतापें जो तापला । साधक तोची जाणे गुरुकृपा ॥३॥
तुका म्हणे चराचरांचे जीवना । जाणा नारायणा एक तुम्ही ॥४॥
पद
त्या देवाचें दर्शन घे ॥धृ०॥
सकलही दृष्या टाकूनि पहातां । निरालंबी हे रहाता रे ॥
प्राणापान ऊर्ध्वची वाहतां । आनंदभुवनीं मन हें रिघे ॥त्या देवाचें० ॥१॥
आदि अंत ना मध्य ना ज्याला । ज्यापासूनि ओंकारची झाला ॥
नेति नेति म्हणे वेद तयाला । ब्रम्हा विष्णुहि तिघे ॥त्या देवाचें० ॥२॥
अगम अगोचर सत्ता ज्याची सहज लीलाही त्याची रे ॥
स्वेदज, अंडज, जारज, उद्भिज, । ज्या प्रभूपासूनि निघे ॥त्या देवाचें० ॥३॥
रामदास म्हणे शून्याकार रूप नाहीं त्यासी आकार । परब्रम्हा तें निर्विकार ॥
अंतर बाहेर हें अवघे ॥त्या देवाचें० ॥४॥
महाके आखोंमे ताहाकु देख ॥ ताहाकु आखोंमे महाकु देख ॥१॥
उठत खैंचो बैठत खैंचो चालत बाट ॥ त्रिकुट शिखरपर औडी मारो नाथ दिखावे बाट ॥२॥
ओंव्या.
मन - पवनाला वश जाण ॥ अभ्यासें वश केलीया पवन ॥ सहजचि मन स्थिरावें ॥१॥
सहज झांकिलीया डोळा ॥ शिवदर्शनाचाच सोहोळा ॥ भोगीजे भलतीये वेळां ॥ भलतेथें ॥२॥
आकाराचे पैल तीरीं ॥ तुर्येचे माजघरीं ॥ वादाचे पैल मेरीं ॥ पर ब्रम्हा तें ॥३॥
अभंग.
घालोनी आसन करी एक मन । मेरुदंड जाण उभारावे ॥१॥
भ्रुकुटीपासुनी आंगोळीते चारी ॥ द्दष्टी करी स्थीर तये ठायीं ॥२॥
प्रथम प्रकाश चांदणें होईल ॥ मग तें दाटेल महातेज ॥३॥
तया तेजामाजीं जीवभाव जाय ॥ निर्विकल्प होय समाधी ते ॥४॥
दास म्हणे ज्याचें पूर्व पुण्य शुद्ध ॥ तया सी हा बोध होय बापा ॥५॥

जेथें ते थें देव रितां नाहीम ठाव ॥ ऐसा माझा भाव अंतरींचा ॥१॥
अंतरींचा देव अंतरीं ओळला ॥ विकल्प मोडला एका स्वरें ॥२॥
एक्या स्वरें जाहला लाभ आकस्मात ॥ ब्रम्हा सदोदीत सर्व ठायीं ॥३॥
सर्व ठायीं ब्रम्हा पंच भूत भ्रम ॥ धातुसंगें वर्म कळों आलें ॥४॥
कळों आलें वर्म आत्मनिवेदन ॥ ज्ञानें समाधान रामदासी ॥५॥
पद.
दाशरथे रामा हो येईं दाशरथे रामा ॥धृ०॥
नाममहिमा, नेणुनि वर्मा, गुंतले कामा ॥ हो दाशरथे रामा ॥१॥
निष्कामा तूं मेघ: श्यामा, नेशी निजधामा ॥ हो दाश ० ॥२॥
प्राणायामें जाणुनि नामा, विश्रांतिरामा ॥ हो दाशरथे रामा ॥३॥
पद.
रामउपासक आम्ही ॥ सद्नुरु नामउपासक आम्ही ॥धृ०॥
सगुण निर्गुण सबाहय राम भरला अंतर्यामीं ॥
भक्ती मुक्ती मोक्षासी नेणो त्याविणें गोष्टी रिकामी ॥रमा०॥१॥
नवविध भक्ती नवमी जाणो भजन आत्मारामीं ॥राम०॥२॥
प्रपंच परमार्थ चिंता भजन नामविश्रामीं ॥:
समाधान सुख निर्भय राहूं देहअयोध्याग्रामीं ॥राम०॥३॥
वदिन हनुमान संनिध सेवक केशरी रघुवीरस्वामी ॥
नाथपंथ हा सिद्ध आमुचा ब्रम्हा खरा जीव हा मी ॥राम०॥४॥
ओंव्या.
मुखीं घालोनी दांतखिळी । सैर आशा केली मोकळी ।
तें मौन नव्हे आंधळी । अविद्या माया ॥१॥
ऐसें ज्ञात्याचें मौन । साधकाचें श्रवण मनन ।
एवं झालें निरुपण । मोंनाचें ऐसें ॥२॥
करूनिया खपुष्प - माळा । कोण शोभें घालितां गळां ? ।
तैसा हा मायीक मेळा । येथें स्पृहा कैंची ? ॥३॥
पाप पुण्य हे कल्पना ॥ करुनी भेडसावी अज्ञाना ॥
बागुल जैसा बाळपणा । माजीं सत्य ॥४॥
पूर्ण समाधान ज्ञानें होय । त्याशी त्यागा म्हणणें काय ॥
आपेअ प सोडोनी जाय । कर्मची साधका ॥५॥
पर्वतासी लागतां अग्न । श्वापदांसी जा म्हणे कोण ॥
तैसें यथार्थ होतां ज्ञान । तरी मग क्रिया कोठें ? ॥६॥
ज्ञानें कर्म हें गळेना । आणि अज्ञान - बंध तुटेना ॥
तरी आडनांव ऐसें ज्ञाना । कां न म्हणावें ? ॥७॥
ब्रम्हाचि सत्य तेंचि आपण । हया सर्वांशी नुद्भवें मीपण ॥
तरी सत्यत्व कैंचें जरी  भासमान । मृगजळापरीं ॥८॥
एवं विषय नांव हें टाकितां । केवल ज्ञान उरें तत्त्वता ॥
ढळढळीत चिद्रूपता । देखे पदार्थामाजीं ॥९॥
असो देह मेले किंवा राहिले । पुण्य मार्गीं कीं पाप आचरलें ॥
तेणें समाधानाचें झालें । काय उणें ? ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP