मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि| मुक्तस्थिति साधन मुक्तावलि प्रात:स्मरण प्रात:स्मरण पंचरत्न स्तोत्र रामलक्ष्मणाष्टक तत्वमसि स्तोत्र अभ्यास मनोलय सहज समाधि संप्रात आणि असंप्रात समाधी द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी उत्थान लक्षणें मुक्तस्थिति कौपीनपंचक गुरुआज्ञा जनस्वभाव रामदासी अभंगसुधा श्रीसमर्थस्तवराज देवभक्त प्रणयकलह श्रीसंकर्षण स्तोत्र वनमाला रघुवंशावलि रामस्तव प्रकरण १ लें प्रकरण २ रे प्रकरण ३ रे प्रकरण ४ थे प्रकरण ५ वें प्रकरण ६ वें प्रकरण ७ वें प्रकरण ८ वें प्रकरण ९ वें प्रकरण १० वें प्रकरण ११ वें प्रकरण १२ वे प्रकरण १३ वें प्रकरण १४ वें प्रकरण १५ वें साधन मुक्तावलि - मुक्तस्थिति ’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत. Tags : abhangpadअभंगपद मुक्तस्थिति Translation - भाषांतर वाणी सैर बडबडी । परी द्वैत झालें देशधडी ॥वीट किंवा आवडी । दोनी नाहीं ॥१॥बरें वाईट न म्हणे । सत्य मिथ्या उच्चारुं नेणे ॥ मुखा आलें तें बोलणें । हेंचि मौन ज्ञात्याचें ॥२॥माझें गेलें मुखें वरळे । परी अंतरीं न कळवळे ॥ सूक्ष्म रूपें जो कां पिळे । देठ नाभीचा ॥३॥ध्यानीं किंवा व्यवहारीं । किंवा सुषुप्तीं माझारीं ॥वृत्तीचि असतां भलतीपरी । तरी निश्चय एकरुप ॥४॥तो एकलाचि एकपणें वीण । सर्वीं सर्वात्मा सर्व विसरून ॥जलतरंगेशीं चित्सागर पूर्ण । विलसतसे आपाआपणींया ॥५॥तरंग उठतांही पाणी । निमतांहि जीवन जीवनीं ॥ तैसी वृत्तीची उभवणी । होतां जातां आपण ॥६॥झालें समाधान बिघडेना । संशय कदाही अंतर स्पर्शेना ॥ध्यान करितां त्रिपुटि उपजेना । हेचि चरम स्थिति ॥७॥जरी प्राणांत केला अपकार । तरी दुष्ट न म्हणे हा नर ॥अपकारीया करी उपकार ॥ प्रशांति प्रकार या नांव ॥८॥जरी ठकुनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष - बळें ॥तें जाण ब्रम्हार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥९॥स्वकर्म - धर्म - वर्णाचार । करितांही निज व्यवहार ॥ज्यासी सर्व भूतिं मदाकार । तो भक्त साचार प्रिय माझा ॥१०॥ज्यासी सर्व भूति बुद्धि समान । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ॥तेंचि स्वानंद - समाधान । सत्य सज्ञान मानिती ॥११॥असो भलतैसे व्यापार देहाचे । वर्तणें घडों शुभाशुभ कर्माचें ॥ परी मी म्हणोनीया संघाचें । गुप्तही स्फुरण नसे ॥१२॥असो इच्छितां कीं न इच्छितां । अथवा कर्में घडति परापेक्षता ॥तीं सुखें घडोत देहासी आतां । ज्ञातया संबंध नाहीं ॥१३॥देह मज वाणी भलतैशी । वावरितांही पूर्व कर्मासरिसी ॥मी देह कीं कर्ता नुद्भवे मानसीं । हेचि मुक्त स्थिति ॥१४॥सर्व भूतिं भगवद्भजन । ऐसें ज्यासी अखंड साधन ॥त्या नराचा देहाभिभान । क्षणार्धें जाण स्वयें जाय ॥१५॥क्रिया कांहीं न व्हावी । ऐसें ज्ञानिया वाहे जीवीं ॥तरी अखंडैक रस चवी । चाखिलीचि नाहीं ॥१६॥जंव जंव उमठे भेदु । तंव तंव दुणावे अभेदु ॥म्हणजे भेदाचे छंदें स्वादु । आपलाचि लाहे ॥१७॥एवं आत्मविदासी जाण । कायसें क्रिया - उगेपणा ॥स्वभावें समाचरण । तेंचि निकें ॥१८॥क्रिया अथवा उणेपण । हें देहसंबंधीं भान ॥तरी देहभानची आण । पडली तयासी ॥१९॥म्हणोनी साधकांप्रती सांगितलें । कीं देहात्मवत् ब्रम्हात्मत्व झालें ॥तयाचें वर्तणें अशुभ किंवा भलें । परी मुक्त नि:संशयें ॥२०॥कोणताही भोगितां विषय । मी ऐसा नव्हे प्रत्यय ॥आपण असंग हा निश्चय । सद्दढ झाला ॥२१॥उठे किं निमे जरी संकल्प । परी नामरूप न स्फुरे कदा अल्प ॥एकरूप ब्रम्हात्मा सच्चिद्रूप । भलतेही आवस्थे ॥२२॥भूतिं भगवंत परिपूर्ण । ऐसें जाणोनी आपण ॥भूतांसी लागे अतिदारूण । तें कठीण वचन बोलेना ॥२३॥बहूत काय स्थिति बोलावी । मागील क्षणही नाठवी ॥पुढील क्षणाची उठाठेवी । सहसा नाहीं ॥२४॥प्राप्त तितुकें करावें । अप्राप्त तें टाकावें ॥भोगिलें तें न स्मरावें । होणार न चिंती ॥२५॥अथवा गत गोष्टी बोलतो । पुढें अमुक करूं म्हणतो ॥परी सुखदु:खें शिणेना तो । इतरा ऐसा ॥२६॥अथवा अतीत अनागत । काय म्हणोनि कोणी पुसत ॥तरी चिद्रूप समस्त । उत्तर दिलें ॥२७॥असो ज्ञाता सर्व करिता । पापपुण्याची नसे चिंता ॥बरे वाईट भोग येतां । भोगितो सुखें ॥२८॥वृत्ति उठतांची चैतन्य खचित । त्यामाजीं विश्व हें उमटत ॥परि तेंहि पाहे निश्चित । अस्तिभाति प्रियत्व ॥२९॥वृत्तीचा उद्भव अथवा लय । होतांही आपण अद्वय ॥जीवन्मुक्त नि:संशय । क्रिडे येणें रीतिं ॥३०॥आकाश कोसळोनि पडे । धरणी रसातळीं दडे ॥परी समाधान न मोडे । पुर्ण चिन्ह ज्ञात्याचें ॥३१॥देह जाये अथवा राहे । सुख किंवा दु:ख साहे ॥परी समाधाना भंग नव्हे । पूर्ण चिन्ह ज्ञात्याचें ॥३२॥सकलही व्यवहारीं वर्ततां प्राक्तनानें । क्षणभरि भगवंतावीण जो अन्य नेणे ॥विलसत ई मुनि जैसे ते शुकादि विदेही । सनक जनक तैसा शोभतो येथ हाही ॥३३॥श्लोक ॥ कदाचित् सत्वस्थ: क्वचिदपि रजोवृत्तिषु गत:, तमोवृत्ति: क्वापि त्रितयरहित: क्वापि च पुन: ॥कदाचित् संसारी श्रुतिपथविहारी क्वचिदहो, मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततम: ॥३४॥आत्मानुसंधिगलिताखिलवासना यो, विस्मृत्यविश्वमखिलं स शरीरमेतत् ॥खादन् हसन भ्रमणमाकलयञ्च शेते, श्रीदेशिकेंद्रकरूणालयद्दष्टिद्दष्ट: ॥३५॥ N/A References : N/A Last Updated : September 10, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP