मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|
द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी

साधन मुक्तावलि - द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


सर्व द्दश्य सानथोर न स्मरतां । अखंड एकरूप तें द्दश्यानुविद्धता ॥
शब्दादि चंचळ किमपि नाठवितां । ब्रम्हारूप तो शब्दानुविद्ध ॥१॥
द्दश्य पाहतां द्दश्य न स्फुरावें । हें द्दश्यानुविद्धाचें रूप जाणावें ॥
यासी एक वैराग्य असावें । विवेकासहित ॥२॥
स्फूर्त्यादि चंचळ हे सर्व उठता । हे मी आणि न यावी या सत्यता ॥
मी यांत असूनि स्मरे या परता । हा शब्दानुविद्ध ॥३॥
एवं द्दश्यही पाहत असतां । नामरूप उद्भवती ना तत्त्वतां ॥
हाचि द्दश्यानुविद्ध समाधी पहातां । असे एकरूप ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP