मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि| अभ्यास साधन मुक्तावलि प्रात:स्मरण प्रात:स्मरण पंचरत्न स्तोत्र रामलक्ष्मणाष्टक तत्वमसि स्तोत्र अभ्यास मनोलय सहज समाधि संप्रात आणि असंप्रात समाधी द्दश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधी उत्थान लक्षणें मुक्तस्थिति कौपीनपंचक गुरुआज्ञा जनस्वभाव रामदासी अभंगसुधा श्रीसमर्थस्तवराज देवभक्त प्रणयकलह श्रीसंकर्षण स्तोत्र वनमाला रघुवंशावलि रामस्तव प्रकरण १ लें प्रकरण २ रे प्रकरण ३ रे प्रकरण ४ थे प्रकरण ५ वें प्रकरण ६ वें प्रकरण ७ वें प्रकरण ८ वें प्रकरण ९ वें प्रकरण १० वें प्रकरण ११ वें प्रकरण १२ वे प्रकरण १३ वें प्रकरण १४ वें प्रकरण १५ वें साधन मुक्तावलि - अभ्यास ’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत. Tags : abhangpadअभंगपद अभ्यास Translation - भाषांतर मुखें देह मी नव्हे म्हणतां । नव जाय गा हे बद्धता ॥येथें अभ्यास द्दढ होता । देह - ममता गळे ॥१॥आरंभीं नेत्राचें देखणें त्यागावें । तें संकल्पावरी आणावें ।तेंचि पुढें संकल्प पहावें । स्फूर्तीच्यायोगें ॥२॥नंतर तया अति सूक्ष्मा स्फू रणा । चिद्रूप आत्माचि देखणा ॥तो लयउद्भव साक्षी अनुमाना । स्फुरणाच्या यावा ॥३॥ज्या क्षणीं ओ विषय । वृत्तीस होईल प्रत्यय ॥त्या क्षणींच मिथ्या निश्चय । केला पाहिजे ॥४॥‘अहं ब्रम्हास्मि’ चा विसर । पडोंचि नये निमिष मात्र ॥मग कैचा होईल यया अवसर । देहाचे मीपणासी ॥५॥चालतां बैसतां भाषण करितां । कीं अन्य भोजनादि क्रिया समस्तां ॥शयनीं पहातां कीं ऐकतां । स्मरण मात्र असावें ॥६॥येथवरी प्रतिज्ञा वृत्तीनें करावी । कीं निमिषार्ध जरी विस्मृति व्हावी ॥तरी मज गुरुहत्या संभवावी । ब्रम्हाहत्यादि जो अनंत ॥७॥नामरूप भासतांचि त्यागावें । सच्चिदानंदत्व स्थापावें ॥दिसेल तें तें सहज पाहावें । आग्रही टाकुनी ॥८॥नामरूप परतेंचि सारावें । भेदाचें नि:संतानचि व्हावें ॥एकरूप सच्चिदानंदचि स्मगवें । किमपि विसर न होतां ॥९॥नामरुपात्म स्फुरण । उठतांचि तया ओळखुन ॥तें तें मिथ्यात्वें विदारून । निजांगेंचि व्हावें ॥१०॥संकल्प उठो कीं राहो जावो । परी त्या सत्यत्व न द्यावें येवो ॥आणि दुसरा नाहींच उपावो । स्मरण असावें मिथ्याचें ॥११॥इकडे स्मरावा ब्रम्हात्मा आपण । जो लय साक्षी निर्विकल्प परिपूर्ण ॥आणि उठतांति संकल्प स्मरण । मिथ्यात्वाचें असावें ॥१२॥वृत्ति उठो कीं मनबुद्धि उठोनी । इंद्रियद्वारां प्रवर्तो विषयग्रहणीं ॥परी पाहों नये सच्चिदानंदावांचोनी । नामरूपादिभेद ॥१३॥जे पाहिजे ते व्यापार व्हावे । बुद्धयादि देहांत आघवें ॥तीहींही आवस्थेमाझीं न स्फुरावें । देहात्मत्व गुप्तही ॥१४॥ब्रम्हा तरी सदा अनुभवावें । परि अनुभविते आपण न व्हावें ॥हेंचि मुख्यत्वें वर्म जाणावें । समाधानाचें ॥१५॥भलते समयींही चुकूनी । अनुभवितां स्फुरूं नये मी म्हणोनि ॥अनुभाव्य जे का पूर्णपणीं । ते नि:संशय आपण ॥१६॥आणि असंगत्व जें आपुलें । कदापि न जावें विस्मरिलें ॥परि तुझें निर्विकल्पत्व संचलें । राहे सविकल्प उद्भवतां ॥१७॥बुद्धीनें अथवा मनानें । किंवा नुसतिये वृत्तिनें ॥अहंब्रम्हा साभिमान घेणें । तरीच निश्चय द्दढ होय ॥१८॥अनंत जन्मीं अनंत साधन । करितां देहबुद्धि नव्हे न्यून ॥जरी लय साक्षी ज्ञान झालें । आणि अहंब्रम्हा नाहीं स्फुरलें ॥तरी देहबुद्धीसी क्षीणत्व आलें । न घडे सहसा ॥२०॥जरी ब्रम्हाज्ञानही झालें । सर्वांवेगळें लयसाक्षित्वही कळलें ॥तरीही पूर्वाध्यासें शुभाशुभ घडलें । घेईल माथा ॥२१॥अपरोक्षे ज्ञान ब्रम्हात्मयाचें । झालें विचारें लय साक्षित्वाचें ॥तत्क्षणीं निर्मूळ मीमाझेंपणाचें । नव्हे सहसा ॥२२॥पूर्वींल ध्यासें देहासी मीपण । घेऊन उठेल वृत्ति उद्भवून ॥जरी कळलें अहंब्रम्हा म्हणून । तरी घेतां न राहे ॥२३॥तेचि प्रारब्धभोगाचिया बळें । मन बुद्धि इंद्रियद्वारा उसळें ॥शुभाशुभ घेतां विषय सोहळे । परी विस्मरण पडूं नये ॥२४॥हे देहबुद्धि तेव्हांचि हरे । जई ब्रम्हात्मज्ञान साचोकारें ॥ब्रम्हात्मज्ञानही होय निर्धारें । निपटून देहबुद्धि जातां ॥२५॥तस्मात् अहंब्रम्हास्मि विशेष वृत्ति । घेतिली पाहिजे साधकें निश्चितीं ॥तरीच क्षीण होईल अवगति । हे देहबुद्धिरूप ॥२६॥तस्मात् खरे जयासी तरणें । तेणें सदा असावें अनुसंधानें ॥तरी ब्रम्हात्व द्दढ होऊनि जाणे । गळून देहबुद्धि ॥२७॥वृत्तिसि अज्ञानें अन्य देहादिकाचा । ध्यास बैसोनि गेला द्दढचि साचा ॥तो जाईल जेव्हां हा खल होईल वृत्तीचा । अहंब्रम्हास्मि म्हणोनि ॥२८॥वृत्तिसि खळ तो हाचि ऐसा । अहंब्रम्हास्मिचिया उल्हासा ॥ विस्मरचि न पडावा सहसा । साभिमानही घ्यावा ॥२९॥तुझें माझें आणि हें तें त्याचें । ऐसे भिन्न चिद्रूप न पहावें साचें ॥एकचि अधिष्ठान ब्रम्हा सर्वांचें । तूं मी हा हें टाकुनि ॥३०॥द्वैतभाव सांडूनि दूरिं । आपणची चराचरीं ॥ऐसा आभ्यास जो द्दढ करी । निजांगें ब्रम्हा होय जो ॥३१॥जोंवरी विचार उद्भवेना । तोंवरी ऐक्य कदा घडेना ॥कर्तृतंत्ररूप अनुसंधाना । विचार होय तों असावें ॥३२॥अगा दूरीं कोठें नव जावें । तपादि नलगे साधावें ॥एक नामरूप त्यजूनि पहावें । तरीच पावावें शुद्धब्रम्हा ॥३३॥स्फुरणासि मिथ्या पाहावें । साक्षीमात्रें आपणा घ्यावें ॥ऐसेचि काळ आभ्यासावें । अहं कर्तृत्व निमें जों ॥३४॥आभ्यासें सर्वदा वृत्ति खलावी । द्वैताची उर्मीच न उठावी ॥आपुली ब्रम्हाता द्दढ करावी । श्रद्धावान् जो तेणें ॥३५॥आहे तें ब्रम्हासद्रूप । दिसें तें ब्रम्हाचिद्रूप ॥ प्रिय ते ब्रम्हानिर्विकल्प । सविकल्प नाहींच नाहीं ॥३६॥सर्वदा ब्रम्हापणेंचि असणें । देहबुद्धीसी कदा ना स्पर्शणें ॥तयातेंचि मी भजन करणें । येर तें करणें साधनाभ्यास ॥३७॥तत्काळ पावावया ब्रम्हा पूर्ण । सांडूनिया दोषगुण ॥सर्वभूतीं भगवद्भजन । हेंचि साधन मुख्यत्वें ॥३८॥तरी द्दश्य आणि दर्शन व्यक्ती । सांडूनि घेईजे सुख संपत्ति ॥केवळ आत्मसुख गा सुमती । जाण निश्चितीं आन नाहीं ॥३९॥जें विषयदर्शनें सुख उपजे । तेंचि विषयत्यागें निर्वाह कीजे ॥ तरी तेंचि आत्मसुख जाणिजे । नाहीं दुजें तयावीण ॥४०॥सर्वत्र सुख नामें जें जें बोलती । तें तें आत्मसुख जाण निश्चितीं ॥परी तें अल्प झालें विषयसंगतीं । विषयिक म्हणती आत्मसुखते ॥४१॥आपण आपणातें असंग ओळखितां । हें सर्व मिथ्या होय कर्मेंही घडतां ॥ मी कर्ता ही ऊर्मीच नुठतां । घडलें तें व्यर्थ जाय ॥४२॥एवं त्रिपुटीचें खंडन होता । मग निजांगोंवि ब्रम्हा तत्त्वतां ॥यांचीं नांवें द्दढा परोक्षतां । ऐक्यता अभिन्न ॥४३॥मुख्य ऐक्यत्व कदा न भंगावें । नामरूपादि भेद न व्हावे ॥मग स्मरेल त्या युक्तिनें स्मरावें । ब्रम्हात्मत्व द्दढ व्हावया ॥४४॥बहुत कासया बोलणें । देहबुद्धि वाढेल जेणें गुणें ॥तो धर्म असतांही त्याग करणें । शास्त्रीय अथवा लौकिक ॥४५॥देहाची वर्तणूक असो भलतैसी । हें पाहोंचि नको सोडूनि आभ्यासासी ॥पावशील पूर्ण समाधान सहज स्थितीशी । आमुचे आशिर्वादें ॥४६॥अहंब्रम्हा जरी यथार्थ कळें । तरी हें प्रतिदिनीं सहज उफाळें ॥अनायासोंचि देहाभिमान गळे । यदर्थीं संशय नाहीं ॥४७॥तस्मात् रविदत्ता अपरोक्षज्ञान । जाहलि याही हा धरी साभिमान ॥निमिष एक न पडावें विस्मरण । तरीच देहबुद्धी गळे ॥४८॥मन प्राण देह इंद्रिय । नामें मात्र कल्पूं नये ॥आहे तें ब्रम्हा अद्वय । अससी हा भ्रम टाकी ॥४९॥ज्वाळेसहित अग्नी । कीं तरंगासहित पाणी ॥तैसा तूं आपणालागुनी । जाणे वृत्तिसहित ॥५०॥जळें काय सांडिले तरंग । कीं आकाशें दवडिलें मेघ ॥मनादि हे तुझेचि अंग । केवी सांडूं पाहसी ॥५१॥जें जें दिसतें भासतें । ब्रम्हाचि कां नव्हे तें तें ॥अखंड ध्यानचि ऐसें । विचारें कळें ॥५२॥जें जें तत्त्व समोर भेटें । तें तें मीच ऐसें वाटे ॥तरी मग द्वैताचें तुटें । मूळ अनायासें ॥५३॥मुख्य तृप्ति व्हावी गहन । तैसेंचि व्हावें समाधान ॥तें न होतां वाउगें भाषण । कधींच न सरें ॥५४॥तस्मात् ऐसें न करावें । खरेंच जयाशी मुक्त व्हावें ॥ तेणें आगत्य आभ्यासावें । बोलिल्या रीतीं ॥५५॥अभ्यासीं होय प्रवृत्ति । चढती क्षणक्षणा प्रीति ॥तेणें कर्माची समाप्ति । करोनि हेंचि आचरावें ॥५६॥अभ्यासावीण न घडे कदां । न तुटे देहबुद्धीची आपदा ॥ न जोडे वस्तुतंत्रत्व संपदा । हेंही सत्य सत्य ॥५७॥साधनेवीण ब्रम्हा होतां । लागूं पाहे देह सत्य सत्य ॥५७॥साधनेवीण ब्रम्हा होतां । लागूं पाहे देह ममता ॥आळस प्रबळे तत्त्वतां । ब्रम्हाज्ञानमिसें ॥५८॥परमार्थमिसें आळस जागे । ध्यानमिसें निद्रा लागे ॥मुक्तिमिसें दोष लागे । अनिर्गलता ॥५९॥निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद घडे ॥उपाधिमिसें येऊनि जडे । आभिमान आंगीं ॥६०॥नि:शेष मीपण उठूं राहिलें । आणि देह तरी वर्ते रीतीं पहिले ॥तरी मग जाणावें मीपण गेलें । माझेपणासहित ॥६१॥धनस्त्रीपुत्र-हानी । होतां जरी परोक्ष मानी ॥गेलें आलें नाठवें मनीं । तरी माझेपण गळालें ॥६२॥पाप तरी खंती नुपजे । पुण्य होतां बरें नेणिजे ॥हेंही अंतरींच समजे । जयाचें तया ॥६३॥नि:शेष मीपण उठतां राहिलें । ऐसें खरेंपण प्रत्यया आलें ॥तरी मग जाणावें नि:संतान झालें । विश्वाभिमानाचें ॥६४॥अंगें (ब्रम्हा) असतां चिंतूं लागला । तया चिंतनासी भ्रम असें बोलिला ॥पुढें स्मरतां न स्मरतां अंगें झाला । वस्तुतंत्र ब्रम्हा ॥६५॥देह तादात्म्या झालें द्दढ । यास्तव वाटे हे (आभ्यास) आवघड ॥मीपणाचा झडता मोड । तरी त्यासि हे सुगम ॥६६॥येर विद्या होऊनि विसरती । तैसी नव्हे हे अपरोक्ष संपत्ति ॥एकदां झालिया वर्धमान होती । कदा क्षीण नव्हे ॥६७॥तस्मात् प्रयत्न प्रवृत्तिचा न करावा । घडणार तें घडेल स्वभावा ॥परंतु निवृत्तिरूप मोक्ष स्वभावा । प्रयत्नेवीण नव्हे ॥६८॥प्रारब्धाधीन मोक्ष नाहीं । कारण कीं, अभोक्त आत्मा विदेही ॥तो कळावा विचारें नि:संदेही । तेथें सुखदु:खें आटती ॥६९॥श्रीराम जयराम जयजय राम । ऐसा कांहीं एक धरूनि नेम ॥जप कीजे तेणें आत्माराम । जोडेल नेमें ॥७०॥जप नेमिला तो चुकों न द्यावा । त्यावेगळा सर्वदा स्मरावा ॥मळ त्यागितांही न विसंबावा । कर्मठपणें करूनि ॥७१॥ऐसें अखंड नाम स्मरावें । परी दुसरियास कळों न द्यावें ॥ऐसा निजध्यास झालिया राघवें । पाविजे तात्काळ ॥७२॥एकाग्र करूनिया मन । अंतरीं करावें ध्यान ॥सर्वांग पूजा (मानस) विधान ॥ प्रत्यईं कीजे ॥७३॥नित्य नेमिला जो जप । त्रिकाळ दर्शनिं साक्षेप ॥आदित्य मारुतीचें रूप । अवलोकावें ॥७४॥हरीकथा निरूपण । प्रत्यईं करावें श्रवण ॥ हेचि जाणावी खूण । नित्य नेमाची ॥७५॥अशक्त होऊनिया प्राणी पडे । तेव्हां नित्यनेम न घडे ॥तेणें बळेंचि नेमाकडे । चित्त न्यावें ॥७६॥नित्यनेमाचा आभ्यास । नेम चुकतां कासावीस ॥ तोचि लागे निजध्यास । अंत - समयीं ॥७७॥पूर्वीं काय झालें तें आठवों नये । पुढील कांहीं चिंतूं नये ॥स्वभावें होईल तें भोगीत जाये । सहज पाहे चेंचिरें ॥७८॥देह आजीच जावो । अथवा चिरंजीव राहो ॥परी याचा कांहीं नसावा मोहो । स्मरावा देवो श्रीकृष्ण ॥७९॥जें जें होईल ज्या वेळें । तें तें भोगावें प्रारब्ध - बळें ॥प्रयत्न सांडूनि प्रेमबळें । मानी वेगळा आपणासी ॥८०॥जें कांहीं मजपासोनि होतें । ऐसें तूं म्हणों नको आपणातें ॥जैसें चुंबक चाळवी लोहातें । तैसें गुणसत्तें तुझेनि ॥८१॥शुभाशुभ कर्में होती । तीं गुणयोगें जाण चत्तीं ॥म्हणोनि निंदा आणि स्तुति । सांडोनि कृष्णभक्ति करावी ॥८२॥जे गुण चेष्टे ते नेणती । ते निंदा स्तुती वरपडे होती ॥जे गुणर्मातें जाणिती । ते सांडिती अभिमाना ॥८३॥त्या एकत्विं मीपण । तेचि व्यभिचार भक्ति जाण ॥मजसगट हा भगवान । तोचि जाण अव्यभिचारू ॥८४॥नित्य नैमित्यक कर्म करी । परी खटाटोप नाहीं शरीरीं ॥अखंड नामें गर्जना करी । तोचि निर्धारीं शौच्य कीं ॥८५॥आतां अमुक मी श्रवण करीन । ऐसें नुरावें अश्रुत वचन ॥या नांव बोलिजे श्रवण । अभिन्न आपण निश्चयें ॥८६॥या श्रवणा नाम खरें श्रवण । येर ऐकणें बोलणें बाष्कळपण ॥हें ब्रम्हाविदांचें सत्य सत्य वचन । कल्पित माझें नव्हे ॥८७॥जरी पराधीन देह असतां । तरी वाणी - मनावरी कोणाची सत्ता ॥कार्यापुरतें योजावें तत्त्वतां । येर्हवीं अक्षयीं गुरु - भजनीं ॥८८॥कवणासी उद्विग्न न करी । सत्य प्रीय सर्वां सधुरोत्तरीं ।किंवा वदे वेदाम्त - चर्चा निर्धारीं । हेंचि तप वाणीचें ॥८९॥बहुत बोलणें नको समूळीं । अन्यकाळीं कीं मैथुनकाळीं ।अथवा भलतैशा मेळीं । ध्याना विसरूं नये ॥९०॥त्या क्षणींच (भोग घडत असतां) तादात्म्या न पावें । तरी तें पुढें त्या कैसें बाधावें । तस्मात् ध्यानानुसंधानें असावें । सर्वदा मुक्त ॥९१॥शयनीं कीं चालतां बैसतां । अथवा अनेक कर्में करितां । जरी पापकर्मासी रत असतां । ध्यान करितां सुटे ॥९२॥निजलें असतां ध्यान करावें । मार्गीं चालतां अनुसंधान राखावें । किंवा भलते ठायीं जरी बैसावें । तरी ध्यानीं असावें तत्पर ॥९३॥मुख्य अंतर - वृत्ति गुरुरंगें रंगली । बाहय वर्तणूक स्वप्नापरी नाथीली ।मग चिन्हें ( रुद्राक्ष भस्म वगैरे) वागविलीं कीं न वागविलीं । त्यासी चाड नाहीं ॥९४॥मात्र अंतर - वृत्ति सद्दढ व्हावी । बाहय चिन्हांची नको उठावेवी ।तेवीं शास्त्रवचनेंही त्यागावीं । बहिरंग क्रियेचीं ॥९५॥सवृत्तिक ज्ञान ऐसें । सर्व दिसतांही भेद नसे । स्वरूपीं वृत्तीग्रहण कैसें । संभवे बापा ॥९६॥बहुत कासया बोलावें । स्वरूपीं जाणणेंची न संभवें । येथें विचारेंचि अभिन्न व्हावें । ज्ञान तेंही ताकूनी ॥९७॥अंगें वस्तुरूप झाला । संशय अवघा निमाला ॥मग जो कार्यभाग दिसला । तो तो आपणच वाटे ॥९८॥अभ्यासावीण न घडे कदां । न तुटे देहबुद्धीची आपदा । न जोडे वस्तुतंत्रत्व संपदा । हेंही सत्य सत्य ॥९९॥तस्मात् खरें जयासी तरणें । तेणें सदा असावें अनुसंधानें । तरी ब्रम्हात्व द्दढ होऊनी जाणें । गळून देहबुद्धि ॥१००॥जागें होतां पुन: झोपेवरी । देह असो भलतैसे व्यापारीं ॥परी विस्मरची पडूं नये तिळभरीं । आपुले असंगत्वाचा ॥१०१॥ऐसा ग्रंथिभेद झालियानंतर । तयाचा जो होय क्रिडा - विहार ॥तो सर्वही असें निर्विकार । जीवन्मुक्तिसुख तेंची ॥१०२॥ N/A References : N/A Last Updated : September 10, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP