मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग १४० ते १४३ अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ श्री जगदंबेचे अभंग - अभंग १४० ते १४३ श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर श्री जगदंबेचे अभंग Translation - भाषांतर १४०. जय जगदंबे नवदुगें आई । चित्त तुझे पायीं लागों माझें ॥१॥लागो मज आत्मध्यान निरंतर । न पडो विसर कदा काळीं ॥२॥कदाकाळीं कांहीं नावडो आणीक । आपणचि एक प्रिय वाटो ॥३॥प्रिय वाटो मज आत्म भक्ती सदा । संसार आपदा न भोगितां ॥४॥न भोगितां देह मीपणाचे जाच । आत्म कृपा साच करूनियां ॥५॥करूनिया माझें नित्य समाधान । दावी अनुसंधान आनंदाचें ॥६॥आनंद अखंड कृष्ण जगन्नाथ । धरुनी आत्मपथ आंगें घोटी ॥७॥१४१. आत्म कृपा द्दष्टी केव्हां करिसी माते । मज अनाथातें आनंदाया ॥१॥आनंदाया चित्त दाउनि आत्म हीत । केव्हा ह्रदयांत सुखविसी ॥२॥सुखविसी कदा आत्म बाळकासी । निश्चय मानसीं हाचि माझा ॥३॥हाचि माझा हेतु पुरविसी कदा । हरुनी आपदा संसाराची ॥४॥संसारिंचा धंदा घाली भवबंधा । लाउनिया छंदा विषयांच्या ॥५॥विषयांचा सोस देतो गर्भवास । पुरे पुरे त्रास वर्णवेना ॥६॥वर्णवेना आहें आत्म धैर्यावरी । धांव झडकरीं जगदंबें ॥७॥जगदंबे कदा आत्म भेटी देसी । अंकावरी घेसी प्रेमें कदा ॥८॥प्रेमें कदा विष्णु कृष्ण जगन्नाथा । लाविसी । गुणगाथा वर्णावया ॥९॥१४२. रात्र दिवस तुझें करिती जे ध्यान । तयांचा अभिमान धरिसि आंगें ॥१॥आंगें भजे त्यांच्या संगें तूं अससी । अखंड जागसी ह्रदयीं सदां ॥२॥सदा सर्वकाळ तुझें नाम गाती । त्याची पक्षपाती वधिसी दुष्टां ॥३॥वधिसि दुष्टां हे तों पुराणीं ऐकीलें । म्हणुनी हाकीलें धांव वेगीं ॥४॥धांव वेगीं माझे जगदंबे आई । पहासी तूं काई अंत माझा ॥५॥अंत माझा पाहूं नको नवदुगें । दुष्टांच्या संसगें मळलों भारीं ॥६॥मळलोंसे भारीं कळविलें तूज । नको पाहूं चोज येईं ॥७॥येईं येईं वेगीं धांऊनिया माते । जोडीलिया हातें विनवीतों ॥८॥विनवितो कृष्ण जगन्नाथ भावें । आत्म दर्शन व्हावें सदोदीत ॥९॥१४३. गंगा यमुना हो सांगतसें ऐका । कधीं सोडूं नका एकांतातें ॥१॥बैसुनी एकांतीं विचार करावा । शोध बरा ध्यावा आप आपणा ॥२॥जें जें डोळां दीसे तें तें सर्व नासे । सदोदित असे आपणची ॥३॥उठल्या वृत्तीचा आपण तो साक्षी जाणोनियां रक्षीं साधन हो ॥४॥आपण तों एक वृत्ती त्या अनेक । वृत्तींचा कलंक मज नाहीं ॥५॥मज पुढें वृत्ती मी आहे त्या पाठीं । विचारहा पोटीं द्दढ धरा ॥६॥द्दढ धरा साक्षी कल्पना उठतां । आपणा जाणतां समाधान ॥७॥समाधानासाठीं सेवावा एकांत । ग्रंथ परमामृत विवरावा ॥८॥विवरावें संत साधूंचें वचन । कृष्ण पदीं लीन विष्णू कृपें ॥९॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP