मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग १११ ते १२० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग १११ ते १२० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग १११ ते १२० Translation - भाषांतर १११. तो मज सांपडला तूं आजी । ज्याचे चरण ब्रम्हा पूजी ॥१॥झाला वंशाचा उद्धार । आपण भेटला जगदोद्धार ॥२॥तुज गाइन नित्य वाचे । तेणें समाधान होय या जिवाचें ॥३॥तुझें दर्शन घेइन डोळां । होय आनंदाची वृद्धी वेळोंवेळां ॥४॥तुझ्या चरणीं ठेउनि माथा । करिन सेवा विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥११२. डोळे यांचा न पुरे प्रेमा । तुज पाहुनियां श्रीरामा ॥१॥सर्व सुखाचें निधान । आपण माझें समाधान ॥२॥झाला आत्म लाभ मोठा । आपण विरहित प्रपंच हा खोटा ॥३॥त्या तुज निरखिन वेळोवेळां । सांडुनि मायेच्या या खेळा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । आत्म वियोग न घडविं कधीं आतां ॥५॥११३.कठिण आहे अंतकाळ । कोण जाणें कैसी वेळ ॥१॥तरि मज न पडों दे विस्मृति । अखंड स्फुरवीं आत्म स्मृति ॥२॥सच्चिदानंद आपण सारा । प्रगटुनि दे स्वरुपीं थारा ॥३॥पुढति पुढति हेचि विनंति । नुरविं जन्म मरणाची खंति ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा रामा । माझा तुजवरि जडविं प्रेमा ॥५॥११४. प्रभो हे अयोध्यानाथा रामराजा । जानकिसह माझ्या ह्रदयीं राही ॥१॥ग्रंथ रचना स्फूर्ति स्फुरवुनियां मज । नुरवी दु:ख बीज आत्म बळें ॥२॥सर्वार्थीं सहाय होईं रे मारुती । राम सितापती देखावया ॥३॥तुजवीण माझें साधी कोण काम । आपण एक राम भेटावया ॥४॥आत्म प्रीतीं विष्णु कृष्ण जगन्नाथा । आहे हें सामर्था जाणसी तूं ॥५॥११५. सुखमय आहे प्रपंच हा सारा । नलगे जरी वारा अभिमानाचा ॥१॥एक अभिमान नाडितो सर्वांसी । दावि दु:ख राशी कल्पुनीयां ॥२॥कल्पुनी मी माझें फिरवी दारोदारीं । नाचवितो संसारीं एकलाची ॥३॥रडवी हांसवी बैसवी उठवी । करी उठाठेवी एकटाची ॥४॥पडुनि याच्या तोंडीं जीव झाले मुर्ख । भ्रमती सच्चित्सुख विसरोनी ॥५॥सज्जन जाणती जयाचा अभाव । सुषुप्तींत नांव नाहीं याचें ॥६॥अवस्थात्रय साक्षी सच्चित्सुख तूं एक । जरी हें अनेक विश्व भासे ॥७॥तो तूं माझ्या हाकीं ग्रासुनी मीपणा । उघड आपणा कळवीं रामा ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथा तुज ठावें । मुळ जें उपटावें मी पणाचें ॥९॥११६. कां रे रामराया अजुनी तुं न येसी । मौज पाहतोसी काय माझी ॥१॥माझी अनाथाची पहातोसी मौज । हेंची मज चोज वाटतसें ॥२॥ऐसें न करीतां धांवूनियां येईं । आत्म भेटी देईं रामा मज ॥३॥तरिच होय माझ्या जिवा समाधान । आनंद निधान तूंचि माझें ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा सुखधामा । भेट दे श्रीरामा दयानीधे ॥५॥११७. न सुचे करावा कोणता ऊपाय । आत्म भेटि होय जेणें मज ॥१॥नाशिवंत क्षणभंगुर हे काया । कधीं पद ठाया पाहेन मी ॥२॥ऐसी आपणाची लागली तळमळ । तुज ना कळवळ कैसी माझी ॥३॥दे रे भेटी रामा बारे आनंदघना । आपणाविण मना सुख न वाटे ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा पूर्ण कामा । संत मनो विश्रामा भेट वेगीं ॥५॥११८. तुजसाठीं जीव होतो कासावीस । जानुनि तूं जानकीश कां न येसी ॥१॥येतां वाटे तुज सांपडले संत । काय माझा अंत देखसी तूं ॥२॥अंत नको पाहूं दीनाचा या माझा । आपण रामराजा जिवन माझें ॥३॥न करिं विलंब ये झडकरीं आतां । स्वामी सिताकांता रामराया ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा झालों कष्टी । करुनी कृपाद्दष्टी यावें स्वामी ॥५॥११९. कोण मी हा मज कळेना श्रीरामा । नाहिं माझा प्रेमा जेव्हां तुज ॥१॥जरी असता प्रेमा धांउनी तूं येता । कळतें मज सीताकांता रामा ॥२॥न येसी तूं जेव्हां खरा ठरलों पापी । म्हणो तरि अद्यापी निश्चय नोहे ॥३॥पापी मी जरी साचा राम गातों वाचा । आत्म दर्शनाचा हेतू मज ॥४॥पुण्यवंत म्हणा ऐशी साझी दशा । आत्म भेटी आशा परली नाहीं ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा हा घोटाळा । नुरवीं आत्मकळा दाउनि मज ॥६॥१२०. उगीच रहातां येना मज आतां । काय सिताकांता करुं मी सांग ॥१॥सांग पुढें माझी कैसी होय गती । स्वामी रघुपती रामराया ॥२॥रामराया माझें जाय वय वायां । काया हे पडाया वेळ नाहीं ॥३॥माय बापा केव्हां भेटसी राघवा । जिव हा आघवा आला कंठीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा दया निधी । आतां मी त्रिशुद्धी वांचेना कीं ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP