मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ४१ ते ५० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ४१ ते ५० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ४१ ते ५० Translation - भाषांतर ४१माझ्या जिवींच्या जिवलगा । येरे धांवत लगबगा ॥१॥जीव पावला हा कंठीं । आत्म दर्शन इच्छेनें काळकंठीं ॥२॥निमिष लव पळ घडि दिवस जाय । तो मज तुजविण युग सम होय ॥३॥माझे अपराध घालुनि पोटीं । देरे झडकरिं रामा भेटी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझे पाय वंदिन माथा ॥५॥४२तुझा माझा हरिल वियोग । ऐसा होईल कधिं आत्मयोग ॥१॥आपुली वाट पाहुनि आहे सीतापती । कधीं करिसी स्थिर माझी मती ॥२॥आज किंवा ऊद्यां येसी । ऐसी जीवा या असोसी ॥३॥दर्शन इच्छा न भागली । माझी फुकट वयसा गेली ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । कळविलि माझी सर्व गाथा ॥५॥४३पुरे पुरे केला हट । आतां धांउनि ये झटपट ॥१॥मज तुज-विण कंठवेना । तुज असती भक्त नाना ॥२॥बहुत बायकांचा पती । स्त्रिवियोग दु:ख नेणे त्याची मती ॥३॥तैसें तुज झालें देवा । मज विस-रसि रे राघवा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सांगु कोणा माझी कथा ॥५॥४४प्रभो जानकीच्या नाथा । मज दाखविं आत्म पथा ॥१॥दया-सिंधू तूं साचार । मज कळवीं आत्म विचार ॥२॥तरिच माझें जन्म नरात्तें । होय न तरि पशु वानरांचें ॥३॥वानर उपमा मज न साजे । आत्म भक्त मारुति गाजे ॥४॥अंगद सुग्रिवादि नळनीळ । भक्त समू-हचि वानर दळ ॥५॥पशुहुनि मी अज्ञान जड । शुद्ध जातीनें दगड ॥६॥तारिसि नाम बळें पाषाण । त्याहुनि वाटे मी मज ऊणा ॥७॥ऐसी अंतरिंची हरि माझी लाज । साधुनि आत्म दर्शन काज ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । निकट असुनि न भेटसी ह्लदयस्था ॥९॥४५कोण कोणाचीं संसारीं । मिथ्या पुत्र कलत्रादि हीं सारीं ॥१॥एक आपण तारक मज साचा । साक्षी आनंदघन जीवाचा ॥२॥जें दिसतें तें सर्व खोटें । आपण माझें भाग्य मोठें ॥३॥ऐसें आठउनि डोळ्यां वाटे । भळ भळ अश्रु धारा सुटे ॥४॥आपणाविणा रहावेना सर्वथा । भेटी देरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥४६काय माझे दोष पहासी । ऐकुनि बोल उगीच रहासी ॥१॥करिं अपराधांची क्षमा । पदर पसरितों तुज रामा ॥२॥माझ्या जिवाच्या विश्रामा । दाविं आपणातें सुख धामा ॥३॥माझें मीपण जाळुनि टाकीं । भेट आपण येका येकीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सच्चित्सुख ये आपण स्वता ॥५॥४७ग्रासुनि माझा अहंकार । कळविं आपणचि सुख सार ॥१॥तरि या जन्माचें सार्थक । आपण भेटला जरि देव एक ॥२॥वृत्ती उठती माझ्या जिवाच्या विश्रामा । दाविं आपणातें सुख धामा ॥३॥माझें मीपण जाळुनि टाकीं । भेट आपण येका येकीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सच्चित्सुख ये आपण स्वता ॥५॥४८रात्र सरली दिवस आला । दिवससरतां रात्रि भाग झाला ॥१॥दिवे लाउनि जागोजागीं । पुढें जेवणाची लगबगी ॥२॥बरी करू-नियां खटपट । यथा सांग भरिलें पोट ॥३॥पुढें मारुनि पोट सुस्ती । शयनीं घोरत पडावें निद्रिस्थी ॥४॥निद्रा सरतां जागा होउनि ओरडला । म्हणे कोंबडा आरवला ॥५॥अरे उठारे सकाळ । होत आला प्रात: काळ ॥६॥पुढें जेवण्याचि तयारी । बाइकांसी दटवण भारीं ॥७॥नाना जिनसी मिष्ट सांबारीं । भुर्के मारुनि आयुष्य सारी ॥८॥मुर्ख ते वय गेंलें सीता कांता । येउनि तारिं विष्णु कृष्ण जगन्नाथ ॥९॥४९तुज कळविलें वृत्तांता । जें तूं करिसी तें करीं आतां ॥९॥माझा धरूनियां कळवळा । येसि निश्चय हा घननीळा ॥२॥तुज नमितों मी साष्टांग । सोडीं आला जरि तुज माझा राग ॥३॥माझे गुण दोष मज आठवती । करिं मज पावन सीतापती ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । डोळे भरी तुज पाहीन येतां ॥५॥५०आतां शरण मी कोणा जाऊं ॥१॥तुजविण प्रभू कैसा राहुं ॥२॥जिविं लागली तळमळ । परि तुज न येची कळवळ ॥३॥आपण सर्वांसी आरंभ । भेरि देरे न करीं विलंब ॥४॥वाट लक्षुनि आपुली आहें । कृपा दृष्टी येउनि पाहें ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुजठावी अंतर्व्यथा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP