मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ७१ ते ८० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ७१ ते ८० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ७१ ते ८० Translation - भाषांतर ७१. तुम्हीं रामाचे परिवार । तुम्हां माझा नमस्कार ॥१॥मला गरिबासी आठवा । माझ्या रामासी पाठवा ॥२॥आई माझे सितापती । मज वश करीं श्री रघुपती ॥३॥ज्याचा बंधु तूं लक्ष्मण । तो मज भेटवीं राम माझा प्राण ॥४॥भरत शत्रुन्घ बंधू ज्या तुम्हीं । मज भेटवा राघव स्वामी ॥५॥वानर नळनीळ सुग्रीवादि सारे । माझ्या राघवासी घेउनि यारे ॥६॥राम सेवक तूं मारुती । मज साक्षीं दावुनि सितापती ॥७॥कोणि तरि करा हो उपकार । राम भेटवा नमितों वारंवार ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथ । आहे सज्जन सुख रंगांत ॥९॥७२. आजि होति सुलक्षणें । सव्य भृकुटी नेत्र स्फुरणें ॥१॥येतो वाटे सितापती । आमुचा जन्माचा सांगाती ॥२॥बैसउनि रत्न जडितासनीं । आरत्या ओंवाळिन पूजोनी ॥३॥घालुनि साष्टांग ममस्कार । मागेन स्वस्वरुपीं दे मज थार ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । पाहुनि डोळेभरी वंदिन माथां ॥५॥७३. नयनीं भासला प्रकाश । वाटे आला जानकीश ॥१॥कंठ दाटतो प्रेमानें । ध्वनी ऐकों येतो कानें ॥२॥माझ्या मी पणाचा नाश । करुनी आपण प्रगटले जगदीश ॥३॥सुखें सुख वाटे भारीं । आला खचित राम रावणारी ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा । निजखुण बाणली चित्ता ॥५॥७४. भय कोणाचें मज आतां । पूर्ण आनंद घोटी स्वतां ॥१॥राम भक्तांचा कैवारी । आजी कळलें मज अंतरीं ॥३॥माझा गळउनि देहासिमान । आपण प्रगटला जाण ॥४॥धन्य दिवस आजि सोनियाचा । लाभ झाला मज राघवाचा ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । गेली माझी तळमळ व्यथा ॥६॥७५. इतुके दिवस होता कोठें । न मिळसि किती श्रम केले मोठे ॥१॥असुनि जवळीं तूं ह्रदयस्थ । मज कसुनि पाहिला नेमस्त ॥२॥भक्त आपुले असंख्य कोटी । तपोनिधी नियमनिष्ट निराश पोटीं ॥३॥त्यांत माझी कायसी गोष्टी । काय पाहिलें लावुनि कसोटी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । मी हा अज्ञ हें कीं कळलें आतां ॥५॥७६. नयनीं पाहिला श्रीराम राजा । गेला सारा शिण माग माझा ॥१॥सुख वाढलें अपार । चित्त वृत्ती झाल्या गार ॥२॥राम आनंद चिद्घन । त्याचें घडलें मज दर्शन ॥३॥गेली माझी तळमळ सारी । वाटे आनंद आनंद भारीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझे चरण वंदिन माथा ॥५॥७७. बहुत जन्माचा शेवट । श्रेष्ट । नरजन्म चोखट ॥१॥कळलें मज रामराया । तुझ्या पाहुनि दिव्य पाया ॥२॥काय इतरा ज्या त्या योनी । तुझी नोळखि जानकि ज्यानी ॥३॥ऐसा आनंद नाहीं तेथें । जो मी घोटितों नरजन्मीं येथें ॥४॥किति काळ मी होतों भुकेला । आत्म दर्शनें हेतु पूर्ण केला ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझी करणी अगम्य पाहातां ॥६॥७८. आल्या जन्माचें सार्थक । देव पाहावा आपण एक ॥१॥आपण सुखाचा सागर । ज्या वरि विश्वलहरि अपार ॥२॥तो तूं आपण रामराजा प्रगटुनि हेतु पूर्ण केला माझा ॥३॥मोठा मज वरि हा उपकार । तुज साष्टांग नमस्कार ॥४॥विनवी तुज विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझी करणी अगम्य पाहातां ॥५॥७९. सच्चित्सुख सुखरूप आपण मुळिंचा । दिससी तो तूं राम दशरथ कुळिंचा ॥१॥संरक्षाया भक्ता अपार । धरिसि नानाविध अवतार ॥२॥त्या तुज करुणा येउनि माझी । चरण दाखविले मज आजी ॥३॥केला माझा त्वां उद्धार । सकुटुंब सपरिवार ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । धन्य आपुल्या माता पिता ॥५॥८०. अभिमानी तूं भक्तांचा । अनुभव आला मज साचा ॥१॥तुज आळवित होतों किति काळ । तरि मप्तापें लावियेला येतां वेळ ॥२॥परि तूं दयेचा सागर । म्हणउनी प्रगटला मजसमोर ॥३॥तुज भक्तांचा कळवळा । हें मज कळलें त्रीजगत्पाळा ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा । सच्चिदानंद आपण स्वता ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP