मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ३१ ते ४० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ३१ ते ४० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ३१ ते ४० Translation - भाषांतर ३१सच्चिदानंदा जगदीशा । मज फिरवुं नको दशदीशा ॥१॥एक आपण आहे बरा खरा । दृढनिश्चय याचा करा ॥२॥सर्व साक्षी तूं समजसी । रामराया निजमानसीं ॥३॥आतां उशीर लाऊं नका । स्वा-मी जानकी नायका ॥४॥येरे विष्णु कृष्ण जगन्नाथा । देरे दर्शन मज समर्था ॥५॥३२धन्य आपुली करणी । पापी उद्धरिसी स्मरणीं ॥१॥ऐसें आइ-कों पूराणीं । नव्हे लटकी व्यास वाणी ॥२॥ऐसा निश्चय माझा चित्ता । तरि मज कळवीं आपुला पत्ता ॥३॥कां रे तळमळविसि तूं मातें । असुनी अखंड आमुचें नातें ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूंचि एक प्रति पाळिता ॥५॥३३आजि वाढवेळ तुज झाला । येतां मार्गीं कोण आड आला ॥१॥आडविला काय वाटे । माझें कर्मची उफराटें ॥२॥जळों वाटे माझी काया । तुझा वियोग न साहे रामराया ॥३॥जीव जाउं पाहे माझा । काय पहासी श्री रघुराजा ॥४॥दर्शन देरे लवकरिं आतां । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥३४ऐसा कोण तरी ऊपाय । जेणें दाविसि तूम निजपाय ॥१॥मज कळवीं श्रीरघुनाथा । तुझ्या चरणीं ठेविन माथा ॥२॥जीव जाहला बेजार । पुरे पुरे प्रभु हा संसार ॥३॥माझ्या ग्रासूनी मी पणा । उदय रुपा दावी आपणा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिं माझ्या अज्ञान व्यथा ॥५॥३५माझ्या बोलण्याच्या रागा । धरुनी न येसी तूं कां गा ॥१॥मी हा अपराधी मोठा साचा । साक्षी माझ्या तूं मानसाचा ॥२॥परि या सर्वांसी तूं मूळ । मज लावावया खूळ ॥३॥जरि मज भेटला तूं असता । तरि हा प्रसंगचि आला नसता ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । भेटि दे रे मज येउनि स्वतां ॥५॥३६कोण आड आले तुज । येथें येतां सांगे मज ॥१॥माझ्या जिवींच्या जीवना रामा । त्यांचीं लपवुं नको रे नामा ॥२॥हां केली आठवण त्वां रामें । साहा शत्रूचीं हीं कामें ॥३॥करिं त्याचा बंदोबस्त । रावणादि त्वां वधिले मस्त ॥४॥मारुनि दुष्टां त्यां समस्तां । दर्शन दे रे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥३७जरि त्वां धरिला माझा राग । येउनि आपुल्या मुखें सांग ॥१॥ह्मणसि जरि आलों तुजपाशीं । तरि तूं पापी मुक्त होसी ॥२॥तरि काय होइल वाईट । कार्य साधेल आमुचें नीट ॥३॥मी पतीत तूं पावन । जमेल अर्थानुसंधान ॥४॥सोडीं संषयरे समर्था । येरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥३८भलि आठवण झाली मज । भय वाटे एकचि तूज ॥१॥किं हा मागेल वैकुंठ । संषय न धरिं मी न शुंठ ॥२॥सच्चिदानंदा श्रीरामा । वैकुंठाहुनि आत्म प्रेमा ॥३॥तुझें वैकुंठ तुला असों । सच्चित्सुखमय आपण दीसों ॥४॥करिं इतुका उपकार आतां । ये किं विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥३९ किति किति तुज आळविलें । अजुनि आपुलें येणें न झालें ॥१॥काय खोटा मी दैवाचा । लाभ जरि ना तुझा राघवाचा ॥२॥जळों जळों हें माझें जीणें । वाटे सर्वांहुनि जें ऊणें ॥३॥धांव धांव जानकि कांता । भेट देईं मज एकांता ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिं माझी तळमळ व्यथा ॥५॥४०नको लावूं रे ऊशीर । तूं मज प्राण सखा रघुवीर ॥१॥तूंचि मज एक माता पिता । जरि सोडिसि कोणि नाहीं त्राता ॥२॥छळ मांडु नको रे माझा । साधीं आत्म दर्शन काजा ॥३॥करुनी कृपा दृष्टी रामा । येरे धांवुनि निज सुख धामा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरिं माझी तळमळ व्यथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP