मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग १२१ ते १३० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग १२१ ते १३० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग १२१ ते १३० Translation - भाषांतर १२१. पुरे पुरे तुझा मज हा संसार । जहाला बेजार जीव माझा ॥१॥माजरांच्या खेळें उंदिरा मरण । अनन्य शरण तुज मी रामा ॥२॥घांव घांव घाली उडीया आकांता । जानकीच्या कांता दीन बंधो ॥३॥दिन बंधु आपुलें नांव आणि लक्षीं । भेटुनि मज संरक्षी गरीबासी ॥४॥धांव विष्णु कृष्ण जगन्नाथा मी करंटा । गरिब मोठा धाटा तुज नाहीं ॥५॥१२२. दिवस मोजूनि राहुं किति काळ । तूं राम दयाळ भेटावया ॥१॥तुजविण हें माझें स्थिरावेना मन । शत्रुचें दमन तुझ्या हातीं ॥२॥भक्तांचा अभिमानी आमुचा पक्षपाती । नाहीं सितापती आपणावीण ॥३॥धरूं मी भरंवसा आणिक कवणाचा । अखंड आपणाचा धीर मज ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा अंतर्साक्षी । दर्शन देउनि रक्षीं आपणाचें ॥५॥१२३. उतावेळ जीव आत्म भेटीसाठीं । लक्षीं बारा वाटीं आपणातें ॥१॥नयन शिणले कारे लावितोसि वेळ । पाहसि माझ्या खेळ प्रारब्धाचा ॥२॥तोडीं माझ्या देहात्म बंधपाशातें । मज दशदीशांतें न फिरवितां ॥३॥आपण आनंदघर रामराजा । येईं वेगीं माझ्या प्रत्ययासी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा हें मी पण । ग्रासुनी आपण प्रगट व्हावें ॥५॥१२४. गमतवाली मोठी माया तुझी रामा । नसतां विषयीं प्रेमा वाढवीती ॥१॥आपण अधिष्ठान जिचें अखंड रामराया । ते हे आत्म माया द्दश्यरूपें ॥२॥सच्चिदानंद आपण एक जे मुळींची खूण । चुकऊनी देह मी पण सबळ दावी ॥३॥विसरुनि आपणा दाविति चमत्कार नाना । ऐसें वाढविती मना सुख तें हेंचि ॥४॥सुख हें या मानि जो त्यासी पेटवी दु:खाग्नी । चितेच्या संल्लग्नीं पाहूनीया ॥५॥सुखाच्या संकल्पें जीवा लोळवी संसारीं । दु:ख देउनि भारीं रात्र दिवस ॥६॥करितां याचा विचार एक आपणचिसार । दिसतो जरि संसार सत्य नाहीं ॥७॥सत्यासत्याचें मूळ आपण कळला । भाव हा वळला आत्मपदीं ॥८॥आत्मपद दावीं विष्णु कृष्ण जगन्नाथा । जन्म मरण व्यथा निरसाया ॥९॥१२५. दिधल्या जन्माचें रामा करिं रे सार्थक । अखंड आपण एक भेटूनीया ॥१॥आपण एक भेटूनीयां हरिं तळमळ । धरि माझी कळवळ गरीबाची ॥२॥दाविसी अनेक मज याचि नाहीं गोडी । एकाचि आवडी आपणाची ॥३॥कळवीं मी तुज माझ्या गळविं मीपणा । मिळविं आपणा सच्चित्सुखा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा तूं भक्तांभीमानी । हें ऐकुनि कानीं येरे वेगीं ॥५॥१२६. राघवा आनंदघना जानकी जीवना । पुरविं कामना आत्म दर्शनाची ॥१॥आत्म दर्शनाची मज लागली रे आशा । राम जगदीशा पूर्ण करीं ॥२॥नको लाऊं रे विलंब पडतों तुझ्या पाया । नाशिवंत काया म्हणोनियां ॥३॥स्वभक्त कैवारी या नामा न लाउनि घे बट्टा । दुर्जन मुखें थट्टा न घडों तूझी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा दयानिधे रामा । आपण सुखधामा भेटे वेगीं ॥५॥१२७. एक आपण भेटाया विलंब लाविसि किती । रामा सितापती सांग मज ॥१॥सांग मज आला तुज माझ्यावीशीं कोप । लागली कीं झोंप सत्मापानें ॥२॥तुज झोंप हें बोलणें मुर्खत्वाचे माझें । आपण रघुराजें लक्षीं न ध्यावें ॥३॥आपण आनंदघन नित्य जागा स्वामी । भक्तां अंतर्यामी निश्चय हा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा आत्मभेटीसाठीं । तळमळतो हो गाठीं आपणाची ॥५॥१२८. कोणिच कोठें ना प्रिय मज ऐसा आपणा । सत्य जानकि रमणा परमानंदा ॥१॥इष्टमित्र पुत्र कलत्र धनादिकांचा स्नेह । नावडे हा देह आपणावीण ॥२॥सर्व सुखाचें निधान एक आपण माझ । सदया रामराजा दीन बंधू ॥३॥सोडूनि सकळ एकचि लक्षीन आपणातें । देह मीपणातें नाशिवंता ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा आत्म दर्शन हेतु सदा । पुरविसि देउनि कदा आत्म भेटी ॥५॥१२९. भली सांपडली मज मानवी हे काया । आपण भेटावया सच्चित्सुख ॥१॥मनुष्य जन्मींच कळे आपण ब्रम्हानंद । सर्व सुख कंद रामराजा ॥२॥संत संगें सांपडलें मज नीजनातें । आत्म भजनांतें लागावया ॥३॥आतां मज काय उणें भेटला आपण । सुख परिपूर्ण रूप ज्याचें ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा मनुष्य जन्म सार्थकता । स्वभक्ती तत्वाता कळवीसी तूं ॥५॥१३०. ऐसा प्रेम नाहीं मज अन्य जागीं कोठें । एक आपण नेटें आवडसी ॥१॥आपण एकचि वाटे सुखाचा सागर । नटला विश्वाकार लहरी रूपें ॥२॥न सुटे लागली मज आपणाची गोडी । अक्षय सुख जोडी आपणची ॥३॥अलभ्य हा लाभ झाला आपणाचा रामा । श्री मन्मंगल धामा आनंद मूर्तीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा जळें मीन जैसा । वांचे मी हा तैसा आत्म कृपे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP