मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ९१ ते १०० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ९१ ते १०० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. N/A Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ९१ ते १०० Translation - भाषांतर ९१. सदया नुरउनि माझे मी पण । उदया आला कीं आपण ॥१॥माझ्या हरुनी देह भावा । दिधला स्वस्वरुपीं विसावा ॥२॥वृत्तिस्थिर करुनी हें मन । केलें आत्मस्वरुपीं लीन ॥३॥सच्चित्सुख जल निधि जैसा मीना ॥ सुखनिमग्न करि जगजीवना ॥४॥रामा आनंद निमग्न मी आतां । तुज पाहुनि विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥९२. रत्न जडित मुकुट माथा । लखलखाट सभोवता ॥१॥कानी कुंडलांचा थाट । आजुबाजु झगझगाट ॥२॥रूपें सुंदर सांवळा । भाळीं कस्तुरीचा टिळा ॥३॥कासे पितांबर पीवळा । गळा वैजयंति माळा ॥४॥कमल पत्रासम लोचन । करी विष्णु कृष्ण जगन्नाथा अवलोकन ॥५॥९३. ऐसें आवडे मज ध्यान । करीं शोभे चाप बाण ॥१॥वामांकावरि जानकि भाजा । मंदहास्य मुख रामराजा ॥२॥लक्ष्मण भरत आणि शत्रून्घ । सेवक वानरांचे गण ॥३॥सन्मुख कर जोडुनि मारुती । नयनी निरखी सीतापती ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । आपण सर्वं सुखाचा दाता ॥५॥९४. तीच रात्रि तोचि दिवस । वाटे मुढबुद्धी जीवास ॥१॥जल कालिचे आजी वाटे । नदी ओघ चंचल लोटे ॥२॥लवपळ घडि वर्षें झालीं । वय सामोग्री सरत आली ॥३॥तरि या जीवां नाहीं ठावें । पुढें परिणामि कैसें व्हावें ॥४॥धरुनी विषय सुखाचा सोस । जन्ममरणें होती कासावीस ॥५॥तुझा उपकार मजवरि मोठा । कळविला हा संसार खोटा ॥६॥सच्चिदानंद स्वरूप आपणा । भेटविलें मज ग्रासुनि मीपणा ॥७॥राम विष्णु कृष्ण जगन्नाथा । केला उपकार जानकि नाथा ॥८॥९५. आत्म माया नदीच्या लोटें । जीव वाहुनि जाति कर्म नेटें ॥१॥नाहीं एकत्र सहवास । जैसा प्रवाहि काष्टांस ॥२॥लक्ष चौर्याशींचा फेरा । फिरतां फिरतां नाहीं थारा ॥३॥तुझी कृपा ज्यावरि स्थीर । त्यासी कळविशी आपण तीर ॥४॥ऐसा प्रतापि तूं श्रीरघुवीर । मज तारिला देउनि आत्म धीर ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । निज महिमा गोड गातां ॥६॥९६. कोण कोठील कोणाचा । रामा तुजविण या जीवाचा ॥१॥इष्ट मित्र पुत्र कलत्र । सोहिरे धायरे आत्म गण गोत्र ॥२॥क्षणक्षणीं बिघडती । मित्र पूर्वील शत्रू होती ॥३॥सर्व पाहिलें शोधूनी । नाहीं तारक तुज वांचूनी ॥४॥मायाभ्रमरूप खटपट सारी । एक आपुला आधार संसारीं ॥५॥राम विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूं मज भेटला हा उपकार माथा ॥६॥९७. आत्म प्रत्ययें केवळ । गेली माझी तळमळ ॥१॥तुझा उपकार तरी किति वानु । आला उदया आपण विद्भानु ॥२॥ऐसा अखंड असावा आत्म योग । दावुनि पंच भुत सृष्टि वियोग ॥३॥कधींच उद्भवुं न दे भवरोग । आपण वैद्य शिरोमणी नुरवि दु:खभोग ॥४॥रामा विष्णु कृष्ण जगन्नाथा । देउनि दर्शन माझ्या हरिल्या सर्व व्यथा ॥५॥९८. ऐसा कोण असे संसारीं । सकळ संकटें निवारी ॥१॥भक्तरक्षक तूं साचा । निश्चय हा मानसाचा ॥२॥असति ब्रम्हादिक देव । नसति सर्व सत्ताधिश स्वयमेव ॥३॥आपण सर्वासि आधार । ऐसा माझा कृतनिर्धार ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । नाहीं नाहीं तुजविण त्राता ॥५॥९९. सद्गुरुचा हा प्रसाद । माझा ऐकुनि आला साद ॥१॥अनंत जन्मीचें भाग्य मोठें । मज एका एकीं आपण भेटे ॥२॥मी तों अविचारि अनाचारी । दु:खें भोगुनि होतों या संसारीं ॥३॥आनंदघना राम राजा । आपण भेटुनि केला हेतु पूर्ण माझा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । किति भाग्य वर्णुं आतां ॥५॥१००. येतां सण दीपवाळी । जन पडती जसे सुकाळि ॥१॥त्याहुनि होय मज आनंद रामा । आत्म दर्शनें सुक धामा ॥२॥आजि भला रे सुदिन सोनियाचा । लाभ झला आपण रमराज याचा ॥३॥आपण भक्तांचा अभिमानी । ऐसें पूर्णपणें कळों आलें ध्यानी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । गोड लागति निजात्म कथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP