मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|अन्वयव्यतिरेक| षष्ठ: समास: अन्वयव्यतिरेक प्रथम: समास: द्वितीय: समास: तृतीय: समास: चतुर्थ: समास: पंचम: समास: षष्ठ: समास: सप्तमः समासः अष्टम: समास: नवम: समास: दशम: समास: एकादश: समास: अन्वयव्यतिरेक - षष्ठ: समास: समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ व्यतिरेक Translation - भाषांतर ॥ श्रीराम समर्थ ॥ ॥ तंव स्वामी म्हणती बहु बरें । श्रवण कीजे अत्यादरें । प्रज्ञावंता निर्धारें । धारणा धरी ॥१॥तूं नव्हेसी स्थूल शरीर । ऐसा पाहे पां विचार । तूं स्वरूप निर्विकार । महावाक्यार्थ बोलिजे ॥२॥महावाक्यें तत्त्वमसि । तें ब्रह्म तूं आहेसी । म्हणून तूं नव्हेसी । स्थूल देह ॥३॥जड पांचभौतिक शरीर । पंचविसांचा निर्धार । येथें बत्तीस क्रिया निरंतर । अंतरात्म्याचिया ॥४॥तेणें जेव्हां देह सोडिलें । एक पंचक उरलें । तें जडत्व भासलें । पृथ्वीरूपें ॥५॥ऐसें मागें निरूपण । सांगीतलें जाण म्हणोनि स्थूल देह आपण । नव्हेसी सत्य ॥६॥जागृति विश्वेश्वर रजोगुण । क्रियाशक्ति वैखरी वचन । अकार मात्रा स्थूल प्रयोग जाण । जन्मस्थान ॥७॥या अष्टहि क्रिया असती स्थूल देहाचिया । ऐसें म्हणती परी यया । देहात्मयोगें ॥८॥देह आत्म्याची संगती । अष्ट क्रिया उठती । बियोग होतां प्रचीती । एक उरे ॥९॥जें स्थान स्थूल शरीर । नव्हेसी तूं स्वरूप निर्विकार । तूंचि पाहे विचार । ज्ञानदृष्टी ॥१०॥चर्मदृष्टीनें देखिलें । तें जडभूत निरसिलें । त्रयभूतें आकारिलें । दृष्टी देखणें ॥११॥यत् दृष्टं तन्नष्टं हें वचन । श्रुती बोलली हें प्रमाण । म्हणोनि स्थूल देह आपण । नव्हेसी सत्य ॥१२॥तूं तरी ऐसें म्हणासी । स्थूलदेहाचे निरासीं । स्वस्वरूप सत्य निश्चयेंसी । ऐसें असे ॥१३॥तरी लिंगदेहाचा विचारू । सांगेन धरी निर्धारू । तेंचि स्वरूप प्रांजळ करूं । स्वामीचेनि प्रतापें ॥१४॥इति श्री व्यतिरेक । ज्ञानप्रळय निश्चयात्मक । पुढें कथेचें कौतुक । सावध ऐका ॥१५॥इति षष्ठ: समास: ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP