मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|अन्वयव्यतिरेक| प्रथम: समास: अन्वयव्यतिरेक प्रथम: समास: द्वितीय: समास: तृतीय: समास: चतुर्थ: समास: पंचम: समास: षष्ठ: समास: सप्तमः समासः अष्टम: समास: नवम: समास: दशम: समास: एकादश: समास: अन्वयव्यतिरेक - प्रथम: समास: समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ अन्वय Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥ जय जयाजी लंबोदरा । सर्वसिद्धिगुणसागरा । सकळ विद्यार्ण-वगरा । आदिपुरुषा ॥१॥ सर्व कर्तृत्वासी आरंभ । आदिमूर्ती मूळारंभ । उपावहीन निरावलंब । स्वरूप तुझें ॥२॥ऐक्यभावें नमन । करूं निजध्यासें नमन । हें म्हणतांचि नमन । माझें तुज ॥३॥सर्वमंगल मंगला मूर्ती । वर्णजननी मूळस्फूर्ती । सर्वाक्षरीं वर्तती । व्यापकापणें ॥४॥जी वेदमाता गायत्री । त्रिपदा सावित्री । ब्रह्मदुहिता धात्री । हंसवाहिनी ॥५॥सकळपरा संजीवनी । अर्धमात्रा षड्गुणी । प्रणवात्मक चतुर्थ वाणी । नमन माझें ॥६॥आतां वंदीन देवाधिदेवो । सर्वश्रेष्ठ स्वामीरावो । तया निजपदीं ठावो । निवामज मज ॥७॥जें जें करावें स्तवन । तें तें स्वामीरावोचि जाण । स्वामीरावो अधिष्ठान । तेचि ते गमावे ॥८॥नमस्कारूनि स्वामीचें चरण । मग केलें कृपावलोकन । तेणें आलें समाधान पूर्ण । अभयकरें ॥९॥स्वामीकृपेचा लोट आला । तो माझे हदयीं सामावला । येर्हवीं मज मंदमतीला । योग्यता कैंची ॥१०॥आतां वंदीन कुल-दैवत । लीलविग्रही रघुनाथ । जो असे प्रतिपाळित । आपल्या भक्तां ॥११॥सकल कुलासी पालक । सर्व शरीरांस चालक । ब्रह्मादिकांचा जनक । देवैकनाथ ॥१२॥आत्माराम सकलांचा । देवदानव मानवांचा । तोचि श्रीराम आमुचा । कुलस्वामी ॥१३॥आत्माराम सर्व देहीं । तोचि माझिये निजहदयीं । सीता प्रकृति पुरुष पाही । राम झाला ॥१४॥तंव शिष्यें विनविलें । जी आतांचि हें बोलिलें । प्रकृति ऐसें नाम ठेविलें । कोण्या पदार्थासी ॥१५॥आणि पुरुष तो कवण । तयाचें स्वरूप किंलक्षण । सगुण किंवा निर्गुण । निश्चयेंसी ॥१६॥माया ईश्वर अनिर्वाच्य । सृष्टिउद्भव निर्वाच्य । कोणें केला विसंच । मागुता स्वामी ॥१७॥जीव तो कवण । तयासी कैसें जन्ममरण । आणि सायुज्यमुक्तीचें ज्ञान । मज निरूपावेम ॥१८॥ऐसें शिष्यें विनविलें । धरिलीं सदृढ पाउलें । सद्नदित होतां आले । अश्रपात दु:खें ॥१९॥बहुत भोगिल्या पुनरावृत्ती । त्रिविधतापांची विपती । चुकवूनि सायुज्यमुक्ती । दिधली पाहिजे ॥२०॥ऐसीं करुणेचीं वचनें । भगवज-पंचाननें । ऐकोनि कृपावलोकनें । अभय दिधलें ॥२१॥व्यतिरेक अन्वय हे दोनी । अष्ट देहांची उभवणी । त्यासि बोलिजे वचनीं । अन्वय ऐसें ॥२२॥उद्भवाचा संहार । ज्ञानप्रलय निरंतर । त्यासि बोलिजे साचार । व्यतिरेक ऐसें ॥२३॥गुरुशिष्यांचा संवाद । पंचीकरण महावाक्यबोध । जेणें तुटे भवबंध । श्रवणमात्रें ॥२४॥तेंचि पुढें निरूपण । अन्वयाचें लक्षण । सांगितलें तरी सावधान । होई आतां ॥२५॥इतिश्री अन्वय । केलचि करूं निश्चय । प्रतीतीनें सांपडे सोय । स्वस्वरूपाची ॥२६॥इति श्रीमद्रामदास-विरचिते अन्वयव्यतिरेके प्रथम: समास: ॥१॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP