मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अष्टक| अष्टक चिन्मयानंदाचें अष्टक पहिलें दुसरे तिसरे चवथे पांचवे सहावें सातवे आठवें नववें दहावें अकरावें बारावें तेरावें चौदावें पंधरावें सोळावें अष्टक महाकालीचें रेणुकास्तव अंबाबाईचें तुकाबाईचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक अष्टक चिन्मयानंदाचें अष्टक चिन्मयानंदाचें श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : ashtakpoemvishnudasअष्टककवितापदमराठीविष्णुदास अष्टक चिन्मयानंदाचें Translation - भाषांतर ( वृत्त : भुजंगप्रयात )नमो मोरया शारदा मोरयानी । गुरु सच्चिदानंद कैवल्यदानी ॥गुरु शंकराचार्य आचार्यमाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥१॥दयासागरा भाग्यवंता उदारा ।अलों आपुली कीर्ति ऐकूनि दारा ॥अजी लाभली ही भली पुण्यवेळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥२॥तुंची शत्रुचा शत्रु आजानबाहू ।तुझ्यावीण मातृ - पितृ - आजा न बाहू ॥तुंची या जगाच्या जिवाचा जिव्हाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥३॥रजाच्याश्रयें शत्रु साहीं तमातें ।गमे प्रेरितां हीत आहीत मातें ॥म्हणूनी अली भोगणें बंदिशाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥४॥अभीमान माझा मला काळ झाला ।अही पाळिला झोंबला काळजाला ॥अतां सोडवी शीघ्र वैद्या नकूळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥५॥जरी मी अहों सर्वथा पापराशीं । तरी आत्मज्ञानानळें कापराशी ॥स्वयें स्पर्शिल्या उदभवे दिव्य ज्वाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥६॥जरा व्याधिची लागलीसे उपाधी ।कशाची सुषुप्ती सुखाची समाधी ॥म्हणूनी अली भोगणें बंदिशाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥७॥करीना जशी व्यंग गंगा तरंगा ।तसें घ्या उसंगा सुसंगांत रंगा ॥अलिंगोनि लावी निजानंदिं डोळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥८॥गुरुनाम हीं कुंडलें घोषकानीं ।गुरुचिंतनें संसृती - दोष - कांनीं ॥गुरु वंदनें जन्ममृत्यूसि टाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥९॥महोत्साव हा वद्य वैशाखमासीं ।भरे द्वादशीचा नंद शेषाखमासीं ॥मिळे भुक्ती मुक्ती सुखाचा सुहाळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥१०॥कृपेची अतां तूं गुरु माउली ही ।करी विष्णुदासावरी साउली हो ॥धरुं ने अतां भाव पोटीं निराळा ।गुरु चिन्मयानंद स्वामी दयाळा ॥११॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP