मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अष्टक| तेरावें अष्टक पहिलें दुसरे तिसरे चवथे पांचवे सहावें सातवे आठवें नववें दहावें अकरावें बारावें तेरावें चौदावें पंधरावें सोळावें अष्टक महाकालीचें रेणुकास्तव अंबाबाईचें तुकाबाईचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक अष्टक चिन्मयानंदाचें रेणुकेचें अष्टक - तेरावें श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : ashtakpoemvishnudasअष्टककविताकाव्यपदमराठीविष्णुदास तेरावें Translation - भाषांतर ( वृत्त : शिखरिणी )नमस्ते श्रीअंबात्मज गणपती ब्रह्मकुमरी ।नमस्ते श्रीविद्यावदन कमलानंद भ्रमरी ॥नमस्ते श्रीदत्तात्रय गुरु कृपासागर मुनी ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥१॥भवान्धःकारान्ता, प्रगटलि महारत्न दिपिका ।अयोनीसंभव्या, सकल गुणमंडीत लतिका ॥स्वयं भंगा रंगा, सगुणरुप लावण्य अवनी ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥२॥निघाली यज्ञाच्या, सजिवन कला अग्निमधुनी ।वसे सिंहाद्रींही, दशशतकरांलागिं वधुनी ॥विराजे सदभक्तांकित भगवती याज्ञशयनी ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥३॥पिता रेणूराजा, रुचिक तपराशी श्वशुर तो ।महा उग्र क्षोभी, रमण जमदग्नीच हरतो ॥जिच्या जन्मांत्राच्या, त्रिभुवनिं सुता बंधुभगिनीं ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥४॥पतीतोद्धाराया, सुखकर भवाब्धींत नवका ।जिच्या दैत्यानाशें, सुरवरगणालागिं तवका ॥अई रेणूकाही, प्रबल महिषासूर मथनी ।नमस्ते श्रीअंबे, विजयि परशूरामजननी ॥५॥जणूं वत्सासाठीं, टपत विजनीं धेनु बसली ।न येती कां कोणी, म्हणुनि मनिं कीं काय रुसली ॥अपापें पान्हावें, मुळपिठ निरालंब अवनी ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥६॥गळा माळा पीतांबर भरजरी रंग पिंवळा ।उरस्थ प्रेमाच्या, उदधिंत मनोभाव कवळा ॥इच्या वाटे कोटी, हरपति रवीं चंद्र वदनीं ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥७॥कृपाब्धीची वाहे, क्षितितळवटीं वत्सलहरी ।पतीतांची सारीं, दुरित मलपापें परिहरी ॥करी विष्णूदासा, अळस त्यजुनी पावन जनीं ।नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : September 05, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP