मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|अष्टक| चवथे अष्टक पहिलें दुसरे तिसरे चवथे पांचवे सहावें सातवे आठवें नववें दहावें अकरावें बारावें तेरावें चौदावें पंधरावें सोळावें अष्टक महाकालीचें रेणुकास्तव अंबाबाईचें तुकाबाईचें श्रीरेणुकेचें प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक प्रदीर्घ अष्टक अष्टक चिन्मयानंदाचें रेणुकेचें अष्टक - चवथे श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : ashtakpoemvishnudasअष्टककवितापदमराठीविष्णुदास चवथे Translation - भाषांतर ( वृत्त : दिंडी )तुझें सुंदर रुप रेणुके विराजेवर्णिताती मुनि देव देवि राजेकोण स्वगुणाचा करिल गुणाकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥सदानंद मुख चंद्रमा सबंधरत्नहार, मणी, वांकि बाजुबंदमुक्तजडित सुवर्ण अलंकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥विलोकुन नथ नासिकीं, काप कानींमार्ग विसरावा मोक्ष साधकांनींहांक द्यावी लक्षुनी लक्षवारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥साडि पिवळी खडिदार भरजरीचीतंग चोळी अंगांत अंजिरीचीटिळा कुंकुम, निट वेणि पिळेदारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाटटाळ, घंटा, कंकणें, खणखणाटपायिं पैंजण घन देति झणत्कारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥मूळ धाडी दर्शना यावयासीलावि भजनीं या उर्वरित वयासीतोडि सारा हा दृष्ट अहंकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥पर्वतीं या बसलीस अम्हांसाठींपरी अमुची खरचली जमा साठीभरत आला स्थळ - भरतिचा अकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥माय वंची दुरदेशिं मुलांनाहीअशी वार्ता ठाऊक मला नाहींअगे आई ! हा काय चमत्कारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीरमला केलें सरदार ना फकीरकाय म्हणतिल व्यासादि ग्रंथकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥तरी आतां ये, धांव, पाव, तारत्वरित आतां तरि धांव, पाव, तारकरी माझा अविलंबें अंगिकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥ काय रागें झालीस पाठमोरीतेरि अम्मा फिर एकि वाट मोरीकेशराचा हरपेल कीं शकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥पहा जातो नरजन्म - रंग वायांनये सहसा परतून रंगवायाम्हणुनि करितों विशेष हाहाःकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥कृपासूत्रें वोढोनि पाय दावीजशी बांधी कृष्णासि माय दावींअहो मीही अन्यायि अनीवारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥मीच अथवा तुज ह्रदय - मंदिरांतप्रेमसूत्रें बांधीन दिवस - रातयथातथ्य परि नसे अधीकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥कसा एका पुष्पाचिया आवडीनेंमुक्त केला गजराज तांतडीनेंतसा मीही अर्पितों सुमनहारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥केली दुल्लड ही पदर पंधराचीतुझ्यासाठींची, आण शंकराचीविष्णुदास म्हणे रेणुके स्विकारतुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP