मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|शिवाजी राजांचा पोवाडा| भाग ८ शिवाजी राजांचा पोवाडा भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ८ शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले. Tags : mahatma jyotiba phulepovadaपोवाडामहात्मा ज्योतिबा फुले भाग ८ Translation - भाषांतर विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायला ।शिवाजी कोकणांत गेला ॥छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला ।जमाव फौजेचा केला ॥गोंवळकुंडी जाई मागून घेई तोफांला ।फितीवलें कसें निजामाला ॥करनाटकीं गेला भेटे सावत्रभावाला ।वाटणी मागे व्यंकोजीला ॥लोभी व्यंकोजी हिस्सा देईना वळासी आला ।आशेने फिरवी पगडीला ॥बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला ।बि-हाडीं रागाऊन गेला ॥शिवाजीला राग आला कोट छातीचा केला ।कैदी नाहीं केलें भावाला ॥तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला ।खडा कानाला लावला ॥दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला ।करनाटकीं मुख्य केला ॥हंबीरराव सेनापती हाताखालीं दीला ।निघाला परत मुलखाला ॥वाटेमधीं लढून घेई बिलरि किल्ल्याला ।तेथें ठेवी सुमंताला ॥शिवाजीचे मागे व्यंकोजीनें छापा घातला ।घेतलें स्वतां अपेशाला ॥जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला ।शिवाजी रायगडी गेला ॥विजापुरचा साह्य नेई राजे शिवाजीला ।मोगल मुलखी सोडला ॥मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळविला ।सोडिलें नाहीं पिराला ॥वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला ।घाबरा अतिशय केला ॥भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला ।वाट पुढें चालू लागला ॥दुसरी फौज आडवी माहाराज राजाला ।थोडसें तोंड दिलें तिजला ॥काळया रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला ॥धुळ नाहीं दिसली शत्रूला ॥फौजसुद्वां पोहंचला पटा किल्ल्याला ।फसिवलें आयदी मोगलाला ॥विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला ।आश्रय मागे शिवाजीला ॥हांबीरराव मदत पाठवी विजापुराला ।बरोबर देई फौजेला ॥नऊ हजार मोंगलांचा पराभव केला ।ज्यानी मार्ग अडीवला ॥विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला ।केला महाग दाण्याला ॥शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला ।मोगल भिऊन पळाला ॥दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला ।पाठवी शाहाजाहानाला ॥जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला ।लाविला नीट मार्गाला ॥तह करुन शिवाजी नेती विजापुरला ।यवन घेती मसलतीला ॥शिवाजीचे सोवळें रुचलें नाहीं भावाला ।व्यंकोजी मनीं दचकला ॥निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला ।निरा संन्यासी बनला ॥शिवाजीनें पत्र लिहिलें बंधु व्यंकोजीला ।लिहितों पत्र अर्थाला ॥वीरपुत्र ह्यणवितां. गोसावी कसे बनला ।हिरा कां भ्याला कसाला ॥आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी साह्याला ।तुम्ही कां मजवर रुसला ॥बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला ।त्यागा ढोंगधतो-याला ॥मन उत्तम कामीं तपा आपल्या फौजेला ।संभाळा मुळ आब्रूला ॥कीर्त्ति तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला ।नित्य जपतों या जपाला ॥कमी पडतां तुह्यी कळवा माझ्या लोकांला ।सोडा मनच्या आढीला ॥सुबोधाचें पत्र ऐकतां शुद्वीवर आला ।व्यंकोजी लागे कामाला ॥शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला ।रोगानें अती जेर केला ॥त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला ।शिवाजी सोसी दु:खाला ॥यवनीं विरास भिडतां नाहीं कुचमला ।शिवाजी रोगाला भ्याला ॥सतत सहा दिवस सोसी तापदहाला ।नाहीं जरा बरळला ॥सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला ।एकटा पुढें आपण झाला ॥काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला ।पडले सुख यवनाला ॥कूळवाडी मनीं खचले करती शोकाला ।रडून गाती गुणांला ॥॥चाल॥महाराज आह्यासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ।मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाही पाउसाला ॥डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥लढवी अचाट बुद्वीला । आचंबा भुमीवर केला ॥बाळगी जरी संपत्तीला । तरी बेतानें खर्च केला ॥वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥युक्तीनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥चोरघरती घेई किल्ल्याला । आखेर करी लढाईला ॥युद्वीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥दाद घेई लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ॥आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षा चपळाईची ॥सुरेख ठेवण चेह-याची । कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ॥॥चाल॥भिडस्त भारी । साबडा धरीं ॥प्रिय मधुरी । भाषण करी ॥मोठा विचारी । वर्चड करी ॥झटून भारी । कल्याण करी ॥आप्त सोयरीं । ठेवी पदरीं ॥लाडावरी । रागावे भारी ॥इंग्लीश ज्ञान होतां ह्यणे मी पुत्र क्षेत्र्याचा ।उडवी फटटा ब्रम्ह्याचा ॥जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा ।मुख्य धनी पेशव्याचा ॥जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥८॥समाप्त N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP