मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|शिवाजी राजांचा पोवाडा| भाग ४ शिवाजी राजांचा पोवाडा भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ४ शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले. Tags : mahatma jyotiba phulepovadaपोवाडामहात्मा ज्योतिबा फुले भाग ४ Translation - भाषांतर लढे रांगणी विशालगडी घेई पन्हाळयास ।केले मग शुरु खंडणीस ॥रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास ।नेमिला कोल्हापूरास ॥स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास ।आला थेट पन्हाळयास ॥मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस ।अती जेर केलें त्यास ॥खंडणी घेत गेला भिडला विजापुरास ।परत मग आला गडास ॥राजापुर दाभॊळ लुटी भरी खजीन्यास ।मात गेली विजापुरास ॥सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस ।सांवत सिद्दी कुमकेस ॥बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळयास ।करी मग जमा बेगमीस ॥वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास ।केले महाग दाण्यास ॥त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस ।कोंडिलें गडी फौजेस ॥चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास ।योजना करी उपायास ॥कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास ।उपद्रव झाला रयतेस ॥पासलकर बाजीराव पडले वाडीस ।दु:ख मग झालें शिवाजीस ।सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास ।खुशाल गेला भेटीस ॥वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास ।कच्चा मग ठेवी तहास ॥सिद्दीस लाडी गोडी मधीं मान डुकलीस ।गेला थाप देऊन गडास ॥सिद्दया पोटीं खष्याली जाई झोपीं सावकास ।हयगय झाली जप्तीस ।तो शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमु-यास ।स्वारदळ लावी पाठीस ॥ चढत होता खींड शिवाजी गांठलें त्यास ।बंदुका लावी छातीस ॥बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास ।एकटा गेला रांगण्यास ॥स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस ।हरवी नित्य मोगलास ॥दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास ।धन्य त्याच्या जातीस ॥मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास ।खवळला बाजी युद्वास ॥अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास ।पडला परभू भूमीस ॥तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस ।अंती मनी हाच ध्यास ॥बार गडीं ऐकून सुखी ह्यणे आपल्यास ।नीधून गेला स्वर्गात ॥सय्यद मार्गे सरे जागा देई बाजीरावास ।पाहून स्वामीभक्तीस ॥विजापुरी मुसलमान करी तयारीस ।खासा आला लढण्यास ॥कराडास डेरे दिले घेई बहूं किल्ल्यांस ।वश करी चाचे लोकांस ॥दळव्यांची लढून घेई शृंगारपुरास ॥मारलें पाळेगारांस ॥लोकप्रीतीकरितां करी गुरु रामदासास ।राजगडीं स्थापी देतीस ॥मिष्ट अन्नभोजन दिलें सर्वा बक्षीस ।केली मग मोठी मजलस ॥तानसेनी भले गवघ्या बसवी गायास ।कमी नाहीं तालस्वरास ॥॥चाल॥जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाहि हिमानी ॥सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥छोटे भाइकूं हूल दिया । बडे भाइकी जान लिया ॥छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥मजला भाई भगादिया । आराकानमें मारा गया ।सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलिया ॥भाईबंदकू इजा दिया । रयत सब ताराज किया ।मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥बेर हुवा करो सलामी । हिंदवाणी गाद नामी ॥॥चाल॥आदी अंत [न] सर्वां कारण ॥जन्ममरंण । घाली वैरण ॥तोच तारण । तोच मारण ॥सर्व जपून । करी चाळण ॥नित्य पाळण । लावी वळण ॥भूती पाहून । मनीं ध्याइन ॥नांव देऊन । जगजीवन ॥सम होऊन । करा शोधन ॥सार घेऊन । तोडा बंधन ॥सरनौबती डंका हुकूम पालेकराचा ॥घई मुजरा शाई [रा] चा ॥सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP