मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|शिवाजी राजांचा पोवाडा| भाग २ शिवाजी राजांचा पोवाडा भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ शिवाजी राजांचा पोवाडा - भाग २ शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले. Tags : mahatma jyotiba phulepovadaपोवाडामहात्मा ज्योतिबा फुले भाग २ Translation - भाषांतर वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले ।धाकटयासवें खेळले ॥उभयतांचे एकचित्त तालमींत गेले ।फरीगदग्या शिकले ॥आवडीनें खमठोकी कुस्ती पेंचानें खेळे ।पवित्रे दस्तीचे केले ॥द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें ।घोडी फिरवूं लागले ॥आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले ।गोळी निशाण साधले ॥कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावलें ।पुत्रा नीट ऐकिवलें ॥अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले ।माते कौतुक वाटलें ।नित्य पतीचा आठव डोंगर दु:खाचे झाले ।घर स्रवतीनें घेतले ॥छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें ।मुखमुद्रेने फसिवले ॥चतुर शिवाजीने आईचें दु:ख ताडिले ।पित्यास मनीं त्यागिले ॥पुत्राचे डोळे फिरले मातें भय पडलें ।हीत उपदेशा योजिले ॥मनीं पतिभक्ती पुता बागेमधीं नेलें ।वृक्षाछायी बसीवलें ॥पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें ।नेत्रीं पाणी टपटपलें ॥या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले ।सांगतें मुळीं कसें झालें ॥क्षेत्रवासी ह्यणोन नांव क्षत्रिय धरले ।क्षेत्री सुखी राहिले ॥अन्यदेशिंचे दंगेखोर हिमालयीं आले ।होते लपून राहिले ॥पाठीं शत्रुभौती झाडी किती उपासीं मेले ।गोमासा भाजून धाले ॥पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले ।झाडी उल्लंघून आले ॥लेखणीचा धड शीपाया सेनापति केलें ।मुख्य ब्रम्ह्या नेमलें ॥बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले ।कैदी सर्वात केलें ॥सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले ।डौलाने क्षुद्र म्हणाले ॥मुख्य ब्रह्य राजा झाला जानें कायदे केले ।त्याचे पुढे भेद केले ॥ब्रह्या मेल्यावर परशुराम पुंड माजले ।उरल्या क्षत्रिया पिडिले ॥माहारमांग झाले किती देशोधडी केले ।ब्राह्यण चिरंजीव झाले ॥देश निक्षत्रिय झाल्यामुळे यवना फावलें ।सर्वास त्यांहीं पिडीलें ॥शुद्र म्हणती तुम्हा ह्रदयी बाण टोचले ।आज बोधाया फावलें ॥गाणें गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले ।बोली नाही मन धालें ॥॥चाल॥क्षेत्र क्षत्रियांचे घर, तुझे पितृ माहावीर ।सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचें माहेर ॥शीखराकार डोंगर, नानावल्ली तख्वर ॥दरी खोरी दाहे नीर खळखळे निरंतर ।झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर ।पक्षी गाती सोळा, स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार ।भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।दास केले निरंतर, ब्रह्या झाला मनीं गार ॥लोभी मेले येथे फार, विध्वा झाल्या धरोधर ।उपाय नाहीं लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ॥दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ।मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर ।दु:खा नाही त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥बहु केले देशापार, बाकी राहि मांगमाहार ।नि:क्षेत्री झाल्यावर, म्लेच्छें केले डोके वर ॥आले सिंधुनदीवर, स्वा-या केल्या वारीवार ।गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ॥॥चाल॥काबुला सोडी । नदांत उडी ॥ठेवितो दाढी । हिदूंस पीडी ॥वामना जोडी । इंद्रियें तोंडी ॥पीडीस फोडी । देऊळें पाडी ॥चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥खंडयास ताडी । जेजुरी गडीं ॥भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥गडांस वेढी । लावली शीडी ॥हिंदुस झोडी । धर्मास खोडी ॥राज्यास बेडी । कातडी काढी ॥गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥देऊळें फोडी । बांधीतो माडी ॥उडवी घोडी । कपाळा आढी ॥मीजास बडी । ताजीम खडी ॥बुरखा सोडी । पत्नीस पीडी ॥गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥माताबोध मनीं ठसतां राग आला यवनांचा ॥बेत मग केला लढण्याचा ॥तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा ॥स्नेह येशजी कंकाचा ॥मित्रां आधी ठेवी जमाव केला मावळ्याचापूर करी हत्यारांचा ॥मोठया युक्तिनें सर केला किल्ला तोरण्याचा ।रोविला झेंडा हिंदूचा ॥राजगड नवा बांधला ऊंच डोंगराचा ।भ्याला मनीं विजापुरचा ॥दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।दादोजी कोंडदेवाचा ॥मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥२॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP