देवता - गणपति

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


आरंभीं वंदीन विघ्नविनायक । जया ब्रम्हादिक वंदितील ॥१॥

वंदितील संत कवि ऋषि मुनि । मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी ॥२॥

कार्यसिद्धी होय जयासी चिंतितां । त्याचें रुप आतां सांगईन ॥३॥

सांगईन रुप सर्वांगें सुंदर । विद्येचा विस्तार तेथुनीया ॥४॥

तेथुनिया विद्या सर्व प्रगटती । ते हे विद्यामूर्ति धरा मनीं ॥५॥

मनीं धरा देव भक्तांचा कैवारी । संकटीं निवारी आलीं विघ्नें ॥६॥

आलीं विघ्नें त्यांचा करितो संहार । नामें विघ्नहर म्हणोनियां ॥७॥

म्हणोनियां आधीं स्तवन करावें । मग प्रवर्तावें साधनासी ॥८॥

साधनाचें मूळ जेणें लाभे फळ । तोचि हा केवळ गजानन ॥९॥

गजाननें देह धरिले नराचें । मुख कुंजराचें शोभतसे ॥१०॥

शोभतसे चतुर्भुज त्रिनयनु । तीक्ष्ण दशनु भव्यरुप ॥११॥

भव्यरुप त्याचें पहातां प्रचंड । चर्चिलें उदंड सेंदुरेंसी ॥१२॥

शेंदुरें चर्चिला वरी दिव्यांबरें । नाना अलंकारें शोभतसे ॥१३॥

शोभतसे करीं फरश कमळ ।एके करीं गोळ मोदकाचे ॥१४॥

मोदकाचे गोळ एके करीं माळ । नागबंदी व्याळ शोभतसे ॥१५॥

शोभतसे तेज फांकलें सर्वांगीं । उभ्या दोहीं भागीं सिद्धिबुद्धि ॥१६॥

सिद्धिबुद्धि कांता ब्रम्हयाची सुता । सुंदरी तत्वतां दोघीजणी ॥१७॥

दोघीजणीमध्यें रुप मनोहर । नाना पुष्पेंहार चंपकाचे ॥१८॥

चंपकाचे हार रुळती अपार । ब्रीदांचा तोडर वांकीं पाईं ॥१९ ॥

वांकीं मुरडीवा तें अंदु नेपुरें । गर्जती गजरें झणत्कारें ॥२०॥

झणत्कारें घंटा किंकिणी वाजटा । कट तटीं धाटा पीतांबरु ॥२१॥

पीतांबर कांसे कांसीला सुंदर । वस्त्रें अलंकार दिव्यरुप ॥२२॥

दिव्यरुप महा शोभे सिंहासनीं । मूषकवहनी गणाधीश ॥२३॥

गणाधीश माझें कुळींचे दैवत । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२४॥

पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान । आत्मनिवेदन रामदासीं ॥२५॥

सदा मदोन्मत्त बाहुबळें डुलत । लहानाळले आरक्त त्रिलोचन ॥१॥

शुंडादंडें सरळें अभिनव आवाळें । गळती गंडस्थळें दर्प सुगंधि ॥२॥

रत्नजडित कट्ट झळके एकदंत । शांत फडकावीत कर्णथापा ॥३॥

लवथव दोंद कट्ट नागबंद । धुधुःकारें द्वंद्व जिव्हा लाळीतसे ॥४॥

किणि किणि किणि वाजति किंकिणी । अमर सिंहासनिं तल्लीन सादरता ॥५॥

कुकुथारी कुकूथारी कु धिलांग उलटी धात । गिरीगिरी घेतां तळपत कुंडलें श्रवणींचीं ॥६॥

सकळ ईश्वरसभा थक्कित पाहे कौतुक । रामदास मोदक प्रेमं लाहे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP