TransLiteral Foundation

मे २४ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


नाम प्राणाबरोबर सांभाळावे.

आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का ? जे करण्याने देवाची प्राप्ती होते , ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल ? तुम्ही अभ्यास करता ; अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का ? म्हणून म्हणतो , आपल्याला जिव्हा दिली आहे , तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा . प्रकृती चांगली सुदृढ आहे ; चांगले धट्टेकट्टे पाय आहेत ; ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत , तर पाय नसलेले काय वाईट ? तुमच्यापुढे ब्रह्मानंदबुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता ? त्यांनी काय केले पाहा ! त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही . त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले . तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी , जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा . आताच्या दिवसांत तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो ; तरी ह्या वेळेस सांभाळा . अश्रध्दा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा ; आणि त्या वेळेस नामस्मरण करीत जा . माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका , पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा .

नाम व्यवहाराकरिता उपयोगांत आणू नका . नामस्मरण नामाकरताच करीत जा ; म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल . दिवसातून किती वेळ नामांत घालविला त्याचा रोज विचार करीत जा , आणि काही वेळ तरी नामांत घालविण्याचा निश्चय करा ; म्हणजे विश्वास वाढत जाईल . खरे समाधान तुम्हाला नामांतच मिळेल . भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे . नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे . सर्व संशय आपोआप नाहीसे होतील . खरोखर , भगवंताचे नाम हे बॅंकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे . वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते . विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय . भगवंताला अनन्य शरण जाऊन ‘ तुझ्या नामाचे प्रेम मला दे ’ अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी , म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल .

वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो ; म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते . ज्या समाधानाकरिता माझी खटपट चाललेली असते , ते समाधानच वासना हिरावून नेते . नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते . म्हणून , सदासर्वकाळ नामात राहिले , तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-05-25T22:22:09.5400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अगबाई

  • उद्रा . ( बायकी ) भीति , आनंद , आश्चर्य इत्यादि विकार दाखविणारा उद्रार . अगबाई ! कसायाचाच बाजार किगसारा ! - पृच . [ अग + बाई ] 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.