TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

मे १९ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी.

जगात देवाणघेवाण हा नियमच आहे . लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात , आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो . त्याप्रमाणे , प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले , तर परस्परप्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल . याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरुर आहे . घरामध्ये काय किंवा बाहेर काय , प्रेमाचा धाक असावा , भीतीचा धाक असू नये . जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे . असा नियम आहे की , ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले , तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसर्‍याला झाला , की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो . भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे ; ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा ! एक भगवंताचे प्रेम लागले , की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात . पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुध्दीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही . भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते . एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर , पोटामध्ये भूक असूनसुध्दा त्याला खाता येत नाही , किंवा अन्नाला चव लागत नाही . त्याचप्रमाणे , आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुध्दा , आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही . तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे , त्याचप्रमाणे , नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी . ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे , हे फार कठीण काम आहे ; त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा , अनुसंधान , आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत . भगवंत हा बहुरुपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे , म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत . ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील . पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे . भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे . ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी . ज्याला भगवंताचे प्रेम येईल , तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील . खरोखर , भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्याआड दुसरे काहीही येऊ शकत नाही . भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे . ते सांभाळून जो वागेल , त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल . भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा , प्रेम ठेवा . भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभसाध्य आहे . जो हीनाहून हीन आणि अडाण्यांतला अडाणी आहे , त्यालासुध्दा मिळणारा असा भगवंत आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-05-25T22:16:45.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बुदबुदाबादचें नबाब

  • पु. खुशालचेंदु ; ऐदी मनुष्य पोकळ डौल दाखविणारा मनूष्य ; ज्याचें स्थान बुडबुड्याप्रमाणें क्षणभंगुर किंवा आस्थिर पोकळ आहे असा . ' आम्ही बुदबुदाबादचे नबाब बनून हातांत फुलांचें गजरे घालून हिंडलो असतो .' - महाविस्तार मार्च ४२ . ( बुदबुद = बुडबुड ) 
RANDOM WORD

Did you know?

नाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.