TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

मे १२ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी.

अमानित्व हा देहाचा धर्म आहे . दुसर्‍याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा . दंभ हा मनाचा धर्म आहे . तो दुसर्‍याला फसविण्याकरिता नसावा . स्वत :चे कल्याण करुन घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही . अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे . अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते . वाचेने कोणाचे मन दुखवू नये , आणि देहाने परपीडा करु नये . दुसर्‍याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे . लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो , पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात . द्वेषामुळे हिंसा घडते , म्हणून आपण कोणाचाही द्वेष करु नये . कामक्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात , पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही . स्वार्थामुळे द्वेष घडतो . स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही .

आपली वाचा दुसर्‍याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही . वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते . नेहमी सत्य आणि गोड बोलावे , आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी . स्वत :ची चित्तशुध्दी करुन घेऊन , संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा . अभिमानाचे विष जिथे येते , तिथे नामाची आठवण ठेवावी . देवापेक्षासुध्दा नामाचा महिमा अधिक आहे . वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी . हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही ; पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे , तसे हिरण्यकश्यपूचे झाले . स्वत :च्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला . त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले . अभिमान जरुरीपुरताच ठेवावा . ‘ मी रामाचा आहे ’ असा अभिमान धरावा . नामाची कास धरावी . ‘ नारायणाचे दर्शन व्हावे ’ असे नाही प्रल्हाद म्हणाला , ‘ नाम नाही सोडणार ’ असे म्हणाला .

लहानपणाची वृत्ती चांगली असते . लहानपणात चूक नाहीच , आणि सगळा फायदाच असतो . भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही ; म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे . लहानपण हे वयावर अवलंबून नसून , आपल्या वृत्तीवर अवलंबून असते . कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत ; त्यापासून आपलेच मन गढूळ होते . ‘ माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो , पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस , ’ असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे . मला खात्री आहे , तो तुमच्या साहाय्याला आल्यावाचून राहणार नाही .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-05-25T22:08:37.5870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

छाउनी

  • छावणी पहा . 
RANDOM WORD

Did you know?

गंध का लावावे ? अधिक माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site