TransLiteral Foundation

श्रीदत्तात्रेयवज्रकवचम्‌

श्री दत्तात्रेयवज्रकवचम्‌

श्री दत्तात्रेयवज्रकवचम्‌
॥श्रीहरि:॥
दत्तात्रयवज्रकवच

॥श्रीदत्तात्रेयवज्रकवचम्‌ ॥
श्रीगणेशाय नम: । श्रीदत्तात्रेयाय नम: ।ऋषय ऊचु: ।
कथं संकल्पसिद्धि: स्याद्वेदव्यास कलौ युगे ।
धर्मार्थकाममोक्षणां साधनं किमुदाह्रतम्‌ ॥ १ ॥
व्यास उवाच ।
श्रृण्वन्तु ऋषय: सर्वे शीघ्रं संकल्पसाधनम्‌ ।
सकृदुच्चारमात्रेण भोगमोक्षप्रदायकम्‌ ॥ २ ॥
गौरीश्रृङ्गे हिमवत: कल्पवृक्षोपशोभितम्‌ ।
दीप्ते दिव्यमहारत्नहेममण्डपमध्यगम्‌ ॥ ३ ॥
रत्नसिंहासनासीनं प्रसन्नं परमेश्वरम्‌ ।
मन्दस्मितमुखाम्भोजं शङ्करं प्राह पार्वती॥ ४ ॥
श्रीदेव्युवाच
देवदेव महादेव लोकशङ्कर शङ्कर ।
मन्त्रजालानि सर्वाणि यन्त्रजालानि कृत्स्नश: ॥ ५ ॥
तन्त्रजालान्यनेकानि मया त्वत्त: श्रुतानि वै ।
इदानीं द्रष्टुमिच्छामि विशेषेण महीतलम्‌ ॥ ६ ॥
इत्युदीरितमाकर्ण्य पार्वत्या परमेश्वर: ।
करेणामृज्य संतोषात्पार्वतीं प्रत्यभाषत ॥ ७ ॥
मयेदानीं त्वया सार्धं वृषमारुह्य गम्यते ।
इत्युक्त्वा वृषमारुह्य पार्वत्या सह शङ्कर: ॥ ८ ॥
ययौ भूमण्डलं द्रष्टुं गौर्याश्चित्राणि दर्शयन्‌ ।
क्वचिद्‌ विन्ध्याचलप्रान्ते महारण्ये सुदुर्गमे ॥ ९ ॥
तत्र व्याहन्तुमायान्तं भिल्लं परशुधारिणम्‌ ।
वध्यमानं महाव्याघ्रं नखदंष्ट्राभिरावृतम्‌ ॥ १० ॥
अतीव चित्रचारित्र्यं वज्रकायसमायुतम्‌ ।
अप्रयत्नमनायासमखिन्नं सुखमास्थितम्‌ ॥ ११ ॥
पलायन्तं मृगं पश्चाद्‌ व्याघ्रो भीत्या पलायित: ।
एतदाश्चर्यमालोक्य पार्वती प्राह शङ्करम्‌ ॥ १२ ॥
पार्वत्युवाच
किमाश्चर्यं किमाश्चर्यमग्ने शम्भो निरीक्ष्यताम्‌ ।
इत्युक्त: स तत: शम्भूर्दृष्ट्‌वा प्राह पुराणवित्‌ ॥ १३ ॥
श्रीशङ्कर उवाच
गौरि वक्ष्यामि ते चित्रमवाङ्मनसगोचरम्‌ ।
अदृष्टपूर्वमस्माभिर्नास्ति किञ्चिन्न कुत्रचित्‌ ॥ १४ ॥
मया सम्यक्‌ समासेन वक्ष्यते श्रृणु पार्वति ।
अयं दूरश्रवा नाम भिल्ल: परमधार्मिक: ॥ १५ ॥
समित्कुशप्रसूनानि कन्दमूलफलादिकम्‌ ।
प्रत्यहं विपिनं गत्वा समादाय प्रयासत: ॥ १६ ॥
प्रिये पूर्वं मुनीन्द्रेभ्य: प्रयच्छति न वाञ्छति ।
तेऽपि तस्मिन्नपि दयां कुर्वते सर्वमौनिन: ॥ १७ ॥
दलादनो महायोगी वसन्नेव निजाश्रमे ।
कदाचिदस्मरत्‌ सिद्धम दत्तात्रेयं दिगम्बरम्‌ ॥ १८ ॥
दत्तात्रेय: स्मर्तृगामी चेतिहासं परीक्षितुम‌ ।
तत्क्षणात्सोऽपि योगीन्द्रो दत्तात्रेय: समुत्थित: ॥ १९ ॥
तं दृष्ट्वाऽऽश्चर्यतोषाभ्यां दलादनमहामुनि: ।
सम्पूज्याग्रे निषीदन्तं दत्तात्रेयमुवाच तम्‍ ॥ २० ॥
मयोपहूत: सम्प्राप्तो दत्तात्रेय महामुने ।
स्मर्तृगामी त्वमित्येतत्‌ किंवदन्तीं परीक्षितुम्‌ ॥ २१ ॥
मयाद्य संस्मृतोऽसि त्वमपराधं क्षमस्व मे ।
दत्तात्रेयो मुनिं प्राह मम प्रकृतिरीदृशी ॥ २२ ॥
अभक्त्या वा सुभक्त्या वा य: स्मरेन्मामनन्यधी: ।
तदानीं तमुपागत्य ददामि तदभीप्सितम्‌ ॥ २३ ॥
दत्तात्रेयो मुनि: प्राह दलादनमुनीश्वरम्‌ ।
यदिष्टं तद्‌ वृणीष्व त्वं यत्‌ प्राप्तोऽहं त्वया स्मृत: ॥ २४ ॥
दत्तात्रेयं मुनि: प्राह मया किमपि नोच्यते ।
त्वच्चित्ते यत्स्थितं तन्मे प्रयच्छ मुनिपुङ्गव ॥ २५ ॥
ममास्ति वज्रकवचं गृहाणेत्यवदन्मुनिम्‌ ।
तथेत्यङ्गिकृतवते दलादमुनये मुनि: ॥ २६ ॥
स्ववज्रकवचं प्राह ऋषिच्छन्द:पुर:सरम्‌ ।
न्यासं ध्यानं फलं तत्र प्रयोजनमशेषत: ॥ २७ ॥
अथ विनियोगादि :
अस्य श्रीदत्तात्रेयवज्रकवचस्तोत्रमन्त्रस्य किरातरूपी महारुद्र ऋषि:, अनुष्टप्‌ छन्द:,
श्रीदत्तात्रेयो देवता, द्रां बीजम्‌, आं शक्ति:, क्रौं कीलकम्‌, ॐ आत्मने नम: ।
ॐ द्रीं मनसे नम: । ॐ आं द्रीं श्रीं सौ: ॐ क्लां क्लीं क्लूं क्लैं क्लौं क्ल: ।
श्रीदत्तात्रेयप्रसादसिद्‌ध्यर्थे जपे विनियोग: ॥ ॐ द्रां अङ्गुष्ठाभ्यां नम: ।
ॐ द्रीं तर्जनीभ्यां नम: । ॐ द्रूं मध्यमाभ्यां नम: ।
ॐ द्रैं अनामिकाभ्यांनम: । ॐ द्रौं कनिष्ठिकाभ्यांनम: ।
ॐद्र: करतलकरपृष्ठाभ्यां नम: । ॐ द्रां ह्रदयाय नम: । ॐ द्रीं शिरसे स्वाहा ।
ॐ द्रूं शिखायै वषट्‌ । ॐ द्रैं कवचाय हुम्‌ । ॐ द्रौं नेत्रत्रयाय वौषट्‍ ।
ॐ द्र: अस्त्राय फट्‍ । ॐ भूर्भुव:स्वरोम्‍ इरि दिग्बन्ध: ।
अथ ध्यानम्‍
जगदङ्कुरकन्दाय सच्चिदानन्दमूर्तये ।
दत्तात्रेयाय योगीन्द्रचन्द्राय परमात्मने (नम:) ॥ १ ॥
कदा योगी कदा भोगी कदा नग्न: पिशाचवत्।
दत्तात्रेयो हरि: साक्षाद्‍ भुक्तिमुक्तिप्रदायक: ॥ २ ॥
वाराणसीपुरस्नायी कोल्हापुरजपादर:
माहुरीपुरभिक्षाशी सह्यशायी दिगम्बर: ॥ ३ ॥
इन्द्रनीलसमाकारश्चन्द्रकान्तसमद्युति: ।
वैदुर्यसदृशस्फूर्तिश्चलत्किञ्चिज्जटाधर: ॥ ४ ॥
स्निग्धधावल्ययुक्ताक्षोऽत्यन्तनीलकनीनिक: ।
भ्रूवक्ष:श्मश्रुनीलाङ्क: शशाङ्कसदृशानन: ॥ ५ ॥
हासनिर्जितनीहार: कण्ठनिर्जितकम्बुक: ।
मांसलांसो दीर्घबाहु: पाणिनिर्जितपल्लव: ॥ ६ ॥
विशालपीनवक्षाश्च ताम्रपाणिर्दरोदर: ।
पृथुलश्रोणिललितो विशालजघनस्थल: ॥ ७ ॥
रम्भास्तम्भोपमानोरूर्जानुपूर्वैकजंघक: ।
गूढगुल्फ: कूर्मपृष्ठो लसत्पादोपरिस्थल: ॥ ८ ॥
रक्तारविन्दसदृशरमणीयपदाधर: ।
चर्माम्बरधरो योगी स्मर्तृगामी क्षणे क्षणे ॥ ९ ॥
ज्ञानोपदेशनिरतो विपद्धरनदीक्षित: ।
सिद्धासनसमासीन ऋजुकायो हसन्मुख: ॥ १० ॥
वामह्स्तेन वरदो दक्षिणेनाभयंकर: ।
बालोन्मत्तपिशाचीभि: क्वचिद्युक्त: परीक्षित: ॥ ११ ॥
त्यागी भोगी महायोगी नित्यानन्दो निरञ्जन: ।
सर्वरूपी सर्वदाता सर्वग: सर्वकामद: ॥१२॥
भस्मोद्धूलितसर्वाङ्गो महापातकनाशन: ।
भुक्तिप्रदो मुक्तिदाता जीवन्मुक्तो न संशय: ॥ १३ ॥
एवं ध्यात्वाऽनन्यचित्तो मद्वज्रकवचं पठेत्।
मामेव पश्यन्सर्वत्र स मया सह संचरेत् ॥ १४ ॥
दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलम डमरुं गदायुधम् ।
पद्‌मासनं योगिमुनीन्द्रवन्दितं दत्तेति नामस्मरेणन नित्यम् ॥ १५ ॥
अथ पञ्चोपचारपूजा
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय लं पृथिवीगन्धतन्मात्रात्मकं चन्दनं परिकल्पयामि ।
ॐ नमो भगवते दत्तात्रेयायं हं आकाशशब्दतन्मात्रात्मकं पुष्पं परिकल्पयामि ।
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय यं वायुस्पर्शतन्मात्रात्मकं धूपं परिकल्पयामि ।
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय रं तेजोरूपतन्मात्रात्मकं दीपं परिकल्पयामि ।
ॐ नमोभगवते दत्तात्रेयाय वं अमृतरसत्नमात्रात्मकं नैवेद्यं परिकल्पयामि ।
ॐ द्रां' इति मन्त्रम् अष्टोत्तरशतवारं (१०८) जपेत्।) 
अथ वज्रकवचम्‍
ॐ दत्तात्रेय: शिर: पातु सहस्त्राब्जेषु संस्थित: ।
भालं पात्वानसूयेयश्चन्द्रमण्डलमध्यग: ॥ १ ॥
कूर्चं मनोमय: पातु हं क्षं द्विदलपद्मभू: ।
ज्योतीरूपोऽक्षिणी पातु पातु शब्दात्मक: श्रुती ॥ २ ॥
नासिकां पातु गन्धात्मा मुखं पातु रसात्मक: ।
जिह्वां वेदात्मक: पातु दन्तोष्ठौ पातु धार्मिक: ॥३॥
कपोलावत्रिभू: पातु पात्वशेषं ममात्मवित्।
स्वरात्मा षोडशाराब्जस्थित: स्वात्माऽवताद्‍गलम्॥४॥
स्कन्धौ चन्द्रानुज: पातु भुजौ पातु कृतादिभू: ।
जत्रुणी शत्रुजित्‍ पातु पातु वक्ष:स्थलं हरि: ॥५॥
कादिठान्तद्वादशारपद्‍मगो मरुदात्मक: ।
योगीश्वरेश्वर: पातु ह्रदयं ह्रदयस्थित: ॥ ६ ॥
पार्श्वे हरि: पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थित: स्मृत: ।
हठयोगादियोगज्ञ: कुक्षी पातु कृपानिधि: ॥७॥
डकारादिफकारान्तदशारसरसीरुहे ।
नाभिस्थले वर्तमानो नाभिं वह्वयात्मकोऽवतु ॥८॥
वह्नितत्त्वमयो योगी रक्षतान्मणिपूरकम्।
कटिं कटिस्थब्रह्माण्डवासुदेवात्मकोऽवतु ॥९॥
बकारादिलकारान्तषट्‍पत्राम्बुजबोधक: ।
जलतत्त्वमयो योगी स्वाधिष्ठानं ममावतु ॥ १० ॥
सिद्धासनसमासीन ऊरू सिद्धेश्वरोऽवतु ।
वादिसान्तचतुष्पत्रसरोरुहनिबोधक: ॥ ११ ॥
मूलाधारं महीरूपो रक्षताद्वीर्यनिग्रही ।
पृष्ठं च सर्वत: पातु जानुन्यस्तकराम्बुज: ॥१२॥
जङ्घे पत्ववधूतेन्द्र: पात्वङ्घ्री तीर्थपावन; ।
सर्वाङ्गं पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशव: ॥१३॥
चर्म चर्माम्बर: पातु रक्तं भक्तिप्रियोऽवतु ।
मांसं मांसकर: पातु मज्जां मज्जात्मकोऽवतु ॥१४॥
अस्थीनि स्थिरधी: पायान्मेधां वेधा: प्रपालयेत्।
शुक्रं सुखकर: पातु चित्तं पातु दृढाकृति: ॥ १५॥
मनोबुद्धिमहंकारम ह्रषीकेशात्मकोऽवतु ।
कर्मेन्द्रियाणि पात्वीश: पातु ज्ञानेन्द्रियाण्यज: ॥१६॥
बन्धून‍ बन्धूत्तम: पायाच्छत्रुभ्य: पातु शत्रुजित्
गृहारामधनक्षेत्रपुत्रादीञ्छ्ङ्करोऽवतु ॥१७॥
भार्यां प्रकृतिवित्पातु पश्वादीन्पातु शार्ङ्गभृत् ।
प्राणान्पातु प्रधानज्ञो भक्ष्यादीन्पातु भास्कर: ॥१८॥
सुखं चन्द्रात्मक: पातु दु:खात्पातु पुरान्तक: ।
पशून्पशुपति: पातु भूतिं भुतेश्वरो मम ॥१९॥
प्राच्यां विषहर: पातु पात्वाग्नेय्यां मखात्मक: ।
याम्यां धर्मात्मक: पतु नैऋत्यां सर्ववैरिह्रत्।२०॥
वराह: पातु वारुण्यां वायव्यां प्राणदोऽवतु ।
कौबेर्यां धनद: पातु पात्वैशान्यां महागुरु: ॥२१॥
ऊर्ध्व पातु महासिद्ध: पात्वधस्ताज्जटाधर: ।
रक्षाहीनं तु यत्स्थानं रक्षत्वादिमुनीश्वर: ॥२२॥
'
ॐ द्रां' मन्त्रजप:, ह्रदयादिन्यास: च ।एतन्मे वज्रकवचं य: पठेच्छृणुयादपि ।
वज्रकायश्चिरञ्जीवी दत्तात्रेयोऽहमब्रुवम्॥२३॥
त्यागी भोगी महायोगी सुखदु:खविवर्जित: ।
सर्वत्रसिद्धसंकल्पो जीवन्मुक्तोऽथ वर्तते ॥२४॥
इत्युक्त्वान्तर्दधे योगी दत्तात्रेयो दिगम्बर: ।
दलादनोऽपि तज्जप्त्वा जीवन्मुक्त: स वर्तते ॥ २५ ॥
भिल्लो दूरश्रवा नाम तदानीं श्रुतवानिदम्।
सकृच्छ्र्वणमात्रेण वज्राङ्गोऽभवदप्यसौ ॥२६॥
इत्येतद्वज्रकवचं दत्तात्रेयस्य योगिन: ।
श्रुत्वाशेषं शम्भुमुखात्‍ पुनरप्याह पार्वती ॥२७॥
पार्वत्युवाच
एतत्कवचमाहात्म्यम वद विस्तरतो मम ।
कुत्र केन कदा जाप्यं किं यज्जाप्यं कथं कथम्॥२८॥
उवाच शम्भुस्तत्सर्वं पार्वत्या विनयोदितम्।
श्रीशिव उवाच
श्रृणु पार्वति वक्ष्यामि समाहितमनविलम्॥२९॥
धर्मार्थकाममोक्षणामिदमेव परायणम् ।
हस्त्यश्वरथपादातिसर्वैश्वर्यप्रदायकम्॥३०॥
पुत्रमित्रकलत्रादिसर्वसन्तोषसाधनम् ।
वेदशास्त्रादिविद्यानां निधानं परमं हि तत्॥३१॥
सङ्गितशास्त्रसाहित्यसत्कवित्वविधायकम्।
बुद्धिविद्यास्मृतिप्रज्ञामतिप्रौढिप्रदायकम्॥३२॥
सर्वसंतोषकरणं सर्वदु:खनिवारणम् ।
शत्रुसंहारकं शीघ्रं यश:कीर्तिविवर्धनम् ॥३३॥
अष्टसंख्या: महारोगा: सन्निपातास्त्रयोदश ।
षण्णवत्यक्षिरोगाश्च विंशतिर्मेहरोगका: ॥३४॥
अष्टादश तु कुष्ठानि गुल्मान्यष्टविधान्यपि ।
अशीतिर्वातरोगाश्च चत्वारिंशत्तु पैत्तिका: ॥३५॥
विंशति: श्लेष्मरोगाश्च क्षयचातुर्थिकादय: ।
मन्त्रयन्त्रकुयोगाद्या: कल्पतन्त्रादिनिर्मिता: ॥३६॥
ब्रह्मराक्षसवेतालकूष्माण्डादिग्रहोद्‍भवा: ।
संगजा देशकालस्थास्तापत्रयसमुत्थिता: ॥३७ ॥
नवग्रहसमुद्‍भूता महापातकसम्भवा: ।
सर्वे रोगा: प्रणश्यन्ति सहस्त्रावर्तनाद्‍ध्रुवम्॥ ३८ ॥
अयुतावृत्तिमात्रेण वन्ध्या पुत्रवती भवेत्।
अयुतद्वितयावृत्त्या ह्यपमृत्युजयो भवेत्॥३९॥
अयुतत्रितयाच्चैव खेचरत्वं प्रजायते ।
सहस्त्रादयुतादर्वाक्‍ सर्वकार्याणि साधयेत्॥४०॥
लक्षावृत्त्या कार्यसिद्धिर्भवत्येव न संशय: ॥४१॥
विषवृक्षस्य मूलेषु तिष्ठन्‍ वै दक्षिणामुख: ।
कुरुते मासमात्रेण वैरिणं विकलेन्द्रियम्॥४२॥
औदुम्बरतरोर्मूले वृद्धिकामेन जाप्यते ।
श्रीवृक्षमूले श्रीकामी तिन्तिणी शान्तिकर्मणि ॥४३॥
ओजस्कामोऽश्वत्थमूले स्त्रीकामै: सहकारके ।
ज्ञानार्थी तुलसीमूले गर्भगेहे सुतार्थिभि: ॥४४॥
धनार्थिभिस्तु सुक्षेत्रे पशुकामैस्तु गोष्ठके ।
देवालये सर्वकामैस्तत्काले सर्वदर्शितम्॥४५॥
नाभिमात्रजले स्थित्वा भानुमालोक्य यो जपेत्।
युद्धे वा शास्त्रवादे वा सहस्त्रेन जयो भवेत्॥४६॥
कण्ठमात्रे जले स्थित्वा यो रात्रौ कवचं पठेत्।
ज्वरापस्मारकुष्ठादितापज्वरनिवारणम्॥४७॥
यत्र यत्स्यात्स्थिरं यद्यत्प्रसक्तं तन्निवर्तते ।
तेन तत्र हि जप्तव्यं तत: सिद्धिर्भवेद्‍ध्रुवम्॥४८ ॥
इत्युक्तवान्‍ शिवो गौर्ये रहस्यं परमं शुभम्।
य: पठेद्‍ वज्रकवचं दत्तात्रेयसमो भवेत्॥४९॥
एवम शिवेन कथितं हिमवत्सुतायै।
प्रोक्तं दलादमुनयेऽत्रिसुतेन पूर्वम्।
य: कोऽपि वज्रकवचं पठतीह लोके
दत्तोपमश्र्चरति योगिवरश्र्चिरायु: ॥५०॥
इति श्रीरुद्रयामले हिमवत्खण्डे मन्त्रशास्त्रे उमामहेश्वरसंवादे
श्रीदत्तात्रेयवज्रकवचस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
Translation - भाषांतर
ऋषींनी विचारले - "अहो भगवन वेदव्यास, या कलियुगात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साध्य होण्यासाठी आम्ही जे संकल्प करू, ते कसे सिद्ध होतील बरे? त्यासाठी कोणते साधन सांगितले आहे? (ते आपण आम्हांला कृपा करून सांगावे.)" (१ )
श्री भगवन व्यास म्हणाले- "हे ऋषींनो, आपण सर्वजण तत्काळ इच्छा पूर्ण करणारे साधन ऎका. ज्याचे केवळ एकदाच पठन केले असताही ते (इहलोकी) सुखोपभोग आणि (परलोकी) मोक्ष मिळवून देणारे आहे." (२)
हिमालयाच्या देदीप्यमान गौरीशिखरावर कल्पवृक्षांनी सुशोभित असलेल्या व तेजस्वी मोठमोठ्या रत्नांनी खचित अशा सुवर्णमण्डपात
रत्नजडित सिंहासनावर देवाधिदेव श्रीशंकर बसले होते. प्रसन्नतेने त्यांच्या मुखकमलावर मंद स्मितहास्य झळकत होते. त्यांना श्रीपार्वती म्हणाल्या. (३-४)
"हे देवाधिदेवा, लोककल्याण करणार्‌या महादेवा, शंकरा,
मी आपल्याकडून सर्व मंत्र, यंत्रे आणि अनेक तंत्रे संपूर्ण ऎकली आहेत.
आता माझी विशेषकरून भूमण्डळ पाहण्याची इच्छा आहे." (५-६)
श्रीपार्वतींचे हे बोलणे ऎकून श्रीशंकरांनी समाधानाने श्रीपार्वतीदेवींचा
हात हातात घेऊन त्यांना म्हटले- "मी आताच तुझ्याबरोबर नंदीवर बसून
येतो." असे म्हणून श्रीशंकर पार्वतीसह नंदीवर आरूढ झाल. (७-८)
आणि पार्वतीदेवींना नाना दृश्ये दाखवीत भूमंडळ पाहण्यासाठी निघाले.
आणि एकदा विंध्यपर्वताजवळच्या अतिशय दुर्गम अशा मोठ्या अरण्यात
(येऊन पोहोचले. )(९)
तेथे हातात फरशी घेतलेला एक भिल्ल त्यांनी पाहिला. तो मोठमोठी
नखे व दाढा असलेल्या एका मोठ्या वाघाला ठार करण्यासाठी येत होता.
(पण) त्याचे चरित्र अतिशय विलक्षण होते. त्याचे शरीर वज्रासारखे कठोर होते.
(वाघाला मारण्याचे त्याचे कोणतेही) प्रयत्न दिसत नव्हते. त्याला काही श्रम
झाल्याचे दिसत नव्हते. तो मोठ्या आनंदात आरामात उभा होता. (पण) हरीण
पळत असलेला पाहून त्याच्या पाठोपाठ वाघही घाबरून पळाला. (भिल्ल
धडधाकट असून वाघाला मारण्याचा प्रयत्न करत नाही किंवा वाघ हरिणाला
न मारता पळून जातो,) हे आश्चर्य पाहून श्रीपार्वतीदेवी श्रीशंकरांना म्हणाल्या.
(१०-१२)
"हे भगवन्‌ शंभो, काय आश्चर्य ! समोर पाहा. केवढे आश्चर्य!!" असे म्हटल्यावर प्राचीन घटना जाणणारे भगवान शंकर समोर पाहून (पार्वतींना) म्हणाले. (१३)
हे गौरी, या आश्चर्याविषयी मी तुला सांगतो. (कारण) आमच्या वाणीला किंवा मनाला अज्ञात असे काहीच नाही. तसेच आम्ही कुठेही काहीही पूर्वी पाहिलेले नाही, असे नाही. म्हणून हे पार्वती, याविषयी मी तुला थोडक्यात नीट सांगतो, ते ऎक.
हा दूरश्रवा नावाचा अतिशय धार्मिक भिल्ल आहे. हे प्रिये, हा पूर्वी दररोज अरण्यात जाऊन प्रयत्नपूर्वक समिधा, दर्भ, फुले, कंदमुळे, फळे वगैरे आणून श्रेष्ठ मुनींना देत असे. पण कशाचीही अपेक्षा करीत नसे.
ते सर्व मुनीदेखील त्याच्यावर कृपा करीत. (१४-१७)
(येथेच) दलादन (= पाने खाऊन राहणारे) नावाचे महायोगी आपल्या आश्रमात राहतात. (त्यांच्या प्रभावानेच व्याधाने शिकार केली नाही आणि वाघाने हरिणाला मारले नाही, हे आश्चर्य घडले.) एकदा त्यांनी भगवान दत्तात्रेय स्मर्तृगामी (=स्मरण करताच प्रगट होणारे) आहेत हे ऎकून त्याचा पडताळा पाहण्यासाठी सिद्ध, दिगंबर, दत्तात्रेयांचे स्मरण केले. आणि त्याचक्षणी ते योगिराज दत्तात्रेयही समोर प्रगट झाले. (१८-१९)
त्यांना पाहताच दलादनमहामुनींना आश्चर्य वाटलेच; (पण खूप) आनंद्‌ झाला.
त्यांनी भगवान दत्तात्रेयांची पूजा केली आणी समोर आसनावर बसलेल्या त्यांना म्हटले - "हे भगवन, दत्तात्रेयमहामुने, आपण स्मर्तृगामी आहात, अशी आपली ख्याती आहे. याची परीक्षा पाहण्यासाठी मी आपले आवाहन केले आणि आपण (तत्काळ) दर्शन दिले. मी आज आपले (अकारण) स्मरण केले.
या अपराधाबद्दल मला क्षमा करा. श्रीदत्तात्रेय मुनींना म्हणाले माझा स्वभाव असाच आहे. जो कोणी अत्यंत भक्तीने किंवा भक्ती नसतानाही एकाग्र चित्ताने माझे स्मरण करील, त्याच्याजवळ त्यावेळी जाऊन मी त्याची इच्छित कामना पूर्ण करतो." (२०-२३)
श्रीदत्तात्रेयमुनी (पुन्हा) दलादनमुनिश्रेष्ठांन म्हणाले- "तू स्मरण केल्यामुळे मी आलो.
तेव्हा जे तुला इष्ट असेल, ते माग." (२४)
यावर दलादनमुनी श्रीदत्तात्रेयांना म्हणाले- "मला काहीही मागावयाचे नाही.
(तरीही) हे मुनिश्रेष्ठ, आपल्या मनात जे (मला द्यावेसे वाटत) असेल, ते द्या. (२५)
श्रीदत्तात्रेय मुनीला म्हणाले - "हे माझे वज्रकवच आहे, ते घे." "ठीक आहे" असे म्हणून दलादमुनींनी ते मान्य केले. तेव्हा श्री दत्तात्रेयांनी त्याला ऋषी, छन्द, न्यास, ध्यान, फल आणि प्रयोजन या सर्वांसह स्वत:च्या वज्रकवचाचा उपदेश केला. (२६-२७)
विश्वरूप अंकुराचे मूळ असलेल्या, सच्चिदानन्दस्वरूप, श्रेष्ठ योग्यांना चंद्राप्रमाणे आल्हाद देणार्‍या,  परमात्मा श्रीदत्तात्रेयांना (नमस्कार असो.) (१)
श्रीदत्तात्रेय हे साक्षात विष्णू आहेत. ते कधी योगिरूपात कधी विलासी रूपात, तर कधी पिशाचाप्रमाणे नग्नरूपात असतात. ते सुखभोग व मोक्ष देणारे आहेत. (२)
ते काशीला स्नान करतात. कोल्हापुरला जप करतात. माहुरगडावर भिक्षा घेतात आणि दिगम्बर असे ते सह्याद्रीवर शयन करतात. (३)
इन्द्रनील रत्नाप्रमाणे त्यांचे शरीर आहे. चन्द्रकांत रत्नाप्रमाणे त्यांची कांती आहे.
किंचित भुरभुरणार्‍या जटा त्यांनी धारण केल्या असून वैडूर्यारत्नासारखी त्यांची चमक आहे. (४)
ज्यांच्या बाहुल्या अतिशय निळ्या आहेत असे, शुभ्र कडा असलेले त्यांचे नेत्र स्नेहपूर्ण आहेत.
त्यांच्या भुवय, श्मश्रू व छातीवरचे केस काळेभोर असून मुख चंद्रासारखे आहे. (५)
त्यांनी हास्याने दवबिंदूंना जिंकले असून त्यांच्या कंठाच्या सौंदर्याने शंखाला पराजित केले आहे.
त्यांचे खांदे पुष्ट असून बाहू लांब आहेत. त्यांचे कोमल हात पालवीलाही लाजविणारे आहेत. (६ )
त्यांची छाती विशाल व पुष्ट असून हात लाल आहेत आणि पोट बारीक आहे.
पुष्ट नितंबामुळे ते शोभत असून त्यांचा कटिप्रदेश विशाल आहे. (७)
त्यांच्या मांड्या केळीसारख्या निमुळत्या असून त्यांनी एक जांघ दुसर्‍या गुडघ्यावर ठेवली आहे.
त्यांचे घोटे (मांसल असल्याने) दिसत नाहीत. आणि पायांचा वरचा भाग कासवाच्या पाठीसारखा वर येऊन शोभत आहे. (८)
त्यांच्या पावलांचे तळवे रक्तकमळासारखे रमणीय आहेत. त्यांनी मृगचर्माचे वस्त्र परिधान केले
असून ते योगी आहेत. भक्ताने स्मरण केले असता कोणत्याही क्षणी ते त्याच्याकडे जातात. (९)
ज्ञानाचा उपदेश करण्यात ते नेहमी रत असून (भक्तांची) संकटे दूर करण्याचे त्यांचे व्रत आहे. हसतमुख असे ते शरीर ताठ ठेवून सिद्दासनात बसलेले असतात. (१०)
त्यांच्या डाव्या हाताची मुद्रा वर देणारी तर उजव्या हाताची अभय देणारी आहे.
काही वेळा ते लहान मुले, वेडे व पिशाची यांच्याबरोबर असलेले दिसतात. (११)
ते त्यागी आहेत, भोगी आहेत, तसे महायोगीही आहेत. नित्य आनंदात मग्न असलेले ते
ब्रह्मज्ञानीही आहेत. (एकाच वेळी) सर्व रूपे धारण करणारे, सर्व काही देणारे, सर्वत्र जाणारे
आणि (भक्तांच्या) सर्व कामना पूर्ण करणारे आहेत. (१२)
त्यांनी सर्वांगाला भस्मलेपन केलेले आहे. ते सर्व पातकांचा नाश करणारे आहेत.
ते सुखोपभोव आणि मोक्ष देणारे आहेत. ते जीवन्मुक्त आहेत, यात(मुळीच) संशय नाही. ॥ १३ ॥
अशा प्रकारे ध्यान करून एकाग्र चित्ताने माझ्या वज्रकवचाचे पठन करावे.
जो मलाच सर्वत्र पाहील, तो माझ्याबरोबरच संचार करील. (१४)
दिगंबर, भस्म व सुगंधी द्रव्ये अंगाला लावलेल्या, चक्र, त्रिशूल, डमरू व गदा ही आयुधे
धारण करणार्‍या, पद्मासन घातलेल्या आणि 'दत्त' या नामाचे नित्य स्मरण करीत योगी
व मुनिवर्यांनी वन्दन केलेल्या (श्रीदत्तात्रेयांचे मी ध्यान करतो.) (१५)
-वज्रकवच-
सहस्त्रारात राहणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत.
चन्द्रमण्डलात राहणारे श्रीअनसूयापुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करोत. (१)
हं क्षं अक्षरयुक्त द्विदल पद्मात (आज्ञाचक्रात) राहणारे मनोमय श्रीदत्तात्रेय मुखावरील केसांचे रक्षण करोत.
ज्योति:स्वरूप श्रीदत्तात्रेय दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. शब्दस्वरूप श्रीदत्तात्रेय दोन्ही कानांचे रक्षण करोत. (२)
गन्धरूप श्रीदत्तात्रेय नाकाचे रक्षण करोत. रसरूप श्रीदत्तात्रेय मुखाचे रक्षण करोत. वेदस्वरूप श्रीदत्तात्रेय जिभेचे रक्षण करोत. धर्मशील श्रीदत्तात्रेय दात व ओठ यांचे रक्षण करोत. (३)
श्री अत्रिपुत्र गालांचे रक्षण करोत. आत्मज्ञानी श्रीदत्तात्रेय माझ्या संपूर्ण मुखाचे रक्षण करोत. सोळा दलांच्या कमलात (विशुद्धिचक्रा) राहणारे, माझा आत्मा असलेले स्वरस्वरूप श्रीदत्तात्रेय गळ्याचे रक्षण करोत. (४)
चन्द्राचे धाकटे बंधू श्रीदत्तात्रेय उभय खांद्यांचे रक्षण करोत. कृतयुगाच्या प्रारंभी प्रकट झालेले श्रीदत्तात्रेय माझ्या बाहूंचे रक्षन करोत. शत्रूंना जिंकणारे श्री दत्तात्रेय गळ्याजवळील फासळ्यांचे रक्षण करोत.
(भक्तांचा कारणासह संसार) हरण करणारे श्रीदत्तात्रेय छातीचे रक्षण करोत. (५)
ह्रदयातील कपासून ठपर्यंत बारा अक्षरांनी युक्त असणार्‍या द्वादशकमलरूप अनाहतचक्रात
वायुरूपात राहणारे योगीश्वरांचे ईश्वर माझ्या ह्रदयाचे रक्षण करोत. (६)
(नेहमीच) जवळ असणारे आणि स्मरण करताच (साक्षात) जवळ उपस्थित होणारे (सर्व दु:खांचे) हरण करणारे माझ्या डाव्या-उजव्या बाजूंचे रक्षण करोत. हठयोग इत्यादी योग जाणणारे दयानिधी पोटाचे रक्षण करोत. (७)
नाभीच्या ठिकाणी असणार्‍या, ड ते फ पर्यंत दहा अक्षरांनी युक्त दशदलकमलात (मणिपूरचक्रा)
(वैश्वानर) अग्निस्वरूपी श्रीदत्तात्रेय नाभीचे रक्षण करोत. (८)
(तसेच) अगितत्त्वमय योगी भगवान मणिपूरचक्राचे रक्षण करोत. ज्यांच्या कटिप्रदेशात अखिल
ब्रह्मांड सामावले आहे, असे वासुदेवरूप श्रीदत्तात्रेय कमरेचे रक्षण करोत. (९)
ब ते ल पर्यंत सहा अक्षरांनी युक्त षड्‍दलकमळाचा बोध करून देणारे जलतत्त्वमय
योगी भगवान माझ्या स्वाधिष्ठान चक्राचे रक्षण करोत. (१०)
सिद्धासनात बसलेले सिद्धांचे ईश्वर मांड्यांचे रक्षण करोत. व ते सपर्यंत चार अक्षरांनी
युक्त चतुर्दल कमलाचा बोध करून देणारे, पृथ्वीतत्त्वरूप असणारे नैष्ठिक ब्रह्मचारी
मूलाधारचक्राचे रक्षण करोत आणि गुडघ्यांवर करकमले ठेवून बसलेले भगवान
पाठीचे सर्व बाजूंनी रक्षण करोत. (११-१२)
अवधूतांचे स्वामी मांड्यांचे रक्षण करोत. तीर्थांना पावन करणारे भगवान पायांचे रक्षण करोत.
सर्वस्वरूपी श्रीदत्तात्रेय सर्व शरीराचे रक्षण करोत. ब्रह्म विष्णु- शिवात्मक शक्तींनी युक्त भगवान
माझ्या रोमांचे रक्षण करोत. (१३)
मृगचर्म धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या त्वचेचे रक्षण करोत. (तसेच) भक्ती प्रिय असणारे
भगवान रक्ताचे रक्षण करोत. (शरीरात) मांस निर्माण करणारे भगवान माझ्या मांसाचे रक्षण करोत.
(आणि) मज्जास्वरूप श्रीदत्तात्रेय मज्जेचे रक्षण करोत. (१४)
स्थिरबुद्धी भगवान हाडांचे रक्षण करोत. विश्वनिर्माते श्रीदत्तात्रेय बुद्धीचे रक्षण करोत.
सुख देणारे भगवान वीर्याचे रक्षण करोत. र्‍हासरहित शरीर धारण करणारे भगवान
माझ्या चित्ताचे रक्षण करोत. (१५)
इंद्रियांचे स्वामी असणारे भगवान मन-बुद्धि- अहंकाराचे रक्षन करोत. ईश्वर माझ्या
कर्मेन्द्रियांचे रक्षण करोत आणि जन्मरहित भगवान माझ्या ज्ञानेंद्रियांचे रक्षण करोत. (१६)
श्रेष्ठ आप्त असणारे भगवान माझ्या बांधवाचे रक्षण करोत. शत्रूंना जिंकणारे श्रीदत्तात्रेय माझे
शत्रूंपासून रक्षण करोत. (सर्वांचे) कल्याण करणरे भगवान घर, बागबगीचा, धन, शेत पुत्र
इत्यादींचे रक्षण करोत. (१७)
मायेला जाणणारे भगवान पत्निचे रक्षण करोत. शार्ङ्ग धनुष्य धारण करणारे भगवान
पशू (पक्षी) इत्यादींचे रक्षण करोत. त्रिगुणात्मक प्रधानाला जाणणारे श्रीदत्तात्रेय प्राणांचे रक्षण करोत.
सूर्यरूप भगवान भक्ष्य (भोज्य) इत्यादींचे रक्षण करोत. (१८)
चंद्ररूप भगवन सुखाचे रक्षण करोत (आणि) त्रिपुरासुराचा वध करणारे शिवस्वरूप दत्तात्रेय दु:खापासून रक्षण
करोत. पशूंचे अधिपती पशूंचे रक्षण करोत. (आणि) भूतांचे नाथ माझ्या वैभवाचे रक्षण करोत. (१९)
विष नाहीसे करणारे पूर्व दिशेला माझे रक्षण करोत. यज्ञस्वरूप भगवान आग्नेय दिशेला रक्षण करोत.
धर्मराजरूप भगवान दक्षिण दिशेला रक्षण करोत (आणि) सर्व शत्रूंचा नाश करणारे नैऋत्येला रक्षण करोत.
वराहरूपी श्रीदत्त पश्चिमेला रक्षण करोत. सर्वांच्या ठिकाणी प्राणसंचार करणारे वायुरूप भगवान वायव्येला
रक्षण करोत. कुबेररूप भगवान उत्तरेला रक्षण करोत. महागुरू ईशान्येला रक्षण करोत. (२१)
महासिद्ध ऊर्ध्व दिशेला रक्षण करोत. जटाधारी खालील दिशेला रक्षण करोत. (आणि) आदिमुनीश्वर वर
उल्लेख नसलेल्या सर्व ठिकाणी रक्षण करोत. (२२)
(१०८ वेळा मंत्रजप व पृ. ११ वरील न्यास करावा)
फलश्रुती
जो या माझ्या वज्रकवचाचे पठन करील किंबहुना श्रवण करील, त्याचे शरीर वज्रासारखे बळकट
होऊन तो चिरंजीव होईल, असे मी दत्तात्रेय सांगतो. (२३)
तो त्यागी, सुखोपभोगी घेणारा, महान योगी व सुखदु:खापासून अलिप्त होतो. सर्व बाबींत त्याचे
संकल्प सिद्ध होतात. तसेच तो जीवन्मुक्त होतो. (२४)
एवढे बोलून दिगंबर योगी द्त्तात्रेय अन्तर्धान पावले. ते द्लादनसुद्दा त्याचा जप करून सध्या जीवन्मुक्त अवस्थेत आहेत. (२५)
दूरश्रवा नावाच्या भिल्लाने (ही) त्यावेळी हे ऎकले. ते एकदा ऎकूनही त्याचे शरीर वज्रासारखे सुदृढ झाले. (२६)
योगी दत्तात्रेयांचे हे वज्रकवच श्रीशंकराच्य़ा मुखातून पूर्णपणे ऎकून श्रीपार्वती पुन्हा म्हणाल्या. (२७)
या कवचाचे माहात्म्य मला विस्तारपूवक सांगा. हे कोणी केव्हा व कोठे जपावे?
आणि ज्याचा जप करायचा, तो कसा कसा करावा? (२८)
श्रीपार्वतींनी नम्रपणे जे जे विचारले, ते सर्व श्रीशंकरांनी सांगितले. श्रीशंकर म्हणाले-
हे पार्वती, मी सांगतो ते लक्षपूवक सर्व काही ऎक. (२९)
धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे हेच श्रेष्ठ स्तोत्र आहे. तसेच हत्ती, घोडे, रथ,
पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऎश्वर्य देणारे आहे. (३०)
हे पुत्र, मित्र, पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे असून वेद,
शास्त्र इत्यादी विद्यांचे ते श्रेष्ठ निधान आहे. (३१)
हे संगीत, शास्त्र, साहित्य आणि उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे आहे. तसेच
बुद्धी, विद्या, स्मृती, प्रज्ञा आणि अध्यात्मज्ञान देणारे आहे. (३२)
हे सर्व प्रकारचे दु:ख दूर करणारे व सर्व प्रकारचे सुख देणारे आहे. तसेच हे
शत्रूंचा नाश करणारे असून तत्काळ विपुल कीर्ती वाढविणारे आहे.
आठ प्रकारचे महारोग, तेरा प्रकारचे संनिपात, शहाण्णव प्रकारचे नेत्ररोग, वीस प्रकारचे मूत्ररोग,
अठरा प्रकारचे कुष्ठरोग, आठही प्रकारचे गुल्मरोग, ऎशी प्रकारचे वातरोग, चाळीस प्रकारचे पित्तरोग,
वीस प्रकारचे कफरोग, शिवाय क्षयरोग, चार-चार दिवसांनी येणारे ताप इत्यादी, शिवाय मंत्र, यंत्र,
कुयोग, जादूटोणा इत्यादींपासून निर्माण झालेल्या पीडा, ब्रह्मराक्षस-वेताळ-पिशाचबाधा यांपासून
उत्पन्न झालेल्या पीडा, सांसर्गिक रोग, देश-कालानुसार उत्पन्न होणारे रोग, आधिदैविक, आधिभौतिक
व आध्यात्मिक असे त्रिविध ताप, नवग्रहांमुळे, तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे असे सर्व प्रकारचे
रोग सहस्त्रावर्तनांमुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात. (३४-३८)
याचे दहाहजार वेळा पठन करण्यामुळे वांझ स्त्री पुत्रवती होईल. वीस हजार पाठ केले असता अपमृत्युवर
विजय मिळेल. तीस हजार पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होईल. एक हजार ते दहा हजार
आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्ये सिद्ध होतील. याच्या एक लाख आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध
होईलच, यात मुळीच शंका नाही. (३९-४१)
(शत्रुनाशाच्या हेतूने) विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून एक महिनापर्यंत पाठ केला असता शत्रू दुर्बल होतात. (४२)
उत्कर्षाची इच्छा करणार्‍याने औंदुबराखाली, वैभवाची इच्छा करणार्‍याने बेलाच्या झाडाखाली,
शान्तीसाठी चिंचेखाली, ओजाची कामना करणार्‍याने पिंपळाखाली, विवाहेच्छूंनी आंब्याखाली,
ज्ञानाची इच्छा असणार्‍यांनी तुळशीखाली, अपत्याची इच्छा असणार्‍यांनी मंदिराच्या गर्भागारात,
द्र्व्याची इच्छा असणार्‍यांनी पवित्र ठिकाणी, जनावरांची इच्छा असणार्‍यांनी गोठ्यात आणि
कोणतीही इच्छा असणार्‍यांनी देवालयात जप करावा. त्यायोगाने तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात. (४३-४५)
नाभीइतक्या पाण्यात उभा राहून जो सूर्याकडे पाहून याचा एक हजार जप करील, त्याचा युद्धात
किंवा शास्त्रांच्या वादात जय होईल. गळ्याइतक्या पाण्यात उभा राहून जो रात्री हे कवच म्हणेल,
त्याचा ताप, फेपरे, कुष्ठरोग इत्यादी तसेच इतर ताप नाहीसे होतात. (४६-४७)
जेथे जे जे कायमचे (संकट) असेल किंवा जे जे तात्कालिक (संकट) येईल ते ते नाहीसे होण्यासाठी
त्याने तेथे जप करावा. त्यामुळे निश्चित ते (संकट) दूर होईल. (४८)
असे हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्रीशंकरांनी श्रीगौरींना सांगितले.
जो याचे पठन करील, तो श्रीदत्तात्रेयांच्यासारखा होईल. (४९)
पूर्वी जे श्रीदत्तात्रेयांनी दलादमुनील सांगितले होते, तेच श्रीशिवांनी श्रीपार्वतींना सांगितले.
जो कोणी या वज्रकवचाचे पठण करील, तो या जगात दीर्घायुषी योगिश्रेष्ठ होऊन
श्रीदत्तात्रेयांप्रमाणे आचरण करील. (५०)
याप्रमाणे श्रीरुद्रयामल तंत्रातील मंत्रशास्त्ररूप हिमवत्खण्डातील श्रीउमामहेश्वरसंवादरूप श्रीदत्तात्रेयवज्रकवच संपूर्ण झाले.

N/A
Last Updated : 2008-02-10T14:07:30.0630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

SUNDARIKĀ(सुन्दरिका)

RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.