देवी कवच - ऋग्वेदोक्तं देवीसूक्तम्

देवी कवच - ऋग्वेदोक्तं देवीसूक्तम्


 ऋग्वेदोक्तं देवीसूक्तम्
ॐ अहमित्यष्टर्चस्य सूक्तस्य वागाम्भृणी ऋषिः , सच्चित्सौखात्मकः सर्वगतः परमात्मा देवता , द्वितीयाया ॠचो जगती , शिष्टानां त्रिष्टुप् छन्दः , देवीमाहात्म्यपाठे विनियोगः ।
 ध्यानम्
ॐ सिंहस्था शशिशेखरा मरकतप्रख्यैश्र्चतुर्भिर्भुजैः
शङ्खं चक्रध्नुःशरांश्र्च दधती नेत्रैस्त्रिभिः शोभिता ।
आमुक्ताङ्गदहारकङकणरणत्काञ्चीरणन्नूपुरा
दुर्गा दुर्गतिहारिणी भवतु नो रत्नोल्लसत्कुण्डला ॥
 देवीसूक्तम्
ॐ अहं रुद्रेभिर्वसुभिश्र्चराम्यहमादित्यैरुत विश्र्वदेवैः ।
अहं मित्रावरुणोभा बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्र्विनोभा ॥ १ ॥
अहं सोममाहनसं बिभर्म्यहं त्वष्टारमुत पूषणं भगम् ।
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ॥ २ ॥
अहं राष्ट्री संगमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् ।
तां मा देवा व्यदधुः पुरुत्रा भूरिस्थात्रां भूर्य्यावेशयन्तीम् ॥ ३ ॥
मया सो अन्नमत्ति यो विपश्यति यः प्राणिति य ईं शृणोत्युक्तम् ।
अमन्तवो मां त उप क्षियन्ति श्रुधि श्रुत श्रद्धिवं ते वदामि ॥ ४ ॥
अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभिरुत मानुषेभिः ।
यं कामये तं तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधाम् ॥ ५ ॥
अहं रुद्राय धनुरा तनोमि ब्रह्मद्विषे श्रवे हन्तवा उ ।
अहं जनाय समदं कृणोम्यहं द्यावापृथिवी आ विवेश ॥ ६ ॥
अहं सुवे पितरमस्य मूर्ध्न्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे ।
ततो वि तिष्ठे भुवनानु विश्र्वो-तामूं द्यां वर्ष्मणोप स्पृशामि ॥ ७ ॥
अहमेव वात इव प्रवाम्यारभमाणा भुवनानि विश्र्वा ।
प्रो दिवा पर एना पृथिव्यैतावती महिना संबभूव ॥ ८ ॥


सिंहावर आरूढ झालेली किरीटावर चंद्रकोर, मरकतमण्यासारखी तेजस्वी रंगकांती,हातात शंख,चक्र, धनुष्यबाण घेतलेली, तिन प्रकाशमान तेजोमय डोळे,कंठ, बाहू, हात यांवर शोभून दिसणारे रत्नजडितअलंकार, हातात सुवर्णकंकणे, पायांत झुणझुण नाद करणारे सुवर्ण-पैंजण, कानी कुंडले, अशी सजलेलीदुर्गा आमच्या आपदा विपत्ती दूर करो.मी सच्चिदानंदमयी, सर्वात्मा देवी, रुद्र,वसू,अदित्य तथा विश्र्वदेव गणांत समाविष्ट आहे. मी सूर्य व वरूण, इंद्र,अग्नी आणि आश्‍विनी कुमार या प्रेरणाश्क्तींत समाविष्ट असून त्यांच्या प्रेरणांचे मूळ मीच आहे. ॥१॥
मी शत्रूनाशक सोम, त्वष्टा प्रजापती, तसेच, पूषा आणि भग यांना सदैव धारण करते. यज्ञात देवांना जेउतम हविर्भोग मिळतात, ते खाल्ल्यानंतर त्यांचे सोमाने पचनहोते, तृप्ती होते, यज्ञाच्या यजमानालायज्ञफलही मीच मिळवून देतो. ॥२॥
मी संपूर्ण विश्‍वाची धात्री असल्याने यज्ञात वा ध्यानात असलेल्या उपासकांना (यजमानांनाही) यज्ञफलदेते. साक्षात्कारी साधकांना परब्रह्म-स्वरुपात असलेल्या शक्तींची मी पूजनीय देवता आहे. सर्व चित्शक्तीमाझ्यातच समवीष्ट आहेत. ॥३॥
या विश्‍वातील प्रत्येक प्राणी माझ्या प्रेरणेमुळे अन्नग्रहण करतो. जो डोळ्यांनी पाहतो, श्‍वास घेतो, ऐकतो,चालतो,त्यात माझ्याच प्रेरक शक्तींची योजना आहे. जे लोकमला या प्रेरकरुपांनी ओळखतनाहीत, माझी प्रेरणा, माझा प्रभाव मानत नाहीत त्यांना सद्‌गती मिळत नाही.हे विबुधांनो (ज्ञानी लोकांनो) मी तुम्हाला केवळ श्रद्धेनेच ब्रह्मतत्त्वाचा लाभ कसा करून घ्यावा हे सांगते. ॥४॥
मी स्वतःच, देवता आणि मानव हे ज्या दुर्लभ तत्वांची उपासना करतात त्याविषयी वर्णन करून सांगतो. मी ज्या ज्या भक्तांची संकटे निवारण करते त्यांना स्वतःला प्रथम शक्तिशालि बनवते. त्यांना ज्ञानविचारयोग्यायोग्यता ठरविण्याची शक्ती (सारासारविचार) आणि तर्कसंगत बुद्धी या ज्ञानांनी मी संपन्न करते. ॥५॥
मी सत्त्वशील जनांवर हिंसक हल्ले चढविणार्‍या शक्तींचा, राक्षसी वृत्तीचा नायनाट करण्यासाठी शिवधनुष्यहाती घेये. जे मला शरण आले त्यांच्या रक्षणासाठीच मी अस्त्राचा उपयोग करते.आणि जे भक्त माझीपूजा, ध्यान-धारणा नित्य करतात त्यांच्या अंतःकरणांत पृथ्वी, अंबर (आकाश) मिसळुन राहते. ॥६॥
या विश्‍वाच्या पितासम असलेल्या आकाशाला परमात्मास्वरुपापेक्षाही श्रेष्ठ स्थिती प्राप्त करून देते. सागर-सरिता या जलस्वरुपी शक्तींनी विश्‍वात चैतन्य साठवते. माझा वावर सर्व ठिकाणी असल्यानेमी सर्वव्यापी आहे. विश्‍वात आहे तशी स्वर्गातही दृश्य स्वरुपाने, स्पर्शज्ञानाने स्वर्गलोकातही वावरते. ॥७॥
मी कार्यकारण भावनेने या विश्‍वाची रचना-आरंभ केलेला आहे. मी इतरांचे प्रेरणेशिवाय आपोआपवायुप्रमाणे एका वेळी एका किंवा अनेक ठिकाणी चलू शकते, वाहू शकते, स्वतःच्या इच्छेने मीकार्यमग्न असते, कार्यप्रवण होते. मी पृथ्वी आणि आकाशापेक्षा वेगळी असुन माझ्याच शक्तिप्रेरणेनेमाझ्या सहज प्रवृत्तिमुळे भक्तप्रिय झालेले आहे. ॥८॥

Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP