देवी कवच - रात्रिसूक्तम्

देवी कवच - रात्रिसूक्तम्

अथ तन्त्रोक्तं रत्रिसूक्त्म्
ॐ विश्र्वेश्र्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीम् ।
निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसः प्रभुः ॥ १ ॥
ब्रह्मोवाच
त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वशट्‌कारः स्वरात्मिका ।
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥ २ ॥
अर्ध्मात्रास्थिता नित्याअ यानुच्चार्‍या विशेषतः ।
त्वमेव सन्ध्या सावित्री त्वं देवि जननी परा ॥ ३ ॥
विसृष्टौ सृष्टिरुपा त्वं स्थितिरुपा च पालने ।
तथा संहृतिरुपान्ते जगतोऽस्य जगन्मये ॥ ५ ॥
महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः ।
महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥ ६ ॥
प्रकृतीस्त्वं च सर्वस्य गुणत्रयविभाविनी ।
कालरात्रैर्महारात्रिर्मोहरात्रिश्र्च दारूणा ॥ ७ ॥
त्वं श्रीस्त्वमीश्र्वरि त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा ।
लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिः क्षान्तिरेव च ॥ ८ ॥
खड्‌गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा ।
शङ्खिनी चापिनी बाणभुशुण्डीपरिघायुधा ॥ ९ ॥
सौम्या सौम्यतराशेषसौम्येभ्यस्त्वतिसुन्दरी ।
परापराणां परमा त्वमेव परमेश्र्वरी ॥ १० ॥
यच्च किञ्चि‍त् क्वचिद्वस्तु सदसद्वाखिलात्मिके ।
तस्य सर्वस्य या शक्तिः सा त्वं किं स्तूयसे तदा ॥ ११ ॥
यया त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् ।
सोऽपि निद्रावशं नीतः कस्त्वां स्तोतुमिहेश्र्वरः ॥ १२ ॥
विष्णुः शरीरग्रहणमहमीशान एव च ।
कारितास्ते यतोऽतस्त्वां कः स्तोतुं शक्तिमान् भवेत् ॥ १३ ॥
सा त्वमित्थं प्रभावऐः स्वैरुदारैर्देवि संस्तुता ।
मोहयैतौ दुराधर्षावसुरौ मधुकैटभौ ॥ १४ ॥
प्रबोधं च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु ।
बोधश्र्च क्रियतामस्य मन्तुमेतौ महासुरौ ॥ १५ ॥

तेजस्वि व्यक्तींचे स्वामी ब्रह्मदेव, विश्र्वाचे नियमन करणार्‍या, जगाचि उत्पत्ती, स्थिति व लय करणार्‍या विष्णूलाही मोहित करणर्‍या, षड्‌गुणैश्र्वर्यसंपन्न, अनुपमेय अशा योगनिद्रेची स्तुती करु लागले. ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले,तू स्वाहा, वषट्‌कार आहेस (म्हणजेच सर्व यज्ञमन्त्ररूप आहेस.) तसेच स्वर्गात्मक (म्हणजे यज्ञफलरूप) आहेस. (किंवा स्वररुप आहेस.) तू अमृत आहेस. शिवाय ॐकाररुप अविनाशि अक्षरातिल तीन (अ-उ-म ) मात्रास्वरुपी आहेस. ॥ २ ॥
त्या ओंकारातील बिन्दुरुप असणारी, नित्य आणि जिचा विशेषरुपाने उच्चार करता येत नाही, ती अर्धमात्राही तूच आहेस. (म्हणजे तू ओंकारस्वरुपि आहेस.) त्रिकालसंध्या तू आहेस. तसेच सर्वश्रेष्ठ वेदमाता गायत्री तू आहेस. ॥ ३ ॥
या विश्र्वाचा आधार तू आहेस. तू हे जग उत्पन्न करतेस, त्याचे पालनपोषण करतेस आणि शेवटी त्याचा स्वतःमध्येच लय करतेस. ॥ ४ ॥
हे जगद्रूपिणी माते, या जगाच्या निर्मितीच्या वेळी तू उत्पत्तिरुप असतेस, पालनाच्या वेळी स्थितीरूप असतेस आणि शेवटी विनाशाच्या वेळी संहाररुप तूच असतेस. ॥ ५ ॥
ब्रह्मविद्या तू आहेस. आदमिया तू आहेस. ग्रहण-धारणक्षम बुद्धी तू आहेस. स्मृती तू आहेस. अज्ञान हेही तुझेच आहे. सर्वदेवरुपिणी तू आहेस. तशीच असुररुपिणीही तू आहे. ॥ ६ ॥
तीन गुणांना प्रकट करणारी विश्र्वाचे आदिकरण तू आहेस. नित्य होणारी रात्र तू आहेस. ब्रह्मदेवाची रात्र तू आहेस आणि भयंकर अशी महाप्रलयाची साक्षिणीही तू आहेस. ॥ ७ ॥
तू लक्ष्मी आहेस. तूच विश्र्वाची शासनकरर्त्री आहेस. तू दुसरी विष्णुपत्नी आहेस. ज्ञानस्वरुप बुद्धी तू आहेस. लज्जा तू आहेस. पोषण व तृप्ती तू आहेस. समाधान तू आहेस. क्षमाही तूच आहेस. ॥ ८ ॥
खड्‌ग, शूल, गदा आणि चक्र धारण करणारी, शंख, धनुष्य, बाण, भृशुण्डी आणि परिघ ही आयुधे घेतलेली (त्यामुळे) भयंकर दिसणारी तू आहेस. ॥ ९ ॥
तू शांत आहेस.सुंदरात सुंदर अशा सर्व सुंदरांहून तू अधिक सुंदर आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश या पर आणि इन्द्र इत्यादी अपर देवांना उपासना करण्याजोगी तूच श्रेष्ठ देवता आहेस. ॥ १० ॥
हे सर्वस्वरुपे देवी, जी काहि कारणरुप किंवा कार्यरुप वस्तू ज्या कोठे असेल, त्या सर्व वस्तूंचे जे सामर्थ्य ते तू आहेस. तर मग तुझी स्तुती ती काय करता येणार ? ॥ ११ ॥
ज्या तू जगाची उत्पत्ती, स्थिति आणि लय करणार्‍या भगवान विष्णुलाही निद्राधिन केलेस, त्या तुझी स्तुती करायला कोण समर्थ आहे ? ॥ १२ ॥
केवळ चैतन्यरुप असणार्‍या मी, विष्णू आणि शंकर यांना तू सृष्टिसंचालनासाठी ज्याअर्थी शरीर धारण करायला लावलेस, त्याअर्थी शरीर धारण करायला लावलेस, त्याअर्थी तुजी स्तुती करण्याचे सामर्थ्य कोणात असणार आहे ? ॥ १३ ॥
हे देवी, मी (स्तुती करणे अशक्य असूनही) तुझी स्तुती केली आहे. तर तू स्वतःच्या महान प्रभावाने या अजिंक्य मधुकैटभ दैत्यांना मोहिनी घाल. ॥ १४ ॥
आणि जगाचे स्वामी असणार्‍या श्रीविष्णूंना ताबडतोब जागे कर. तसेच या महान असुरांना मारण्याची त्यांना प्रेरणा दे. ॥ १५ ॥

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP