TransLiteral Foundation

देवी कवच - तन्त्रोक्तं देवीसूक्तम्

देवी कवच - तन्त्रोक्तं देवीसूक्तम्

देवी कवच - तन्त्रोक्तं देवीसूक्तम्
अथ तन्त्रोक्तं देवीसूक्तम्
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताह स्मताम ॥ १ ॥
रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्नायै चेन्दुरुपिण्यै सुखायै सततं नमः ॥ २ ॥
कल्याण्यै प्रणतां वृध्द्यैसिद्ध्यै कूर्म्यै नमो नमः ।
नैॠत्यै भूभृतां लक्ष्म्यै श्र्वाण्यै ते नमो नमः ॥ ३ ॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥ ४ ॥
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥ ५ ॥
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ ६ ॥
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ ७ ॥
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ ८ ॥
या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ ९ ॥
या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ १० ॥
या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः s॥ ११ ॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ १२ ॥
या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ १३ ॥
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ १४ ॥
या देवी सर्वभूतेषु जातिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ १५ ॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ १६ ॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ १७ ॥
या देवी सर्वभूतेषु श्रद्धारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ १८ ॥
या देवी सर्वभूतेषुका कान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ १९ ॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २० ॥
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २१ ॥
या देवी सर्वभूतेषु स्मृतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २२ ॥
या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २३ ॥
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २४ ॥
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २५ ॥
या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्त्स्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २६ ॥
इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चखिलेषु या ।
भूतेषु सततं तस्यै व्याप्त्यै देव्यै नमो नमः ॥ २७ ॥
चितिरुपेण या क्रुत्स्नमेतद्‌व्याप्य स्थिता जगत्
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ २८ ॥
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ।
करोतु सा नः शुभहेतुरिश्र्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः ॥ २९ ॥
या साम्प्रतं चोद्ध्तदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः॥ ३० ॥
॥ इति तन्त्रोक्तं देवीसूक्तं सम्पूर्णम् ॥
Translation - भाषांतर
इन्द्रादि देवशक्तीला, ब्रह्मविष्णुशिव या महान देवांच्या शक्तीला,तसेच मंगलस्वरुप असणार्‍या देवीला नेहमी नमस्कार असो. सुख देणार्‍या मूल प्रकृतीला नमस्कार असो. त्या देवीला आम्ही नेहमी नमस्कार करतो. ॥ १ ॥
उग्र रूप असणार्‍या, अनादी-अनंत, पृथ्वीरुप गौरीला नमस्कार असो.चंद्र व चांदण्याच्या रुपात असणार्‍या
म्हणूनच आह्लाददायक असणार्‍या देवीला नमस्कार असो. ॥ २ ॥
कल्याण करणार्‍या, नम्स्कार करणार्‍यांचा उत्कर्ष करणार्‍या, कर्मफलरुप असणार्‍या, कूर्मरुप धारण
करणार्‍या देवीला नमस्कार असो. अलक्ष्मीस्वरुप, तसेच राजांच्या संपत्तीच्या रुपात असणार्‍या तुला
शिवपत्नीला नमस्कार असो. ॥ ३ ॥
जाणण्यास कठीण असणार्‍या, जिचा पार कळणे कठीण अशा, सर्श्रेष्ठ, जगाची उत्पत्ति-स्थिति-संहार
करणार्‍या, प्रसिद्ध असणार्‍या, कृष्णवर्ण आणि धूम्रवर्ण असणार्‍या देवीला नेहमी नमस्कार असो. ॥ ४ ॥
भक्तांना अतिशय शांत व शत्रूंना अतिशय उग्ररुप असणार्‍या त्या देवीला नम्रपणे आम्ही नमस्कार करतो.
जगाचा आधार असणार्‍या क्रियारुप देवीला नमस्कार करतो. ॥ ५ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी विष्णुमाया म्हणून ओळखली जाते, तिला नमस्कार. ॥ ६ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी चैतन्यरुपान राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ ७ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी बुद्धिरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ ८ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी निद्रारुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ ९ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी भुकेच्या रुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १० ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सावलीच्या रुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ ११ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी शक्तिरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १२ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी तहानरुपाने व लोभरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १३ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी क्षमारुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १४ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जातरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १५ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी लज्जारुपाने राहिली आहे,तिला नमस्कार ॥ १६ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी शान्तिरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १७ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी श्रद्धारुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १८ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी कान्तिरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ १९ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी लक्ष्मीरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २० ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वृत्तीरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २१ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी स्मृतिरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २२ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी दयारुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २३ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी प्रीतिरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २४ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी मातृरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २५ ॥
जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी भ्रमरुपाने राहिली आहे,तिला नमस्कार. ॥ २६ ॥
अकरा इन्द्रियांची व पंचमहाभूतांची अधिष्ठात्री असणारी जी सर्व प्राण्यांत नेहमी व्यापून राहिलेली
असते, त्या देवीला नमस्कार असो. ॥ २७ ॥
जी ज्ञानरुपाने हे जग व्यापून राहिली आहे, त्या देवीला नमस्कार असो. ॥ २८ ॥
पूर्वी इच्छित गोष्ट प्राप्त झाल्यामुळे देवांनी आणि इन्द्राने जिची स्तुती केली, तसेच जिची नेहमी
सेवा केली ,ती कल्याण करणारी देवी आम्हांला कल्याण व सुख देवो आणि आमची संकटे दुर करो. ॥ २९ ॥
सध्या दैत्यांनि पीडा दिलेल्या आम्ही देवांनी आणि इंद्राने जिची पूजा केली आहे, तसेच भक्तिभावाने
आम्ही स्मरण करताच जी तत्काळ आमच्या आपदा नाहीशी करते, ती भगवती आमचे कल्याण करो. ॥ ३० ॥

N/A
Last Updated : 2008-02-10T14:10:39.9370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पिंपरणी or पिंपरी

 • pimparaṇī or pimparī f A tree, Hibiscus populneoides. 
RANDOM WORD

Did you know?

विविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,108
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 326,018
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.