TransLiteral Foundation

देवी कवच - देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

देवी कवच - देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

देवी कवच - देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

अथ देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्
न मन्त्रं नो यन्त्रं तदापि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदापि च न जाने स्तुतिकथाः ।
न जाने मुद्रास्ते तदापि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ॥ १ ॥
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाश्क्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् ।
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ २ ॥
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः ।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति ॥ ३॥
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया ।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ ४ ॥
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
 मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि ।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ॥ ५ ॥
श्र्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः ।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनःको जानीते जनानि जपनीयं जपविधौ ॥ ६ ॥
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः ।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥ ७ ॥
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः ।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ॥ ८ ॥
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः ।
श्यामे त्वव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ॥ ९ ॥
आपस्तु मग्नः स्मराणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि ।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ॥ १० ॥
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि ।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम् ॥ ११ ॥
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥ १२ ॥
//इति श्रीशंकराचार्यविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णम् //
Translation - भाषांतर

हे माते, तुझे मंत्र, यंत्र,स्तुती,आवाहन,ध्यान, स्तुतिपर कथा, मुद्रा, तसेच तुझी प्राप्ती होत नाही म्हणून विलाप-यांतले मला काहीच माहीत नाही. पण तुला भजल्याने कष्ट नाहीसे होतात,एवढेच माहीत आहे. ॥ १ ॥
सर्वांचा उद्धार करणार्‍या हे कल्याणमयी माते, पूजाविधी माहीत नसल्यामुळे, पुरेसे द्रव्य नसल्यामुळे, आळसामुळे किंवा पुजाविधी शास्त्रशुद्ध रितीने करता येणे शक्य नसल्यामुळे तुझी चरणसेवा मी करु शकलो नाही,त्याची मला क्षमा कर. कारण कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण माता वाईट नसते. ॥ २ ॥
हे माते, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ सरळ मनाचे पुत्र आहेत. पण त्यांच्यामध्ये मीच तेवढा एकटा आगळा चंचल स्वभावाचा मुलगा आहे. हे कल्याणी, (तरीही) माझा त्याग करणे तुला शोभणार नाही. कारण मुलगा वाईट असला तरी आई वाईट असत नाही. ॥ ३ ॥
हे जगदम्बे माते, मी तुझी चरणसेवा केली नाही. किंवा हे देवी, तुला उद्देशून मी पुष्कळसे द्रव्यदानही केले नाही. तरीदेखील तू माझ्यावर अजोड प्रेम करतेस. कारण मुलगा वाईट असू शकतो. आई कधीच वाईट नसते. ॥ ४ ॥
हे गणेशमाते, मी अनेक देवांच्या निरनिराळ्या सेवा करण्यात व्यग्र होऊन (ते प्रसन्न न झाल्याने त्यांना) सोडून दिले. (असे करता करता) वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटून गेली. हे माते, आताही जर तुझी कृपा झाली नाही, तर निराधार असा मी कोणाला बरे शरण जाऊ ? ॥ ५ ॥
हे अपर्णामाते, तुझ्या मंत्राची अक्षरे कानी पडताच निरक्षरसुद्धा अतिशय मधूर वाणीचा वक्ता होतो. तसेच निर्धनसुद्धा कोट्याधीश होऊन निर्भयपणे वावरतो. (कानावर मंत्राक्षरे पडण्याचे जर एवढे फल तर) हे माते, त्या मंत्राचा जप करण्याचे फल केवढे असेल, हे कोणता मनुष्य जाणू शकेल बरे ! ॥ ६ ॥
शंकरांनी अंगाला चिताभस्म माखले आहे. विष हे अन्न केले आहे. दिशारुप वस्त्र परिधान केले आहे. जटा धारण केल्या आहेत. गळ्यात नागराजरुपी हार घातला आहे. पशूंचे आणि भुतांचे ते स्वामी. त्यांनी हातात खापर घेतले आहे. (व्यवहारात ही दरिद्र्याची लक्षणे आहेत. तरीही) ते जगदीश्र्वर महादेव मानले जातात.हे भवानी माते, हे तुझ्याशी विवाह होण्याचे फळ आहे. ॥ ७ ॥
हे चन्द्रमुखी माते, मला मोक्षाची इच्छा नाही. तशी प्रपंचातल्या वैभवाचीही इच्छा नाही. विज्ञान जाणुन घेण्याची इच्छा नाही किंवा सुखाचीही इच्छा नाही. तर माझी तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की, माझा (सारा) जन्म मृडानी, रुद्राणी, शिव, शिव, भवानी असा अजप करण्यातच व्यतित होवो. ॥ ८ ॥
हे श्यामवर्णे, निरनिराळ्या उपचारांनी मी तुझी विधिपूर्वक पुजा केली नाही. उलट कठोर विचारांनी भरलेल्या शब्दांनी (इतरांना दुखवण्यासारखे) कोणते दुष्कृत्य केले नाही?(असे असूनही) हे माते,निराधार अशा माझ्यावर जर तू थोडीशी जरी कृपा करीत असशील, तर ते तुला म्हणूनच शोभण्यासारखे आहे. (कारण तू माझी आई आहेस.) ॥ ९ ॥
हे दयासागरांच्या महेश्र्वरी दुर्गे, संकटात बुडाल्यामुळे मी तुझे स्मरण करतो, हा माझा धूर्तपणा आहे, असे मानू नकोस.कारण तहान-भूकेने व्याकूळ झाल्यावरच (मुलांना) आईची आठवण येते. ॥ १० ॥
हे जगदम्बे, तुझी माझ्यावर परीपूर्ण कृपा आहे,यात आश्र्चर्य ते काय? मुलाने कितीही अपराध केले तरी आई काही मुलाचा त्याग करीत नाही ! ॥ ११ ॥
हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि पापे नाहीशी करणारी तुझ्यासारखी कोणी नाही. हे ध्यानात घेऊन जे योग्य वाटेल, ते कर. ॥ १२ ॥

N/A
Last Updated : 2008-02-10T14:10:56.9930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

water resources development centre

 • जलसंपत्ति विकास केंद्र 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.