देवी कवच - ॐ अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्...

देवी कवच

ॐ अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्मा ॠषिः,अनुष्टुप् छन्दः ,
चामुन्डा देवता, अङ्गन्यासोक्तमातरो बीजम्, दिग्बन्धदेवतास्तत्त्वम्,
श्रीजगदम्बाप्रातीर्थे सप्तश्तीपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ।
ॐ नमश्र्चण्डिकायै ॥
मार्कण्डेय उवाच ।
ॐ यद्‌गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम् ।
यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ॥ १ ॥
ब्रम्होवाच ।
अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम् ।
देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृनुष्व महामुने ॥ २ ॥
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी  ।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्  ॥ ३ ॥
पञ्चमं  स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च ।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ॥ ४ ॥
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि  नामानि ब्रह्मणैव महात्मना ॥ ५ ॥
अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे ।
विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः ॥ ६ ॥
न तेषां जायते  किंचिदशुभं रणसंकटे ।
नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि ॥ ७ ॥
यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते ।
ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तन्न संशयः ॥ ८ ॥
प्रेतसंस्था तु चामुन्डा वाराही महिषासना ।
ऐन्द्री  गजासमारुढा वैष्णवी  गरुडासना ॥ ९ ॥
माहेश्वरी वृषारुढा कौमारी शिखिवाहना ।
लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता  हरिप्रिया ॥ १० ॥
श्र्वेतरुपधरा देवी  ईश्र्वरी वृषवाहना ।
ब्राह्मी हंससमारुढा सर्वाभरणभूषिता ॥ ११ ॥
इत्येता  मतरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः ।
नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः ॥ १२ ॥
दृश्यन्ते  रथमारुढा देव्यः  क्रोधसमाकुलाः ।
शङ्खं चक्रं गदां  शक्तिं हलं च मुसलायुधम् ॥ १३ ॥
खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च ।
कुन्तायुधं त्रिशूलं च शार्ङ्गमायुधमुत्तमम् ॥ १४ ॥
दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च ।
धरयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय  वै ॥ १५ ॥
नमस्तेऽस्तु  महारौद्रे महाघोरपराक्रमे ।
महाबले महोत्साहे महाभ्यविनाशिनि ॥ १६ ॥
त्राहि  मां देवि  दुष्प्रेक्ष्ये  शत्रूणां  भयवर्धिनि ।
प्राच्यां रक्षतु मामैन्द्री  आग्नेय्यामग्निदेवता ॥ १७ ॥
दक्षिणेऽवतु  वाराही  नैॠत्यां  खद्‌गधारिणी ।
प्रतीच्यां वारुणी रक्षेद् वायाव्यां मृगावाहिनी ॥ १८ ॥
उदीच्यां पातु कौबेरी ऐशान्यां  शूलधारिणी ।
ऊर्ध्वं  ब्रह्माणी मे रक्षेदधस्ताद् वैष्णवी तथा ॥ १९ ॥
एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना ।
जया मे चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः ॥ २० ॥
अजिता वामपार्श्वे तु द्क्षिणे  चापराजिता ।
शिखामुद्‌द्योतिनि रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता ॥ २१ ॥
मालाधरी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी ।
त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये  यमघण्टा च नासिके ॥ २२ ॥
शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी ।
कपौलौ  कालिका रक्षेत्कर्णमूले  तु शांकरी ॥ २३ ॥
नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका ।
अधरे चामृतकला  जिह्वायां च सरस्वती ॥ २४ ॥
दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका ।
घण्टिकां चित्रघण्टा च महामाया  च तालुके  ॥ २५ ॥
कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं  मे सर्वमङ्गला ।
ग्रीवायां  भद्रकाली  च पृष्ठवंशे धनुर्धरी ॥ २६ ॥
नीलग्रीवा बहिःकण्ठे  नलिकां नलकूबरी ।
स्कन्धयो: खङ्‍गिनी  रक्षेद्  बाहू मे वज्रधारिणी ॥ २७ ॥
हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चाङ्गुलीषु च ।
नखाञ्छूलेश्र्वरी रक्षेत्कक्षौ रक्षेत्कुलेश्र्वरी ॥ २८ ॥
स्तनौ रक्षेन्महादेवी  मनः शोकविनाशिनी ।
हृदये ललिता देवी उदरे  शूलधारिणी ॥ २९ ॥
नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं  गुह्येश्र्वरी तथा ।
पूतना कामिका मेढ्रं गुदे महिषवाहिनी  ॥ ३० ॥
कट्यां भगवती  रक्षेज्जानुनी  विन्ध्यवासिनी ।
जङेघ  महाबला रक्षेत्सर्वकामप्रदायिनी  ॥ ३१ ॥
गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्टे तु तैजसी ।
पादाङ्गुलीषु श्री रक्षेत्पादाधस्तलवासिनी ॥ ३२ ॥
नखान् दंष्ट्राकराली च केशांश्र्चैवोर्ध्वकेशिनी ।
रोमकूपेषु  कौबेरी त्वचं वागीश्र्वरी  तथा ॥ ३३ ॥
रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती ।
अन्त्राणि  कालरात्रिश्र्च पित्तं  च मुकुटेश्र्वरी ॥ ३४ ॥
पद्मावती  पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा ।
ज्वालामुखी नखज्वालामभेद्या सर्वसंधिषु ॥ ३५ ॥
शुक्रं ब्रम्हाणी  मे  रक्षेच्छायां छत्रेश्र्वरी  तथा ।
अहंकारं मनो बुध्दिं रक्षेन्मे धर्मधारिणी ॥ ३६ ॥
प्रणापानौ तथा व्याअनमुदानं  च समानकम् ।
वज्रहस्ता च मे  रक्षेत्प्राणं कल्याणशोभना ॥ ३७ ॥
रसे  रुपे च गन्धे च  शब्दे स्पर्शे च योगिनी ।
सत्त्वं रजस्तमश्र्चैव रक्षेन्नारायणी सदा ॥ ३८ ॥
आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु  वैष्णवी ।
यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी ॥ ३९ ॥
गोत्रामिन्द्राणी  मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके ।
पुत्रान् रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी ॥ ४० ॥ 
पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा ।
राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता ॥ ४१ ॥
रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं  कवचेन तु ।
तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती  पापनाशिनी ॥ ४२ ॥
पदमेकं न गच्छेत्तु यदीच्छेच्छुभमात्मनः ।
कवचेनावृतो नित्यं यत्र  यत्रैव गच्छति ॥ ४३ ॥
तत्र तत्रार्थलाभश्र्च विजयः  सार्वकामिकः ।
यं यं चिन्तयते कामं तं  तं प्राप्नोति निश्र्चितम् ।
परमैश्र्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान् ॥ ४४ ॥
निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः ।
त्रैलोक्ये तु  भवेत्पूज्यः कवचेनावृतः पुमान् ॥ ४५ ॥
इदं तु देव्याः  कवचं  देवानामपि  दुर्लभम्  ।
यं  पठेत्प्रायतो  नित्यं त्रिसन्ध्यम श्रद्धयान्वितः ॥ ४६ ॥
दैवी कला  भवेत्तस्य  त्रैलोक्येष्वप्राजितः ।
जीवेद् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः । ४७ ॥
नश्यन्ति व्याधयः सर्वे  लूताविस्फ़ोटकादयः ।
स्थावरं जङ्गमं  चैव  कृत्रिमं  चापि यद्विषम् ॥ ४८ ॥
अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भुतले ।
भूचराः खेचराश्र्चेव जलजाश्र्चोपदेशिकाः ॥ ४९ ॥
सहजाः  कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा ।
अन्तरिक्षचरा  घोरा डाकिन्यश्र्च महाबलाः ॥ ५० ॥
ग्रहभूतपिशाचाश्च्च  यक्षगन्धर्वराक्षसाः ।
ब्रम्हराक्षसवेतालाः कूष्माण्डा भैरवादयः  ॥ ५१ ॥
नश्यति  दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते ।
मानोन्नतिर्भवेद् राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम् ॥ ५२ ॥
यशसा  वर्धते  सोऽपि  कीर्तिमण्डितभूतले ।
जपेत्सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं  पुरा ॥ ५३ ॥
यावभ्दूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत्तिष्ठति मेदिन्यां  संततिः पुत्रापौत्रिकी ॥ ५४ ॥
देहान्ते  परमं स्थानं यत्सुरैरपि  दुर्लभम् ।
प्राप्नोति  पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः ॥ ५५ ॥
लभते परम्म  रुपं शिवेन सह मोदते ॥ ५६ ॥
॥ इति देव्याः कवचं सम्पूर्णम् ॥

मार्कण्डॆय म्हणाले, हे पितामह ब्रह्मदेव, जगात जी अत्य़ंत गुप्त आहे, जी आजपर्यंत कोणालाही सांगितलेली नाही, आणि जी माणसांचे सर्व प्रकारे सर्वांपासुन रक्षण करणारी आहे, ती गोष्ट मला सांगा. ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले, हे विप्रा, सर्वांवर रक्षणाच्या द्वारा उपकार करणारी अत्यंत गुप्त गोष्ट आहे. ती म्हणजे देवीचे पुण्यकारक कवच. हे महामुने,ते ऐक. ॥ २ ॥
(कवचाच्या देवतांची नावे अशीः) पहिले शैलपुत्री (हिमालयाची कन्या ), दुसरे ब्रह्मचारिणि (तप करणारी), तिसरे चंद्रघंटा (आह्लाद देणारि), चवथे कूष्माण्डा (कोहाळा प्रिय असणारी किंवा मायारुपी) ॥ ३ ॥
पाचवे स्कन्दमाता (कार्तिकस्वामींची आई), सहावे कात्यायनी ('कत' नावाच्या ऋषी मुलगी), सातवे कालयात्री ('मृत्यूलाही भय उत्पन्न करणारी) आठवे महागौरी (अतिशय गौरवर्ण असलेली). ॥ ४ ॥
नववे सिद्धिदात्री (कर्मफळ किंवा अष्टसिद्धि देणारी),अशा या नव दुर्गा सांगितलेल्या आहेत. पूज्य अशा वेदानेच ही नावे सांगितलेल्या आहेत. पूज्य अशा वेदानेच ही नावे सांगितली आहेत. ॥ ५ ॥
आगीत होरपळणारा, रणांगणावर श्त्रूच्या वेढ्यात सापडलेला, संकटात सापडलेला, दुर्गम ठिकाणी असलेला, कोणत्याहि भयाने त्रस्त झालेला असे हे सर्व (जर) देवीला शरण गेले. ॥ ६ ॥
(तर) त्यांचे युद्धस्वरुप संकटात (किंवा वर सांगितलेल्या कोणत्याही प्रसंगात) जराही अकल्याण होत नाही. त्यांच्यावर आपत्ती येईल, त्यांना शोक, दुःख वा त्यांचे भय उत्पन्न होईल, असे मला वाटत नाही. ॥ ७ ॥
ज्यांनी भक्तीने स्मरण केले, त्यांचा उत्कर्ष होतो. हे देवेश्र्वरी, जे तुझे स्मरण करतात, त्यांचे तू रक्षण करतेस, यात संशय नाही. ॥ ८ ॥
( नऊ मातांचि नावे व वाहने अशीः)'प्रेत' नावाच्या विशेष प्राण्यावर बसलेली चण्डमुण्डांना मारणारी चामुंडा, महिषावर बसलेली वराहमुखी वाराही, ऐरावतावर आरुढ झालेली इन्द्रशक्ती ऐन्द्री, गरुडावर बसलेली विष्णुशक्ती वैष्णवी, ॥ ९ ॥
नंदीवर आरुढ झालेली शिवशक्ती माहेश्र्वरी,मोर वाहन असलेली कार्तिकेयशक्ती कौमारी, कमळावर बसलेली, हातात कमळ घेतलेली विष्णुपत्नी देवी लक्ष्मी, ॥ १० ॥
नंदीवर बसलेली,शुभ्र रुप धारण करणारि देवी शिवशक्ती , सर्व अलंकारांनी सुषोभित, हंसावर विराजमान झालेली ब्रह्मशक्ती, ॥ ११ ॥
अशा या सर्व योगांनी युक्त सर्व मातृसंज्ञक देवी होत. त्या निरनिराळ्या अलंकारांनी शोभणाऱ्या असून निरनिराळ्या रत्नांनी सुशोभित आहेत. ॥ १२ ॥
या क्रोधसंतप्त देवी रथावर आरूढ झालेल्या दिसत आहेत. त्यांनी दैत्यांना मारण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी आणि देवांच्या कल्याणासाठी हातात शंख, चक्र, गदा,सैती,नांगर,मुसळ,ढाल,तोमर,कुऱ्हाड, दोर, भाला,त्रिशूल,उत्तम असे शार्ङ्ग धनुष्य अशी शस्त्रे धारण केलेली आहेत. ॥ १३-१५ ॥
भयंकर दिसणाऱ्या, फार मोठा पराक्रम करणाऱ्या, महासामर्थ्यशाली,अत्यंत उत्साही, मोठे भय नाहीसे करणाऱ्या हे देवी, तुला नमस्कार असो. ॥ १६ ॥
जिचे उग्ररुप पाहणे अत्यंत कठीण असल्याने (त्या रुपाने) शत्रूंचे भय वाढविणाऱ्या हे देवी, माझे रक्षण कर. इन्द्रशक्ती पूर्वेला आणि अग्निशक्ती आग्नेयेला माझे रक्षण करो. ॥ १७ ॥
दक्षिणेला वाराही (म्ह.यमशक्ती) आणि नैऋत्येला खड्‌ग धारण करणारी नैऋतशक्ती माझे रक्षण करो. पश्चिमेला वरुणशक्ती आणि वायव्येला हरिणावर बसलेली वायुशक्ती माझे रक्षण करो. ॥ १८ ॥
उत्तरेला कुबेरशक्ती तर ईशान्येला शूल धारण करणारी ईश्वरशक्ती माझे रक्षण करो.ऊर्ध्व दिशेला ब्रह्मशक्ती आणि खालील दिशेला विष्णुशक्ती माझे रक्षण करो. ॥ १९ ॥
अशा रीतीने शववाहना चामुंडा दहाही दिशांना माझ्व रक्षण करो. जया माझे समोरुन आणि विजया मागून रक्षण करो. ॥ २० ॥
अजिता डाव्या बाजूला आणि अपराजिता उजव्या बाजूला रक्षण करो. उद्योतिनी शिखेचे(केसांचे) रक्षण करो. तसेच माझ्या मस्तकावर राहून उमा माझ्या मस्तकाचे रक्षण करो. ॥ २१ ॥
मालाधारी कपाळावर राहून कपाळाचे रक्षण करो आणि यशस्विनी भुवयांचे रक्षण करो. त्रिनेत्रा भुवयांच्या मध्यभागाचे आणि यमघण्टा नाकपुड्यांचे रक्षण करो. ॥ २२ ॥
शंखिनी डोळ्यांच्या मध्यभागी राहून डोळ्यांचे, द्वारवासिनी दोन कानांचे कालिका गालांचे आणि शांकरी कानांच्या मुळांचे रक्षण करो. ॥ २३ ॥
सुगंधा नाकाचे, चर्चिका वरच्या ओठाचे, अमृतकला खालच्या ओठाचे आनि सरस्वती जिभेवर राहून जिभेचे रक्षण करो. ॥ २४ ॥
कौमारी दातांचे, चंडिका गळ्याचे, चित्रघण्टा गळघाटिचे आणि महामाया टाळूचे रक्षण करो॥ २५ ॥
कामाक्षी हनुवटीचे, सर्वमंगला माझ्या वाणीचे, भद्रकाली मानेचे आणि धनुर्धारिणी मणक्य़ांचे रक्षण करो. ॥ २६ ॥
नीलग्रीवा गळ्याच्या बाहेरील भागाचे, नलकूबरी अन्नन्लिकेचे खड्गिनी खांद्यांचे आणि वज्रधारिणी माझ्या बाहूंचे रक्षण करो. ॥ २७ ॥
दण्डिनी हातांचे, अंबिका बोटांचे, शूलेश्र्वरी नखांचे आणि कुलेश्र्वरी काखांचे रक्षण करो. ॥ २८ ॥
महादेवी स्तनांचे, शोकविनाशिनी मनाचे, ललिता देवी हृदयाचे आणि शूलधारिणी पोटाचे रक्षण करो. ॥ २९ ॥
कामिनी नाभीचे, गुह्येश्र्वरी गुप्तभागाचे, पूतना कामिक जननेंद्रियाचे आणि महिषवाहिनी गुदाचे रक्षण करो. ॥३०॥
भगवती कमरेचे, विन्ध्यवासिनी गुडघ्यांचे आणि सर्व कामना पूर्ण करणारी महाबला मांड्यांचे रक्षण करो. ॥३१॥
नारासिंही घोट्यांचे, तैजसी पायांच्या वरच्या भागाचे, श्री पायांच्या बोटांचे आणि पातालवासिनीतळव्यांचे रक्षण करो. ॥३२॥
दंष्ट्रकारली नखांचे, ऊर्ध्वकेशिनी केसांचे, कौबेरी रोमछिद्रांचे तसेच वागीश्र्वरी त्वचेचेरक्षण करो. ॥३३॥
पार्वती रक्त, मज्जातंतू, चरबी,मांस, हाडे आणि मेद यांचे रक्षण करो. कालरात्री आतड्यांचे आणिमुकुटेश्र्वरी पित्ताचे रक्षण करो. ॥३४॥
पद्मावती वाताचे, चूडामणी कफाचे, ज्वालामुखी नखांच्या तेजाचे आणि अभेद्या सर्व सांध्यांचेरक्षण करो. ॥३५॥
ब्रह्माणी माझ्या वीर्याचे, छत्रेश्र्वरी शरिरकान्तीचे आणि धर्मधारिणी माझ्या अहंकार, मन वबुद्धीच्र रक्षण करो. ॥३६॥
वज्रहस्ता माझे प्राण, अपान,व्यान,उदान व समान यांचे आणि कल्याणशोभना प्राणाचे रक्षणकरो. ॥३७॥
रस, रुप, वास, शब्द आणि स्पर्श यांचे योगिनी रक्षण करो. तसेच सत्व, रज आणि तमया गुणांचे नेहमी नारायणी रक्षण करो. ॥३८॥
वाराही शंभर वर्षात्मक आयुष्याचे रक्षण करो. वैष्णवी धर्माचे रक्षण करो. तसेच चक्रधारिणीयश, कीर्ती, संपत्ती, वैभव आणि विद्या यांचे रक्षण करो. ॥३९॥
इंद्राणी माझ्या कुळाचे रक्षण करो. हे चण्डिके (तू) माझ्या पशूंचे रक्षण कर. महालक्षमी मुलांचेरक्षण करो. आणि भैरवी पत्नीचे रक्षण करो. ॥४०॥
(कल्याणकारक मार्ग असणारी) सुपथा माझ्या मार्गाचे रक्षण करो. तसेच कल्याण करणारी देवी माझ्यावाटेचे रक्षण करो. राजद्वारात महालक्ष्मी रक्षण करो. आणि इतस्ततः सर्वत्र राहून विजया रक्षण करो. ॥४१॥
ज्या स्थानाच्या रक्षणाचा उल्लेख राहिला असेल, ज्याच्या रक्षणाचा कवचात मंत्र नसेल, त्या त्यासर्वाचे पाप नाहीसे करणारी जयन्ती देवी रक्षण करो. ॥४२॥
जर आपल्या कल्याणाची इच्छा असेल, तर माणसाने (कवचाशिवाय) एक पाऊलही टाकू नये. हे कवचनित्य धारण करून मनुष्य जेथे जेथे जाईल, तेथे तेथे अर्थप्राप्ती आणि सर्व कामनांच्या बाबतीत विजयमिळेल. ॥४३॥
(या कवचामुळे) मनुष्य या पृथ्वीवर ज्याची ज्याची इच्छा करील, ते ते खात्रीने मिळवील. शिवाय त्यालाअमाप श्रेष्ठ ऐश्र्वर्य प्राप्त होईल. ॥४४॥
कवचाने वेष्टिलेला मनुष्य निर्भय होतो. युध्दात अजिंक्य होतो. आणि त्रैलोक्यात पूज्य ठरतो. ॥४५॥
देवांनीही दुर्मीळ असे हे देवीकवच जो नेहमी सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा तिन्ही काळी पवित्र होऊनश्रद्धापूर्वक म्हणेल, त्याला दैवी अंश प्राप्त होईल. त्रैलोक्यात अजिंक्य होईल. तसेच त्याला अपमृत्युन येता तो पूर्ण एकशेवीस वर्षांचे आयुष्य प्राप्त करील. ॥४६-४७॥
त्याचे इसब, फोड इ. सर्व रोग नाहीसे होतील. वृक्ष, पाषाण इत्यादींचे, कोणत्याही प्राण्याचे किंवाविरुद्ध गुअणधर्माचे पदार्थ एकत्र होऊन तयार झालेले जे विष असेल त्याचा प्रभाव नाहीसा होतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर आपल्याला त्रास देण्यासाठी जे जे जारण-मारणादी कर्म केलेले असेल, मंत्रतंत्र केले असतील, (त्यांचा परिणाम होत नाही.) पृथ्वीवर फिरणारे, आकाशात वावरणारे आणिपाण्यात राहणारे जे आपल्या नाशासाठी शत्रूने प्रेरित केले असतील, ते सर्व प्राणी किंवा पदार्थ, जन्मतः असणारे दोष, कुलपरंपरेने भोगावे लागणारे दोष, तसेच माला, शाकिनी, डाकिनी, अंतरीक्षातफिरणाऱ्या अतिशय बलवान अशा भयंकर डाकिनी, अनिष्ट ग्रह, भुते, पिशाच्चे, यक्ष, गंधर्व, राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताळ, कूष्मांड, भैरवे इ. सर्व ज्याच्या अंतःकरणात कवच असेल, त्याला पाहताच (भिऊन) नाहीशी होतात. त्याचा मानमरातब वाढतो. हे कवच राजाचे तेज अतिशय वाढणारे आहे. तो (कवच-धारक) राजा दानादी कीर्तीने विभूषित होऊन या पृथ्वीवर शौर्यादींच्या यशानेही श्रेष्ठ ठरतो. प्रथम कवचाचापाठ करुन नंतर सप्तशतीचा पाठ करावा. ॥४८-५३॥
जोवर पर्वत, पाणी, अरण्यासह ही पृथ्वी आहे,तोवर या पृथ्वीवर मुले, नातवंडे यांची परंपरा अखंडराहते. शिवाय मृत्यूनंतर देवांनाही दुर्मिळ असे श्रेष्ठ स्थान महामायेच्या कृपेने प्राप्त होते. आणि दिव्य रुप धारण करून भगवान शिवांच्या सह तो कवचधारक आनंदात राहतो. ॥५४-५६॥

N/A
Last Updated : July 19, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP