देवी कवच - अथार्गलास्तोत्रम्

देवी कवच - अथार्गलास्तोत्रम्

॥ अथार्गलास्तोत्रम् ॥
ॐ अस्य श्रीअर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णुऋषिः , अनुष्टुप् छन्दः
श्रीमहालक्ष्मीर्देवता ,श्रीजगदम्बप्रीतये सप्तशतीपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ।
 ॐ नमश्र्चण्डिकायै ॥
 मार्कन्डेय उवाच /
ॐ जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॥ १ ॥
जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि ।
जय सार्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तु ते ॥ २ ॥
मधुकैटभविद्राविविधातृवरदे नमः ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ३ ॥
महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जाहि ॥ ४ ॥
रक्तबीजवधे देवि चण्डमुण्दविनाशिनि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जाहि ॥ ५ ॥
शुम्भस्यैव निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ६ ॥
वन्दिताङ्‌घ्रियुगे देवि सर्वसौभाग्यदायिनि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ७ ॥
अचिन्त्यरुपचरिते सर्वशत्रुविनाशिनि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ८ ॥
नतेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरतापहे ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ९ ॥
स्तुवद्‌भ्यो भक्तिपूर्वं त्वां चण्डिके व्याधिनाशिनि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १० ॥
चण्डिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तितः ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ११ ॥
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम् ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १२ ॥
विधेहि द्विषतां नाशं विधेहि बलमुच्चकैः ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १३ ॥
विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियम् ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १४ ॥
सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेऽम्बिके ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १५ ॥
विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १६ ॥
प्रचण्डदैत्यदर्पघ्ने चण्डिके प्रणतय मे ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १७ ॥
चतुर्भुजे चतुर्वक्त्रसंस्तुते परमेश्र्वरि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १८ ॥
कृष्णेन संस्तुते देवि शश्र्वभ्दक्त्या सदाम्बिके ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १९ ॥
हिमाचलसुतानाथसंस्तुते परमेश्र्वरि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २० ॥
इन्द्राणीपतिसद्भावपूजिते परमेश्र्वरि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जाहि ॥ २१ ॥
देवि प्रचण्डदोर्दण्डदैत्यदर्पविनाशिनि ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जाहि ॥ २२ ॥
देवि भक्ताजनोद्दामदत्तानन्दोदयेऽम्बिके ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जाहि ॥ २३ ॥
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् ।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोभ्दवाम् ॥ २४ ॥
इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः
स तु सप्तशतीसंख्यावरमाप्नोति सम्पदाम् ॥ २५ ॥

मार्कण्डेय म्हणाले, जयन्ती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री स्वाहा, स्वधा या नावांनी अओळखल्या जाणाऱ्या हे देवी, तुला नमस्कार असो. ॥१॥
हे चामुण्डे देवी, तुझा जयजयकार असो. हे प्राणिमात्रांचे दुःख दुर करणार्‍या देवी, तुझा जयजयकार असो. हे सर्वव्यापिनी देवि, तुझा जयजयकार असो. हे कालरात्री, तुला नमस्कार असो. ॥२॥
हे मधुकैटभ दैत्यांना पळवून लावणाऱ्या, हे ब्रह्मदेवाला वर देणाऱ्या देवि, तुला माझा नमस्कार असो. मला रूप, जय आणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंना ठार कर. ॥३॥
हे महिषासौराचा वध करणार्‍या आणि भक्तांना सुख देणाऱ्या देवी;तुला नमस्कार असो. मला रूप,जय आणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंना ठार कर. ॥४॥
रक्तबीज राक्षसाचा वध करणार्‍या आणि चण्ड, मुंड दैत्यांचा संहार करणार्‍या हे देवी, मला रूप, जयआणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥५॥
शुंभ, निशुंभ आणि धूम्राक्ष यांना ठार करणार्‍या हे माते, मला रूप, जय आणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥६॥
भक्तांनी जिच्या चरणकमलांना वंदन केले आहे अशा, सर्व प्रकारचे उत्तम भाग्य प्रदान करणार्‍याहे देवी, मला रूप, जय आणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥७॥
जिचे रुप व चारित्र्य अतर्क्य आहे, तसेच जी सर्व शत्रूंचा नाश करणारी आहे, अशा हे देवी, मला रूप, जय आणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥८॥
नेहमी भक्तिपूर्वक नमस्कार करणार्‍यांचे पाप दूर करणार्‍या हे चण्डिके, मला रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥९॥
भक्तिपुर्वक तुझी स्तुती करणार्‍यांच्या व्याधी दूर करणार्‍या हे देवी, मला रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा नायनाट कर. ॥१०॥
हे चण्डिके, या जगात जे तुझी भक्तिभावकपुर्वक नेहमी पूजा करतात, त्यांनारूप, जय आणि कीर्तीदे. तसेचत्यांच्या शत्रूंना ठार कर. ॥११॥
मला श्रेष्ठ भाग्य दे, आरोग्य दे आणि श्रेष्ठ सुख दे. रूप, जय आणि कीर्ती दे. तसेचमाझ्या शत्रूंचा नाश कर. ॥१२॥
माझ्या शत्रूंचा नाश कर. मला मोठे सामर्थ्य दे. रूप, जय आणि कीर्ती दे. माझ्या शत्रूंचा संहार कर . ॥१३॥
हे देवी, कल्याण कर. श्रेष्ठ वैभव दे. रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥१४॥
सुरासुरांच्या मस्तकावरीलमुकुटातील रत्ने जिच्या चरणांवर घासली गेली आहेत अशा हे अंबिके, मला रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥१५॥
(तुझी सेवा करणार्‍या) लोकांना तू विद्यावंत, कीर्तिवंत आणि लक्ष्मीवंत कर. तसेच त्यांनारूप,जय आणि कीर्तीदे. आणित्यांच्या शत्रूंचा नाश कर. ॥१६॥
नाना बलशाली भीमकाय राक्षसांचा अहंकार हरण करणार्‍या हे दूर्गे, मला रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥१७॥
चार भुजा असणार्‍या, ब्रह्मदेवाने स्तुति केलेल्या हे परमेश्र्वरी, मला रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा नाश कर.॥१८॥
भगवान श्रीकृष्णांनी नेहेमी भक्तिपूर्वक स्तुती केलेल्या हे अंबिके देवि, मला रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा नाश कर. ॥१९॥
भगवान शंकरांनी स्तुती केलेल्या हे परमेश्र्वरी, रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा नाश कर. ॥२०॥
इंद्राने सभ्दावपूर्वक पूजा केलेल्या हे परमेश्र्वरी, रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा नाशकर. ॥२१॥
प्रचंड बाहुबलाने दैत्यांचा गर्व नाहीसा करणार्‍या हे देवी, रूप, जय आणि कीर्तीदे. माझ्या शत्रूंचा संहार कर. ॥२२॥
भक्तजनांच्या अंतःकरणात विपुल आनंद उत्पन्न करणार्‍या हे अंबिके देवी, मलारूप, जय आणियशदे. तसेचमाझ्या शत्रूंचा नाश कर. ॥२३॥
कठीण संसारसागरातुन तारून नेणारी, कुलीन ,सुंदर व मनाप्रमाणे वागणारी पत्नी मला दे. ॥२४॥
मनुष्याने हे स्तोत्र वाचून सप्तशतीपाठ वाचावा. त्यायोगे त्याला वैभवशाली सातशे वर प्राप्त होतात. ॥२५॥

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP