TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
वेळ नदीच्या पुलावर

लिंबोळ्या - वेळ नदीच्या पुलावर

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


वेळ नदीच्या पुलावर

घटिकाभर मोटर पुलाजवळ थांबली

ती अजून घटिका स्मरणी मम राहिली

किति श्रावणसंध्या उन्हात पिवळ्या खुले !

गगनात पसरले मेघखंड रंगले

क्षितिजावर पडले इंद्रधनूचे कडे

चम्‌चमति तृणावर नीलपाचुचे खडे

सृष्टिचे रुप रमणीय दृष्टिला पडे

आनंद अहो, आनंद भरे चहुकडे !

नुकतीच जिची का बाल्यदशा संपली

चेहरा गोल, हनु जणू उजळ शिंपली !

कुणि थोर मराठा कुळातील कन्यका

ऐटीत पुलावर बसली नीलालका

निर्व्याजपणा मोकळा निसर्गातला

संपूर्ण तिच्या चेहर्‍यावरी बिंबला

ती प्रसन्नवदना लावण्याची कळी

भावंड धाकटे खेळवीत बैसली !

खालती नदीचे जळ वाहे खळखळा

वरि गुंगुनि तारायंत्र साथ दे जळा

सृष्टिचे सानुले भाट-अशी गोजिरी

पाखरे येउनी बसली तारेवरी

मनसोक्त लागली गाऊ ओतुन गळा

मोहरली त्यांची संगीताची कळा

का स्फूर्ति एवढी उचंबळे अंतरी ?

तर कोणाची ही सांगा जादूगिरी ?

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:10:32.4070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर

  • अडाणी लोकांची दुखणें बरे करण्याची रीत. जो जो दुखण्याचा जोर वाढत जाईल तो तो अधिक अधिक कांदा भाकरी खात जावी. या म्‍हणीचा दुसरा पाठ-दुखणें आले जोरावर, पथ्‍य गेले शेरावर. 
RANDOM WORD

Did you know?

Is there any reference in Vedas or puranas for eating non-veg food?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site