मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
कळो वा न कळो तुझे ते गुपित !

लिंबोळ्या - कळो वा न कळो तुझे ते गुपित !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


पाखरे करिती गोड कुजबुज

काय हितगुज चाले त्यांचे !

भ्रमर फुलांशी करितो गुंजन

कोणते कूजन चाले त्याचे

वारा घुमघुमे वनराईमाजी

काय चाले त्याची कानगोष्ट !

लेकराच्या कानी कुजबुजे माय

त्याचा अर्थ काय तीच जाणे

कळो वा न कळो तुझे ते गुपित

सांग तू कानात देवा, माझ्या

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP