मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १५३ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५३ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘तत्र गुरुतल्‍पे शंखः’’ अधः शायी जटाधारी पर्णमूलफलाशनः। एककालं समश्र्नन्वै वर्षे तु द्वादशे गते।
रुक्‍मस्‍तेयी सुरापश्र्च ब्रह्महा गुरुतल्‍पगः। व्रतेनैतेन शुध्यंति महापातकिन स्‍त्‍विम इति गुरुतल्‍पगो गुरुभार्यागामी गुरुः पिता।
‘‘अत एव ‘संवर्तः’’ पितृदारान्समारुह्य मातृवर्ज्य नराधमः।
भगिनीं च निजां गत्‍वा निष्‍कृतिर्न विधीयत इति निष्‍कृति र्व्रतरूपा मरणरूपा त्‍वस्‍त्‍येव।
पितृभार्यां तु विज्ञाय मातृवर्ज्यं नराधमः। जननीं वाप्यविज्ञाय नामृतः शुद्धिमाप्नुयादिति ‘‘षट्‌त्रिंशन्मतात्‌’’ अत्र जननीगमनं महापातकं किंत्‍वतिपातकं मातृगमनं दुहितृगमनं स्‍नुषागमनमित्‍यतिपातकानीति विष्‍णूक्तेः। मातृदुहिताभगिनीस्‍नुषागमनान्यतिपातकानीति भवदेवीये वृद्धहारीतोक्तेश्र्च। एतेन गुरुश्र्चासावंगनेति कर्मधारयेण जननीगमनं महापापमिति भवदेवोक्तिरपास्‍ता

गमन करण्यास अयोग्‍य अशांशी गमन केलें असतां प्रायश्चित्ते.

माता, कन्या, बहीण व सून यांशी गमन केले असतां अतिपातक होते.

‘‘त्‍यांत गुरुतल्‍पाविषयीं शंख’’---जमिनीवर निजणें, जटा धारण करणें, पानें मुळें, व फळें खाणें, एक वेळां भोजन करणें याप्रमाणें बारा वर्षे गेल्‍यानंतर ससोन्याची चोरी करणारा, दारु पिणारा, ब्रह्महत्त्या करणारा व गुरुतल्‍पाशीं गमन करणारा हे महापातकी या व्रतानें शुद्ध होतात. गुरुतल्‍पाशीं गमन करणारा म्‍हणजे आपल्‍या बापाच्या बायकोशी गमन करणारा ‘‘म्‍हणूनच संवर्त’’---जो नराधमन आपल्‍या जननीवाचून बापाच्या इतर स्त्रियेशी व बहिणीशीं गमन करील, त्‍याची निष्‍कृति करण्यांत येणार नाहीं. निष्‍कृति (प्रायश्चित्त) व्रतरूप तर नाहीं, पण मरणरूप आहेच, कारण ‘‘जो नराधम जननीवाचून आपल्‍या बापाच्या स्त्रियेशीं बुद्धिपूर्वक गमन करील व जननीशीं अज्ञानपूर्वक गमन करील तो मनुष्‍य मेला असतां शुद्धीला पावेल’’ असें षट्‌त्रिंशन्मत आहे. येथें जननीशी गमन करणें तें महापातक’ आहे असें नाहीं परंतु (तें) अतिपातक आहे. कारण ‘‘मातेशी गमन करणें, मुलीशीं गमन करणें व सुनेशी गमन करणें ही अतिपातकें होत’’ असें विष्‍णूचें वचन आहे आणि ‘‘माता, मुलगी, बहीण व सून यांशीं गमनें करणें तीं अतिपातकें होत’’ असें भवदेवीयांत वृद्धहारीताचें वचन आहे. यावरून ‘‘गुरु अशी जी अंगना’’ अशा कर्मधारयावरून जननीशीं गमन करणें तें महापाप (होय) असें भवदेवाचें म्‍हणणें व्यर्थ होतें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP