मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ६५ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६५ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

गोगर्भवधे तु.

‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ विशेषउक्तः। पाद उत्‍पन्नमात्रे तु द्वौ पादौ दृढतां गते।
पादोनं व्रतमुद्दिष्‍टं हत्‍वा गर्भमचेतनं अंगप्रत्‍यंगसंपूर्णे गर्भे चेतःसमान्विते। द्विगुणं गोव्रतं कुर्यादेषा गोघ्‍नस्‍य निष्‍कृतिः इति।
‘‘बृहत्‍प्रचेताः’’ एकवर्षे हते वत्‍से कृच्छ्रपादोविधीयते। अबुद्धिपूर्वे पुंसः स्‍याद्विपादस्‍तु द्विहायने।
त्रिहायने त्रिपादःस्‍या त्‍प्राजापत्‍यमतः परमिति एतच्च प्रायश्चित्तमल्‍पत्‍वादबुद्धिपूर्वकाधमसंबंधिगोवधविषयं

गाईच्या गर्भाच्या वधाविषयीं.

गाईच्या गर्भाच्या वधाचें प्रायश्चित्त एक दाने इ० वर्षाचें वासरूं मारलें असतां प्रायश्चित्त.

‘‘षट्‌त्रिंशन्मतांत विशेष सांगितला आहे तो असा’’----केवळ गर्भ उत्‍पन्न झाला असतां चतुर्थांश, तो दृढतेला पावला असतां दोन चतुर्थांश व अचेतन (ज्‍याला चेतना उत्‍पन्न झाली नाही) अशा गर्भास मारले असतां तीन चतुर्थांश व्रत सांगितलें. अंगे व प्रत्‍यंगें यांनी युक्त असून चेतनेनें युक्त असणार्‍या अशा गर्भाचा गाई सकट वध केला असतां दुप्पट गाईचें प्रायश्चित्त करावे. ही गाईचा वध करणार्‍यास शुद्धि सांगितली ‘‘बृहत्‍प्रचेतस्‌’’---मनुष्‍यानें अज्ञानानें एक वर्षाचें वासरूं मारलें असतां कृच्छ्राचा चतुर्थांश एवढें प्रायश्चित्त करावे. दोन वर्षाचें मारलें असतां दोन चतुर्थांश, तीन वर्षांचे मारलें असतां तीन चतुर्थांश, यानंतर पुढें प्राजापत्‍य सांगितलें. हें प्रायश्चित्त थोडें असल्‍यानें अज्ञानानें नीचाच्या गाईचा वध केला असतां त्‍याविषयीं जाणावें.


Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP