मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ५९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘हारीतः चांडालवधसंप्राप्तिर्ब्राम्‍हणस्‍य भवेद्यदि। कारयेद्वादशकृच्छ्रं तप्तकृच्छ्रं ततो भवेदिति।
‘‘अंगिराः’’ सर्वांत्‍यजानां गमने भोजने च प्रमापणे। पराकेण विशुद्धिः स्‍यादित्‍यांगिरसभाषितमिति एतदशज्ञानतोवधे।
‘‘ज्ञानतस्‍तु चांद्रायणमिति विज्ञानेश्र्वरः’’ विपरीतमितिमाधवः’’। ‘‘तदाह लौंगाक्षिः’’ हनने प्रतिलोमानां शूद्रजानां कथं भवेत्‌।
ज्ञानपूर्वे पराकः स्‍यादज्ञानादैंदवं तथेपि। चांद्रायणं द्विविधमष्‍टधेनुकं त्रिधेनुकं च। पराकेऽपि पंचधेनुकस्त्रिधेनुकश्र्चेति द्विविधः।
तत्र ज्ञाने महतोश्र्चांद्रायणपराकयोर्निवेशः अज्ञानतस्‍तु अल्‍पयोरिति ग्रंथयोरविरोधः।
‘‘यत्तु मास इत्‍यनुवृत्तौ ब्रम्‍हगर्भः’’ अंतरप्रभ वाणां तु सूतादीनां चतुर्द्विषडिति तत्‍कामतोऽभ्‍यासविषयं तत्र सूतस्‍य वधाभ्‍यासे षण्मासाः कैदेहकस्‍य चत्‍वारः चांडालस्‍य द्वौ मागधस्‍य चत्‍वारः क्षत्तुरायोगवस्‍य च द्वाविति।
‘‘श्र्वपाकचंडालयोश्र्चोरयोर्वधे तु देवलः’’ चोरः श्र्वपाकश्र्चंडालोविप्रेणाभिहतोयदि। अहोरात्रोषितोभूत्‍वा घृतं प्राश्य विशुध्यतीति।

ब्राह्मणानें चांडाळ वगैरे नीच जातीचा वध केला तर प्रायश्चित्त.

‘‘हारीत’’---ब्राह्मणाकडून जर चांडाळाचा वध घडला तर त्‍याचे कडून बारा कृच्छ्रें करवावी, त्‍या पासून तप्तकृच्छ्र होईल. ‘‘अंगिरस्‌’’---सर्व अंत्‍यजांशी गमन केले असतां, त्‍यांच्या अन्नाचें भोजन केलें असतां व त्‍यांचा वध केला असतां पराकाच्या योगानें शुद्धि होईल असें अंगिरसाचें म्‍हणणें आहे. ‘‘हें अज्ञानानें वध घडला असतां त्‍याविषयी जाणावे. बुद्धिपूर्वक वध केला असतां चांद्रायण असें विज्ञानेश्र्वर म्‍हणतो. माधव याच्या उलट म्‍हणतो. ‘‘लौगाक्षि तेंच (माधवा प्रमाणें) सांगतो’’---जर शूद्रापासून झालेल्‍या प्रतिलोमांचा (चांडाळ इत्‍यादिकांचा) बुद्धिपूर्वक वध केला असतां ‘‘पराक’’ आणि बुद्धिपूर्वक वध न केला तर ‘‘चांद्रायण’’ प्रायश्चित्त होय. चांद्रायण दोन प्रकारचें एक आठ गाईंचें व दुसरें तीन गाईंचें. पराकही एक पांच गाईंचा आणि दुसरा तीन गाईंचा असा दोन प्रकारचा. त्‍यांत बुद्धिपूर्वक वधाविषयी मोठें चांद्रायण व मोठा पराक यांचा समावेश करावा. अज्ञानपूर्वक वधांविषयी लहान चांद्रायण व लहान पराक यांचा समावेश करावा. याप्रमाणें (व्यवस्‍था केली असतां) दोन्ही ग्रंथांचा विरोध येत नाही. ‘‘जे तर मास यास अनुसरून ब्रह्मगर्भ’’---शूद्रापासून ब्राह्मणी वगैरेंच्या ठिकाणीं उत्‍पन्न झालेल्‍या सूतादिकांचा वध केला असतां चार, दोन व सहा मास पर्यंत प्रायश्चित्त असावे.’’ असें म्‍हणतो तें बुद्धिपूर्वक अभ्‍यासाविषयी जाणावे. त्‍यांत सूताच्या वधाच्या अभ्‍यासाविषयी सहा महिने, वैदेहकास चार, चांडाळास दोन, मागधास चार, क्षता व अयोगव यांस दोन महिने जाणावे. ‘‘महार व चांडाळ हे चोर असतां त्‍यांच्या वधाविषयी देवल’’---जर ब्राह्मणानें चोरी करणारा महार व चांडाळ यांचा वध केला तर, त्‍यानें एक दिवस उपास करून तूप प्यावें म्‍हणजे तो शुद्ध होईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP