मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २० वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २० वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

तत्रानेकनिमित्तेषु प्राजापत्त्यादीनां सजातीयानां प्रायश्चित्तानां देशकालकर्त्रैक्‍ये तंत्रं।
तत्रैवेकस्‍मिन्निमित्ते प्राजापत्‍यद्वयमेकत्रैकमिति विशेषग्रहणे द्वयमेव कार्यं।
तेनैवैकप्राजापत्‍यकार्यमपि सिध्यतीति प्रसंगसिद्धिः।
यथाह ‘‘गौतमः’’ द्वे परदारे त्रीणि श्रोत्रियस्‍येति सामान्यतः परदारमात्रागमने श्रोत्रियपत्‍नीगमने च श्रोत्रियपत्‍नीगमननिनिमित्तकं त्रैवार्षिकमेव केवलं कार्यं तेनैव द्वैवार्षिकासिद्धिः।
‘‘शंखलिखितौ’’ गुप्तायां वैश्यायामवकीर्णः संवत्‍सरं त्रिषवणमनुतिष्‍ठेत क्षत्रियायां द्वे वर्षे ब्राह्मण्यां त्रीणिवर्षाणीति।
अत्र तिसृष्‍वप्यवकीर्णेषु ब्राह्मणीनिमित्तकं त्रैवार्षिक मेव कार्यथ्‍मति।
निमित्तानां व्याप्यव्यापकभावेऽपि व्याप्यनिमित्तेन व्यापकानिमित्तस्‍य प्रसंगतः सिद्धिः ‘‘यथा’’ अवगूर्य चरेत्‍कृच्छ्रमतिकृच्छ्रं निपातने।
कुच्छ्रातिकृच्छ्रोऽसृक्‌पाते कृच्छ्रोऽभ्‍यंतरशोणित इति अत्रासृक्‌ पातने सत्‍यवगुरणनिपातयोर्व्यापकयोर्न पृथक्‌त्‍वनिमित्तप्रायश्चित्तप्रयोजकतेति।
ब्रह्महत्‍याप्रायश्चित्ते तु तत्‍प्रकरणे तंत्रावापौ वक्ष्येते

तंत्र व प्रसंग.
अनेक निमित्तां मध्यें एका जातीच्या प्राजापत्‍यादि प्रायश्चित्तांचे देश, काल व कर्ता यांचे ऐक्‍य असतां ‘‘तंत्र’’ होते. एका निमित्तांत दोन प्राजापत्‍यें व एकांत एक (प्राजापत्‍य) असें असतां त्‍यांत मोठ्याचें ग्रहण केले असतां दोनच (प्राजापत्‍य) करावी. त्‍यावरूनच एका प्राजापत्‍याचें कार्यही होते. ही ‘‘प्रसंगसिद्धि’’ होय. ‘‘गौतम’’ असे सांगतो---‘‘दुसर्‍याच्या स्त्रीशीं गमन केले असतां दोन, श्रोत्रि याच्या (वेद शिकलेल्‍याच्या) स्त्रीशीं गमन केलें असतां तीन’’ यावरून साधारणपणें दुसर्‍याच्या स्त्रीशीं गमन झालें व श्रोत्रियाच्या स्त्रीशी गमन झालें तर श्रोत्रियाच्या स्त्रीशी गमन घडलें त्‍याबद्दल केवळ तीन वर्षांचेच (प्रायश्चित्त) करावे, म्‍हणजे त्‍याच्या योगानेंच दोन वर्षांच्या प्रायश्चित्ताची सिद्धि होते. ‘‘शंख व लिखित’’ ‘‘रक्षण केलेल्‍या वैश्याच्या स्त्रीशी गमन केलें असतां एक वर्षे पर्यंत त्रिकाळ (प्रातःकाळ, मध्यान्ह व संध्याकाळ या तीन काळांत) स्‍नान करावे. क्षत्रियाच्या स्त्रीशीं गमन केले असतां दोन वर्षे व ब्राह्मणाच्या स्त्रीच्या उद्देशानें सांगितलेले तीन वर्षांचेच प्रायश्चित्त करावे. निमित्तांचा व्याप्य व्यापकभाव असतांही व्याप्यानिमित्तानें व्यापक निमित्ताची प्रसंगानें सिद्धि होते. जसे-‘‘ब्राह्मणास मारण्याच्या उद्देशानें काठी वगैरे उगारिली असतां कृच्छ्र, काठी इत्‍यादि मारलीं असतां अतिकृच्छ्र, मारून रक्त निघालें असतां कृच्छ्रातिकृच्छ्र आणि मारल्‍यापासून रक्ताळल्‍या प्रमाणें झालें असतां कृच्छ्र करावा.’’ या ठिकाणीं रक्त निघालें असतां व्यापक अशा अवगुरण (काठी वगैरे उगारणें) व निपात (काठी इत्‍यादि मारणें) यांस निरनिराळ्या निमित्ताच्या प्रायश्चित्ताची प्रयोजकता नाही. ब्रह्महत्त्येच्या प्रायश्चित्तांत त्‍या प्रकरणांत तंत्र व अवाप हे सांगण्यात येतील.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP