मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ४१ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४१ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ प्राजापत्‍यादिप्रत्‍याम्‍नायाः

१. तत्र तावाच्चांद्रायणद्वादशाब्‍दादिव्रतविषयेष्‍वपि पापेषु प्राजापत्‍यकल्‍पनामाहतु ‘‘र्यमोशनसौ’’ यत्रोक्तं यत्रवानोक्तमिह पातकनाशनं।
मिह पातकनाशनं। प्राजापत्‍येन कृच्छ्रेण शोधयेन्नात्र संशयः। प्राजापत्‍यश्र्च व्रतांतरानुरोधेनावृतोनावृतो वा।
प्राजापत्‍यप्रन्याम्‍नाया ‘‘श्र्चतुर्विंशतिमते’’ कृच्छ्रे देव्ययुतं चैव प्राणायामशद्वयम्‌। तिलहोमसहस्रं तु वेदपारायणं तथा।
विप्रा द्वादश वा भोज्‍याः पावकेष्‍टि स्‍तथैव च। अन्या वा पावमानेष्‍टिः समान्याहुर्मनीषिणः।
‘‘अपरार्के’’ समिद्‌घृतहविर्धान्यतिलान्वा मरुताशनः। हुत्‍वा द्वादशसाहस्रं गायत्र्या कृच्छ्रामाप्नुयादिति।
द्वादशभिरधिकं सहस्रं द्वादशसहस्त्रं ‘‘याज्ञवक्‍ल्‍योऽपि’’ यत्र यत्र च संकीर्णमात्‍मानं मन्यते जनः।
तत्र तत्र तिलैर्होमो गायत्र्या वाचनं तथा। संकीर्ण पापयुक्तं। वाचनं दानं तिलैरित्‍यत्रापि संबध्यते तिलदानमित्‍यर्थः।
वेदपारायणं संहितापारायणं अयुतगायत्रीभिरल्‍पांतरितत्‍वात्‌ संहिताध्ययनं यावत्तं कालं सावित्रीं जपेदिति ‘‘अपरार्के प्रचेतः स्‍मृतेश्र्च’’। ‘‘पराशरः’’ कृच्छ्रोयुतु तु गायत्र्या उदवास स्‍तथैव च।
धेनुप्रदानं विप्राय सममेतच्चतुष्‍टयमिति उदवासोऽहोरात्रीमिति ‘‘महार्णवे मार्कंडेयः’’ प्राजापत्‍यक्रियाशक्तौ धेनुं दद्यात्‍पयस्‍विनीं। धेनोरभावे दातव्यं मूल्‍यं तुल्‍यं न संशय इति ‘‘संवर्तः’’ गवामभावे दातव्यं तुल्‍यं मूल्‍यं न संशय इति।

२. मूल्‍यमुक्तं ‘‘माधर्वाये ब्रह्मपुराणे’’ गवामभावे निष्‍कंस्‍यात्तर्धंपाद एव वा।
रूप्यपरिमाणे निष्‍कपरिभाषामाह ‘‘याज्ञवल्‍क्‍य.’’ निष्‍कं सुवर्णाश्र्चत्‍वार इति सुवर्णचतुष्‍टयसमतोलितं रूप्यं निष्‍क प्रित्‍यर्थः ‘‘लीलावत्‍यां’’ वराटकानां दशकद्वयं यत्‍साकाकिणी ताश्र्चपणश्र्चतस्त्रः। ते षोडशद्वम्‍म इहावगम्‍यो द्रम्‍मैस्‍तथा षोडभिश्र्च निष्‍कइति मूलांतरमपि ‘‘ प्रायश्र्चित्तविवेके षट्‌त्रिंशन्मते’’ धेनुः पंचभिराप्यानां मध्यानां त्रिपुराणिका। कार्षापणैकमूल्‍या हि पवित्राणां प्रकीर्तिता।
दरिद्राणामिति क्वचित्‍पाठः। पुराणं द्वात्रिंशत्‍कृष्‍णलमितं रजतं। द्वे कृष्‍णले समधृते विज्ञेयो रूप्यमाषकः।
ते षोडश स्‍याद्धरणं पुराणश्र्चैव राजतमिति मिताक्षरायां स्‍मृतेः कार्षापणस्‍तु ‘कार्षापणस्‍तु विज्ञेयः कार्षिक स्‍ताम्रिकः पण इति मनूक्तः नारदोक्तोपि ‘कार्षापणो दक्षिणयां दिशि रौप्यः प्रवर्तते। पणैर्निबद्धः पूर्वस्‍यां षोडशैव पणाः स तु।
‘‘मूल्‍याध्याये कात्‍यायनः’’ द्वात्रिंशत्‍पणिका गावश्र्चतुष्‍कर्षापणोवरः। वृषे षट्‌ कार्षापणका अष्‍टावनडुहि स्‍मृताः।
दश कर्षापणा धेनोरश्र्वे पंचदशैव त्‍विति एतेषां च गोमूल्‍यपक्षाणां शक्ताशक्तभेदेन व्यवस्‍था।

३. यत्तु ‘‘अपरार्के’’ द्वादशैव सहस्राणि जपेद्देवीमुपोषितः। जलांते विधिवन्मौनी प्राजापत्‍योयमुच्यते इति जलांते जलसमीपे।
तथा तत्रैव चतुर्विंशतिममुक्तं ‘अतिकृच्छ्रेपराके च प्राजापत्‍यत्रयं कुर्यात्‍कृच्छ्रे गोमिथुनमिति अत्र द्वादशसहस्रो गायत्रीजपो गोमिथुनं च गौतमाद्युक्तं प्राजापत्‍यविषयं शक्तविषयं वा ‘‘तत्रैव’’ अन्नदानहिरण्येन द्वादश ब्राम्‍हणान्‌ शुचीन्‌। तर्पयेन्मारुताशी च श्रोत्रियान्‌ कृच्छ्र उच्यते। उपोष्‍य श्रद्धयायुक्त स्‍तिलपात्राणि धर्मतः। द्वादश ब्रह्मवादिभ्‍यः प्राजापत्‍येन तत्‍समं। स्‍वयमाहृत्‍य योमूर्न्धा तृणभारानुपोषितः। दद्याद्रोमंडले कृच्छ्रे द्वादशैव न संशयः। प्राणायामशतं कृत्‍वा द्वात्रिंशोत्तरमार्तिषु। अहोरात्रोषित स्‍तिष्‍ठेत्‍प्राङ्‌मुखे कृच्छ्र उच्यते। नमस्‍कारसहस्त्राणि द्वादशैव दृढव्रतः। गोविप्रपितृ देवेषु कुर्यात्‍कृच्छ्रत्रयं भवेत्‌।
तिलपात्राण्युक्तानि ‘‘कौर्म’’ तिलपात्रं त्रिधा प्रोक्तं कनिष्‍ठोत्तममध्यमे। ताम्रपात्रं दशपलं जघन्यं परिकीर्तिनं।
द्विगुणं मध्यमं प्रोक्तं त्रिगुणं चोत्तमं स्‍मृतं।

४. ‘‘वसिष्‍ठः’’ चेत्‍वरते कर्तुं दिवसं मरुताशनः। रात्रौ स्‍थित्‍वाजले विष्‍ठः प्राजापत्‍येन तत्‍समं। गोमूत्रेण समायुक्तं यावकं वोपयोजयेत्‌। कृच्छ्रमेकाहिकं प्रोक्तं दृष्‍टमंगिरसा स्‍वयं। निश्यासीनो दिवा तिष्‍ठोत्‍त्रिरात्रं मरुताशनः।
प्राजापत्‍यं विजानीयात्‍कूष्‍मांडैर्जुहुयात्‌ घृतमिति ‘‘पराशरः’’ कृच्छ्रो देव्ययुतं चैव  प्राणायामशतद्वयं। पुण्यतीर्थेनार्द्रशिरःस्‍नानं द्वादशसंख्यया। ‘‘माधवीये स्‍मृत्‍यंत्तरे’’ प्राजापत्‍यं चरन्विप्रो यद्यशक्तः कथंचन। अहानि पंच विप्राग्रयान्‌ भोजयेत्‍सम्‍यगीप्सितान्‌ अत्र कपिंजलविधकरणन्यायेन पंचस्‍वप्यहस्‍सु त्रयस्त्रयो विप्राः। ‘‘कण्वः’’ एकमध्ययनं कुर्यात्‍प्राजापत्‍यमथापिवा।
दद्या द्वादशसाहस्रं गवां मुष्‍टिं विचक्षणः। एकमध्ययनं सकृत्‍संहिताध्ययनं। तथा षडुपवासैरपि प्राजापत्‍य इति ‘‘निबंधकृतः’’। ‘‘चतुर्विंशतिमते’’ प्राजापत्‍ये तु गोमकां दद्यात्‍सांतपनेद्वयं। पराकतप्तातिकृच्छ्रे तिस्रस्‍तिस्र स्‍तु गास्‍तथेति। सांतपनमत्र महत्‌।
इतरत्र सार्धप्राजापत्‍योक्तेः। तथाच ‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ पराकतप्तातिकृच्छ्रस्‍थाने कृच्छ्रत्रयं चरेत्‌। सांतपनस्‍य चार्धार्धमशक्तौ व्रतमाचरेदिति। ‘‘स्‍मृत्‍यर्थसारेतु’’ पराके पंच। तप्तकृच्छ्रे षडिति। ‘‘अपरार्के मार्कंडेयः’’ प्राजापत्‍यसमा धेनुस्‍तद्वयं तप्तकृच्छ्रके।
पराके तु सुवर्णं स्‍याद्धेमशृंगी तथैव चेति। पराके तु सुवर्णं धेनुद्वयमूल्‍यसमं।
हेमशृंगीग्रहणेन यकलकांस्‍यदोहाद्युपस्‍कारवतीं धेनुं लक्ष्यति। ‘‘कर्मविपाकसारे गोरनुवृत्तौ’’।
एकां कृच्छ्रेतिकृच्छ्रे द्वे तिस्रश्र्चांद्रायणे स्‍मृता इति ‘‘मदनरत्‍ने स्‍मृतौ’’ प्राजापत्‍ये तु गामेकामतिकृच्छ्रे द्वयं स्‍मृतं।
चांद्रायणे पराके च तिस्रोगा दक्षिणास्‍तथेति ‘‘बृहद्विष्‍णुः’’ चांद्रायणमकुर्वाणाः कुर्युः कृच्छ्रचतुष्‍टयं एतद्यतिचांद्रायणविषयं ‘‘स एव’’ चांद्रायणपराकाभ्‍यां निष्‍कृति योन शक्‌नुयात्‌। सकरोत्‍यात्‍मशुध्यर्थं प्राजापत्‍यस्‍य पंचकमिति इदमृषिचांद्रायणपरं।
पिपीलिकायरमध्ययो रष्‍टधेनूक्तेः। शिशुचांद्रायणादौ च धेनुत्रयोक्तेः। यत्तु चत्तुर्विंशतिमते।
अष्‍टौ चांद्रायणे देयाः प्रत्‍याम्‍नायाविधौ सदेति तत्‍पिपीलिकायवमध्यविषयमिति धनिनः।
‘‘धर्माविवृत्तौ’’ चतुर्विंशतिमते च’’ चांद्रायणं मृगारेष्‍टिः पवित्रेष्‍टि स्‍तथैव च। मित्रविंदा पशुश्र्चैव कृच्छ्रत्रयमथापिवा।
तिलहोमायुतं चैव पराकद्वमेव च। गायत्र्या लक्षमेकं तु समान्याहुर्मनीषिणः। नित्‍यनैमित्तिकानां च काम्‍यानां चैव कर्मणां।
इष्‍टीनां पशुवंधानामभावे चरवः स्‍मृता इति।

५. कृच्छ्रातिकृच्छ्रे तु धेनुत्रयं। अत्र विप्रदंडोद्यमे कृच्छ्रस्‍त्‍वातिकृच्छ्रो निपातने।
कृच्छ्रातिकृच्छ्रोऽसृक्‌पाते कृच्छ्रोऽभ्‍यंतरशोणित इत्‍यतिकृच्छ्रे धेनुद्वयोक्तेस्‍तद्विषयनिपातनादधिकेऽसृक्‌पति विहितस्‍य कृच्छ्रातिकृच्छ्रस्‍यातिकृच्छ्रादाधिक्‍यावगमात्‌ धेनुत्रयं प्रत्‍यम्‍नायोगम्‍यते।
यदात्‍वतिकृच्छ्रे तिस्रस्‍तदा तु कृच्छ्रातिकृच्छ्रे ततोऽधिके चतस्रः।
तथा चोत्तरोत्तराधिक्‍येनाह ‘‘हारीतः’’ अनाश्रमी संवत्‍सरं प्राजापत्‍यं चरित्‍वाश्रममुपेयात्‌। द्वितीयेऽतिकृच्छ्रं तृतीये कृच्छ्रमत ऊर्ध्वं चांद्रायणमिति। ‘‘चतुर्विंशतिमते’’ कृच्छ्रे पंचातिकृच्छ्रे त्रिगुणमहरहस्त्रिंशदेवं तृतीये चत्‍वारिंशच्च तप्ते त्रिगुणनगुणिता विंशतिः स्‍यात्‍पराके। कृच्छ्रे सांतातनाख्येभवति षडधिका विंशतिः सैव हीना द्वाभ्‍यां चांद्रायणे स्‍यात्तपसि कृशतनु भोजये द्विप्रमुख्यान्‌ अत्र संख्यान्वितमहरहः पदं भोजनान्वयि। तेन कृच्छ्रे प्रत्‍यहं पंचातिकृच्छ्रे प्रत्‍यहं पंचदश एवमुत्तरत्रेति केचित्‌।
युक्तं तु संख्यावीप्सयोः परस्‍परानन्वितयोरेव क्रियान्वयः तेनकृच्छ्रे पंचसु दिनेष्‍वेकैको भोज्‍यः।
अतिकृच्छ्रे नवस्‍वेकैकस्त्रिषु द्वौद्वाविति पंचदशैव। तृतीये कृच्छ्रातिकृच्छ्रे त्रिंशत्‌ द्वादशदिने विभज्‍य भोज्‍याः।
सांतपने चांद्रायणे च विंशतौ त्रैगुण्यमन्वेति। सौम्‍यकृच्छ्रे एका धेनुः। ब्रह्मकूर्चे द्वे। पराके तिस्रः।
मासोपवासे सार्धसप्तेति ‘‘निबंधकृतः’’। ‘‘शूलपाणिस्‍तु’’ पराके पंच। चांद्रायणे सार्धसप्त। शिशु चांद्रायणे तप्तकृच्छ्रे च पादोनचतुष्‍टयं। कृच्छ्रातिकृच्छ्रे सांपतने च षट्‌। मासोपवासे पंचदशेत्‍यूचे।


प्राजापत्‍यादिकांचे प्रतिनिधि.

प्राजापत्‍याचा उपयोग, गायत्रीजप वगैरे प्राजापत्‍याचे प्रतिनिधि.

त्‍यांत पूर्वी चांद्रायण, द्वादशाद्व वगैरे व्रतांस विषयीभूत अशाही पातकांत प्राजापत्‍याची कल्‍पना ‘यम व उशनस्‌’ सांगतात- जेथें पातकाचा नाश करणारें (कृच्छ्रादि व्रत) सांगितले असेल किंवा नसेल तेथे प्राजापत्‍यकृच्छ्राच्या योगानें शुद्धि होईल यांत संशय नाही. ‘प्राजापत्‍य दुसर्‍या व्रताच्या अनुरोधानें युक्त किंवा अयुक्त असतो.’ ‘‘प्राजापत्‍याचे प्रतिनिधि चतुर्विंशतिमतांत’’ ‘‘कृच्छ्रांत गायत्रीचा दहा हजार जप, दोनशे प्राणायाम, तिळांचा हजार होम, वेदांचें (संहितेचे) परायण, बारा ब्राह्मणांस भोजन, पावकेष्‍टि, किंवा पावमानेष्‍टि’’ ही ज्ञात्‍यांनी समान सांगितली आहेत. ‘‘अपरार्कांत’’ जो वायुभक्षण करून (कांही न खातां) गायत्रीमंत्रानें समिधा, तूप, हवि, धान्य किंवा तीळ यांचा एक हजार बारा इतका होम करील त्‍याला कृच्छ्राची प्राप्ति होईल (कृच्छ्राचें फह मिळेल). ‘‘याज्ञवक्‍ल्‍य’’ ही---कोणत्‍याही मनुष्‍याला ज्‍या ज्‍या वेळी मला पातक घडलें असें वाटेल त्‍या त्‍या वेळी त्‍यानें गायत्रीमंत्राने तिळांचा होम करावा व तिळांचें दान करावे. दहा हजार गायत्रीचें त्‍याच्याशी (पारायणाशी) अंतर थोडें असतें आणि ‘‘अपरार्कांत’’ ‘‘संहितेच्या अध्ययनाला जितका काळ लागेल तों पावेंतों गायत्रीचा जप करावा’’  अशी ‘‘प्रचेतसाची’’ स्‍मृति आहे म्‍हणून ‘‘वेदपारायण’’ म्‍हणजे संहितेचें पारायण असा अर्थ घ्‍यावा. ‘‘पराशर’’---कृच्छ्र, गायत्रीचा दहा हजार जप, उदकांत वास व ब्राह्मणास गाईचें दान हीं चार समान आहेत. उदकांत वास करणें तो अहोरात्र करावा असें ‘‘महार्णवांत’’ आहे. ‘‘मार्कंडेय’’---प्राजापत्‍यव्रताचें कर्म करण्यास शक्ति नसल्‍यास दुभती गाय द्यावी. गाय न मिळाल्‍यास गाईचे किंमती एवढें द्रव्य द्यावें ‘‘संवर्त’’---गाई न मिळाल्‍यास त्‍यांच्या किंमती एवढें द्रव्य द्यावें यांत संशय नाही.

गाईची किंमत निष्‍क वगैरे त्‍यांची मानें, बैल वगैरेंची किंमत.

२ किंमत ‘‘माधवीयांत’’ ‘‘ब्रह्मपुराणांतून’’ सांगितली आहे ती अशी---गाईच्या ऐवजी निष्‍क, अर्धानिष्‍क किंवा निष्‍काचा चतुर्थांश द्यावा. ‘‘याज्ञवक्‍ल्‍य’’ रुप्याच्या परिमाणाविषयीं (नाण्या विषयीं) निष्‍काची परिभाषा सांगतो---चार सुवर्णा एवढ्या (वजनाच्या) रुप्याच्या नाण्याला ‘‘निष्‍क’’ असें म्‍हणतात. ‘‘लीलावतींत’’ वीस कवड्यांची एक काकिणी, चार काकिणींचा एक पण (पैसा), सोळा पणांचा एक द्रम्‍मांचा एक कर्ष होतो. दुसरीही किंमत ‘‘प्रायश्र्चित्तविवेकांत’’ ‘‘षट्‌त्रिंशन्मतांतील’’ धनिकांस पांच पुराणांची एक गाय, मध्यमांस तीन पुराणांची व ज्‍यांचे आचरण शुद्ध आहे त्‍यांस एक कार्षापणाची गाय सांगितली आहे. दरिद्य्रांस एक कार्षापणाची गाय सांगितली असाही क्‍वचित पुस्‍तकांत पाठ आहे. बत्तीस गुंजां एवढ्या रुप्याचें एक पुराण होते. कारण, दोन गुंजांचा एक रुप्याचा मासा, सोळा माशांचें एक धरण व (तेंच) रुप्याचें पुराण होते’’ अशी ‘‘मिताक्षरेंत स्‍मृति’’ आहे. ‘कार्षापण’’ म्‍हणजे-कर्ष वजना एवढा तांब्‍याचा पण (पैसा) हा ‘‘कार्षापण’’ जाणावा, असें ‘‘मनूने’’ सांगितलें आहे. ‘‘ नारदानें’’ ही सांगितलेला (कार्षापण असा)---दक्षिण दिशेकडे रुप्याचा कार्षापण चालू आहे. पूर्वेकडे सोळापणांचा (पैशांचा) चालू आहे. मूल्‍याच्या (किंमतीच्या) अध्यायांत ‘‘कात्‍यायन’’---गाईचे बत्तीस पण व चार कार्षापणाचा वत्‍स होय. बैलाविषयीं सहा काषार्पण व आंडिल बैलाविषयी आठ कार्षापण सांगितलें आहेत. गाईचे दहा कार्षापण व घोड्याचें पंधरा कार्षापण होत. या गाईच्या मूल्‍याच्या (किंमतीच्या) भेदांची व्यवस्‍था शक्त व अशक्त यांच्या भेदावरून करावी.

प्राजापत्‍य व कृच्छ्र यांचें गायत्रीजप वगैरे दुसरे प्रतिनिधि.

३. जें तर ‘‘अपरार्कांत’’ उपोषित राहून कोणाशी भाषण न करतां विधीप्रमाणें पाण्याजवळ बाराहजार गायत्रींचा जप करणें हा ‘‘प्राजापत्‍य’’ सांगितला आहे. तसें ‘‘त्‍यांतच’’ ‘‘चतुर्विंशतिमत’’ सांगितलें तें असें---अतिकृच्छ्र व पराक यांत तीन प्राजापत्‍य करावे. कृच्छ्रांत दोन गाई द्याव्या इत्‍यादि. येथें बारा हजार गायत्रीचा जप व दोन गाईंचें दान हें ‘‘गौतमादिकांनी’’ सांगितलेल्‍या प्राजापत्‍याविषयीं किंवा शक्ताविषयीं समजावे. ‘‘त्‍यांतच’’ कांही न खातां पवित्र वेदाध्ययन करणार्‍या अशा बारा ब्राह्मणांस अन्नाचें दान व सोनें यांच्या योगानें तृप्त केले असतां ‘‘कृच्छ्र’’ होतो, असें सांगितलें आहे. उपोषण करून श्रद्धेनें युक्त होत्‍साता विधीप्रमाणें बारा ब्रह्मवेत्त्यांस तिळपात्रें दिलीं असतां तें प्राजापत्‍याप्रमाणें होते. उपोषण करून स्‍वतः आपल्‍या डोकीवरून बारा गवताचे भारे आणून ते गाईंच्या समुदयास घातले असतां एक कृच्छ्र होतो. अशक्तांविषयी दोनशे बत्तीस प्राणायाम केले असतां ‘‘कृच्छ्र’’ सांगितला आहे. एक दिवस उपोषण करून पूर्वेकडे तोंड करून उभें राहिलें असतां ‘‘कृच्छ्र’’ सांगितला आहे. गाई, ब्राह्मण, पितर व देव यांस बाराहजार नमस्‍कार केले असतां तीन कृच्छ्र होतात. ‘‘तिळांची पात्रें कूर्मपुराणांत सांगितली आहेत. ती अशी---कनिष्‍ठ, उत्तम व मध्यम याप्रमाणें तिळाच्या पात्राचे तीन प्रकार सांगितले आहेत. दहा पळें वजनाच्या तांब्‍याचें पात्र कनिष्‍ठ, दुप्पट (वीस पळांचें) मध्यम आणि तिप्पट (तीस पळांचें) उत्तम सांगितलें आहे.

प्राजापत्‍य, पराक, तप्त, अतिकृच्छ्र व सांतपन यांचे प्रतिनिधि.

४. ‘‘वसिष्‍ठ’’---जर प्राजापत्‍य करण्याची त्‍वरा असेल तर दिवसां केवळ वायूचें भक्षण करून (कांहीं न खातां) रात्रीं पाण्यांत उभें राहिलें असतां तें प्राजापत्‍यासारखें होतें अथवा गोमूचानें युक्त अशा अर्धवट शिजलेल्‍या जवांचें भक्षण केलें असतां हें एका दिवसांत होणारें कृच्छ्र सांगितलें आहे. हें स्‍वतां ‘‘आंगिरसानें’’ पाहिले आहे. तीन रात्रि पावेंतों कांहीं न खातां (उपोषण करून) रात्री बसावें, दिवसां उभे रहावें आणि ‘‘कूष्‍मांडमंत्रांनीं’’ तुपाचा होम करावा हें ‘‘प्राजापत्‍य’’ जाणावें. ‘‘पराशर’’---दहा हजार गायत्रीचा जप, दोनशे प्राणायाम, व पवित्र अशा तीर्थांत डोकें भिजेल अशी बारा स्‍नानें करणें हा ‘कृच्छ्र’’ होय. ‘‘माधवीयांत दुसर्‍या स्‍मृतींतील’’---जर ब्राह्मण करून प्राजापत्‍य करण्यास समर्थं नसेल तर त्‍यानें पांच दिवसपर्यंत श्रेष्‍ठ अशा ब्राह्मणांस भोजन घालावें येथें ‘‘कपिंजलाधिकरणन्यायानें’’ पाचही दिवसपर्यंत दररोज तीन तीन ब्राह्मणांस भोजन घालावे. ‘‘कण्व’’---ज्ञात्‍यानें एक वेळां संहितेचें पारायण करावें, किंवा प्राजापत्‍य, करावें, किंवा गाईंस एक हजार बारा मुठी (एवढें) धान्य घालावें. ‘‘तसेंच’’ सहा उपवासांनीही प्राजापत्‍य’’ होतो असें ‘‘निबंधकार’’ म्‍हणतात. ‘‘चतुर्विंशतिमतांत’’ प्राजापत्‍यांत एक गाय द्यावी. सांतपनांत दोन द्याव्या. पराक, तप्तकृच्छ्र व अतिकृच्छ्र यांत प्रत्‍येकी तीन तीन गाई द्याव्या. येथे सांतपन मोठें समजावें, कारण, इतर ठिकाणीं दीड प्राजापत्‍याची उक्ति आहे. ‘‘तसेंच’’ ‘‘षट्‌त्रिंशन्मतांत’’ सामर्थ्य नसल्‍यास पराक, तप्तकृच्छ्र व अतिकृच्छ्र यांच्या ठिकाणीं तीन कृच्छ्रें करावी. सांतपनाचें ठिकाणीं अर्धे अर्धें व्रत करावे. ‘‘स्‍मृत्‍यर्थसारांत’’ तर पराकांत पांच व तप्तकृच्छ्रांत सहा कृच्छ्रे करावी. ‘‘अपरार्कांत’’ मार्कंडेय’’---प्राजापत्‍यांत एक गाय, तप्तकृच्छ्रांत दोन गाई द्याव्या. पराकांत दोन गाईंच्या किंमती एवढें सोने द्यावे. तसेंच काशाचें दुध काढावयाचें भांडें वगैरे सर्व सामानांनीं युक्त अशी हेमश्रृंगी (सोन्याच्या शिंगाची गाय) द्यावी. ‘‘कर्मविपाकसारांत’’ कृच्छ्रांत एक, अतिकृच्छ्रांत दोन व चांद्रायणांत तीन गाई द्याव्या असें सांगितलें आहे. ‘‘मदनरत्‍नांत स्‍मृतींतील’’---प्राजापत्‍यांत एक गाय, अतिकृच्छ्रांत दोन गाई, चांद्रायण व पराक यांत तीन गाई दक्षिणा सांगितली आहे. ‘‘बृहद्विष्‍णु’’ चांद्रायण न करणारांनीं चार कृच्छ्रें करावी’’ असें सांगतो. हें ‘‘यति चांद्रायणा विषयी’’ जाणावे. ‘‘तोच’’---जो चांद्रायण व पराक यांच्या योगानें निष्‍कृति करूं शकणार नाही, त्‍यानें आपल्‍या देहाची शृद्धि होण्याकरितां पांच प्राजापत्‍य करावे.’८ हें ‘‘ॠषिचांद्रायणा विषयीं’’ जाणावे. कारण, पिपीलिकामध्य व यवतमध्य यांत आठ गाई द्याव्या असें वचन आहे, व शिशुचांद्रायणादिकांत तीन द्याव्या असें वचन आहे. जें तर ‘‘चतुर्विंशतिमतांत’’ चांद्रायणांत प्रत्‍याम्‍नायविधीत निरंतर आठ गाई द्याव्या’’ असें वचन आहे, तें धनवानास ‘‘पिपीलिकामध्य व यवमध्य यांविषयी आहे असें जाणावे. ‘‘धर्मविवृतींत व चतुर्विंशतिमतांत’’ चांद्रायण, मृगारेष्‍टि, पवित्रेष्‍टि, मित्रविंदापशु, तीन कृच्छ्रे, दहा हजार तिळांचा होम, दोन पराक व गायत्रीचा लक्ष जप ही ज्ञात्‍यांनीं समान सांगितली आहेत. नित्‍य व नैमित्तिक अशीं काम्‍य कर्में, इष्‍ट्या व पशुबंध यांच्या अभावी चरु सांगितले आहेत.

कृच्छ्रातिकृच्छ्र, पराक, चांद्रायण इत्‍यादिकांत दुसरें प्रतिनिधि.

५. कृच्छ्रातिकृच्छ्रांत तीन गाई ‘‘ब्राह्मणास मारण्याकरितां काठी उगारली असतां कृच्छ्र, काठी मारली असतां अतिकृच्छ्र, मारून रक्त निघालें असतां कृच्छ्रातिकृच्छ्र व मारून रक्ताळल्‍या प्रमाणें झालें तर कृच्छ्र प्रायश्र्चित्त’’. येथें अतिकृच्छ्रांत दोन गाई द्याव्या असें म्‍हटलें त्‍यावरून त्‍याचा (अतिकृच्छ्रांचा) ज्‍यांत संबंध आहे अशा निपातना पासून (काठी मारल्‍या पासून) अधिक रक्त निघालें असतां त्‍याविषयी सांगण्यांत आलेलें ‘‘कृच्छ्रातिकृच्छ्र’’ हें अतिकृच्छ्रापेक्षां मोठें आहे असें ज्ञान होतें, त्‍यावरून त्‍याचा तीन गाई प्रत्‍याम्‍नाय असावा असें वाटतें. जेव्हां अतिकृच्छ्रांत तीन (गाई) तेव्हां त्‍या पेक्षां अधिक अशा कृच्छ्रातिकृच्छ्रांत चार गाई. ‘‘तसेंच हारीत एकापेक्षां एक चढता क्रमानें सांगतो---एक वर्षपर्यंत आश्रमावाचून राहिल्‍यानें प्राजापत्‍य करून आश्रम घ्‍यावा. दुसर्‍या वर्षांत अतिकृच्छ्र, तिसर्‍या वर्षांत कृच्छ्र आणि त्‍या पुढें चांद्रायण प्रायश्र्चित्त करावे. ‘‘चतुर्विंशतिमतांत’’ ‘‘तपांत (व्रतांत) ज्‍याचा देह क्षीण झाला आहे अशा मनुष्‍यानें कृच्छ्रांत पांच, अतिकृच्छ्रांत पंधरा, कृच्छ्रातिकृच्छ्रांत तीस, तप्तकृच्छ्रांत चाळीस, पराकांत साठ, सांतपन नांवाच्या कृच्छ्रांत सहासट, व चांद्रायणांत चौसट याप्रमाणें श्रेष्‍ठ ब्राह्मणांस भोजन घालावे.’’ या वाक्‍यांत पांच, पंधरा इत्‍यादि संख्यांनी युक्त अशा ‘‘ अहरहः’’ पदाचा भोजनाशी अन्वय होतो. त्‍यावरून कृच्छ्रांत प्रत्‍येक दिवशी पांच अतिकृच्छ्रांत प्रत्‍येक दिवशी पंधरा याप्रमाणें पुढें (जाणावें) असें कित्‍येक म्‍हणतात. वास्‍तविक तर संख्या (पांच इत्‍यादि) व वीप्सा (अहरहः) या दोघांचा परस्‍परांशीं अन्वय नसून क्रियापदाशी अन्वय होतो, त्‍यावरून कृच्छ्रांत पांच दिवस पर्यंत दररोज एक एक ब्राह्मण जेऊं घालावा. अतिकृच्छ्रांत नऊ दिवसपर्यंत रोज एक एक पुढें तीन दिवस पर्यंत दोन दोन मिळून पंधरा. कृच्छ्रातिकृच्छ्रांत तीस ब्राह्मण बारा दिवसांत विभाग करून जेऊं घालावे. याप्रमाणें पुढें समजावे. सौम्‍यकृच्छ्रांत एक गाय, ब्रह्मकूर्चांत दोन, पराकांत तीन, एक महिना पावेंतों ज्‍यांत उपास करण्यांत येतात अशा व्रतांत साडेसात गाई द्याव्या असें ‘‘निबंधकार’’ म्‍हणतात. ‘‘शूलपाणि’’ तर-पराकांत पांच, चंद्रायणांत साडेसात, शिशुचांद्रायण व तप्तकृच्छ्र यांत पावणेचार, कृच्छ्रातिकृच्छ्र व सांतपन यांत सहा व मासोपवासांत पंधरा गाई द्यावा असें म्‍हणतो.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP