मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १४९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘मनुः’’ धान्यान्नधनचौर्याणि कृत्‍वा कामाद्विजोत्तमः। सजातीयगृहादेव कृच्छ्राद्बेन विशुध्यतीति।
‘‘स्‍मृत्‍यंतरे’’ अष्‍टापद्यं स्‍तेयकिल्‍बिषं शूद्रस्‍य द्विगुणोत्तराणीतरेषामिति किल्‍बिषं दंडः सशूद्रस्‍परियमाणद्रव्यादष्‍टगुणः विट्‌क्षत्रविप्राणां तु षोडशद्वात्रिंशच्चतुः पष्‍टिगुण इत्‍यर्थः। ‘‘अत एव मनुः’’ अष्‍टापद्यं हि शूद्रस्‍य स्‍तेये भवति किल्‍बिषं।
षोडशैव तु वैश्यस्‍य द्वात्रिंशत्‌ क्षत्रियस्‍य तु। ब्राह्मणस्‍य चतुःषष्‍टिः पूर्णं वापि शतं भवेत्‌।
‘‘शंखः’’ तथा धनस्‍यापहरणे मणीनां रजतस्‍य च।
धान्यापहरणे चैव कुर्यात्‍संवत्‍सरं व्रतमिति इदं च शतकुंभधान्ये तन्मूल्‍ये च धनादावपहृते ज्ञेयं ‘‘धान्यं दशभ्‍यः कुंभेभ्‍योहरतोभ्‍यधिके वध इति मनूक्तेः’’। ‘‘कुंभमाह कात्‍यायनः’’ दशद्रोणा भवेत्‍खारी कुंभोऽपि द्रोणविंशतिरिति द्रोणस्‍तु पलं च कुडवः प्रस्‍थ आढकोद्रोण एव च। धान्यमानेषु विज्ञेयाः क्रमशोऽमी चतुर्गणा इत्‍येवं क्रमाज्‍ज्ञेयाः।

द्विजानें आपल्‍या जातीच्या मनुष्‍याच्या घरांतून धान्यादि चोरलें तर प्रायश्चित्त. शूद्र वगैरेंनीं चोरी केली तर त्‍यांस क्रमानें आठपट इत्‍यादि दंड. कुंभाचें प्रमाण.

‘‘मनु’’---जर श्रेष्‍ठ द्विज आपल्‍या जातीच्या मनुष्‍याच्या घरांतून धान्य, अन्न व द्रव्य यांची चोरी बुद्धिपूर्वक करील तो कृच्छ्रांद्बानें शुद्ध होईल. ‘‘दुसर्‍या स्‍मृतींत’’ जर शूद्र द्रव्य चोरील तर त्‍याला त्‍या द्रव्याच्या आठपटी एवढा दंड, वैश्यास सोळापट, क्षत्रियास बत्तीसपट व ब्राह्मणास चौसष्‍टपट जाणावा. ‘‘म्‍हणूनच मनु’’---शूद्रास चोरी विषयीं आठपट, वैश्यास सोळापट, क्षत्रियास बत्तीसपट व ब्राह्मणास चौसष्‍टपट किंवा पूर्ण शंभरपट दंड असावा. ‘‘शंख’’---द्रव्य, मणि, रूपें व धान्य यांची चोरी केली तर एक वर्षपर्यंत व्रत करावें. हें (प्रायश्चित्त) शंभर कुंभ धान्य व त्‍याच्या किमतीएवढें द्रव्यादि हीं चोरलीं असतां जाणावें. कारण ‘‘दहा कुंभांपेक्षां अधिक चोरी करणाराचा वध (करावा)’’ असें मनूचें वचन आहे. ‘‘कात्‍यायन कुंभ सांगतो’’---दहा द्रोणांची एक खारी व वीस द्रोणांचा एक कुंभ होतो. द्रोण तर पळ, कुडव, प्रस्‍थ, आढक व द्रोण हे क्रमानें धान्याच्या परिमाणांविषयी चौपट अशा क्रमानें जाणावा. जसें-पळापेक्षां चौपट कुडव, कुडवापेक्षां चौपट प्रस्‍थ इत्‍यादि.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP