मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त २२ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २२ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ पापिनामनुतापार्थं कर्मविपाक उच्यते.
‘‘यमः’’ पतितैः पतितैः संप्रयुक्तश्र्च कृतघ्‍नो गुरुतल्‍पगः। एते पतंति सर्वेषु नरकेष्‍वनुपूर्वशः।
महापातकसंयुक्ता युगं तिष्‍ठंत्‍यधो मुखाः। रौरवे कूटसाक्षी च यश्र्च मिथ्‍याभिशंसकः। कुलग्राहे पक्षवादी सचाप्यत्र पतेन्नरः।
कुलग्राहे कुलसंदेहे ‘‘स एव’’ न्यासापहर्ता कुमतिर्विषमो यश्र्च वृत्तिषु। तप्तकुंभे स्‍वसृगामी गोघ्रो राजभटाश्र्च ये।
राजभटा राजबलेनोपद्रवकारकाः। महाज्‍वाले दुहितरं स्‍नुषांगत्‍वा च मातरं। अजाविकः शौकरिकस्‍तेनश्र्च क्रोधनोनरः।
रंगोपजीवी पशुहा शुकनी ग्रामयाजकः। अभक्ष्यभक्ष्योरातांशी विप्रोऽधर्मपुरस्‍कृतः। अगम्‍यगामी गरदो नरकं शबलं व्रजेत्‌।
शकुनी पक्षिपोषकः। ‘‘वांताश्युक्तोहेमाद्रौ विष्‍णुना’’ देशं गोत्रं कुलं विद्यामन्नार्थं योनिवेदयेत्‌। वैवस्‍वतेषु धर्मेषु वांताशी स प्रकीर्तितः।
सर्वज्ञावयमित्‍येवमभिमानरता नराः। वांताशिनः परित्‍याज्‍याः श्राद्धे दाने च लंपटाः। वेदविक्रयिणो ये च केशविक्रयिणस्‍तथा।
वेदानां दूषका येच समयानां च दूषकाः। दूषका धर्मशास्त्राणां हेतुवादकुतूहलाः। एते विहंगमे घोरे पच्यंते पापकारिणः।
समयानां दूषकाः संभूय व्यवस्‍थापितार्थव्यतिक्रमकारिणः। सर्वविक्रय कर्तारो मित्राणां भेदकारकाः।
निर्मर्यादाःक्रोधनाश्र्च कदर्यैश्र्वर्यसंयुताः। कोटरे विनिपात्‍यंते बंधुभक्षाश्र्च वाणिजाः। बंधुभक्षाः बंधुपीडकाः॥
विमुखे पतिते घोरे मर्यादां यश्र्च लंघते। शाखामृघ्रो गोघ्‍नश्र्च कृमिभक्ष्यं व्रजंति ते। विमुखः युद्धादिषु पराङ्मुखः।
पतिते युद्ध एवेतिशेषः। एकाकी मिष्‍टमश्र्नाति वंचयित्‍वा सुहृत्‍सुतान्‌। दारान्‌ भृत्‍यातिथींश्र्चैव तथा संबंधिबांधवान्‌।
उत्‍सृष्‍टपितृदेवेष्‍टः पशुघाती च योवृथा। लालके नरके घोरे दुर्गंधे पात्‍यते नरः। मानकर्मा कुलालश्र्च स्‍वर्णकारश्चिकित्‍सकः।
पतंति नरके घोरे कूटकर्ता विशेषतः। देवब्राह्मणविद्वेष्‍टा गुरुं यश्चावमन्यते। अर्वाक्‌शिरः प्रपद्यंते रत्‍नं दूषयते च यः।
मांसं मद्यं सुरां लाक्षां गंधान्‌ वस्त्रं घृतं पयः। विक्रीणाति य एतानि स तु पूयवहं व्रजेत्‌। अगारारामदाहीच दुःखपापकृदेव च।
पतंति रुधिरार्धे तु कृतघ्‍ना दांभिका नराः। शूद्रहत्त्यां यः कुर्यातथा यो गुरूदूषकः। सीधुकृन्मधुकृद्दंडी कर्मकारो निराकृतिः।
दंडी निषिद्धदंडग्राही। कर्मकारः कर्मकाराधिष्‍टाता। निराकृतिरस्‍वाध्यायः। अतितीक्ष्णश्र्चंडवृत्तिरुपघातपरः शठः।
श्येनजीवी कालहिकः पुत्रोपाध्याय एव च। द्यूतसंव्यहारी च प्राणिहिंसारताश्र्चये। वैतरिण्यां निपात्‍यंतेये नरा बंधुघातकाः।
अतितीक्ष्णः अत्‍युग्रः। चंडवृत्तिः वधबंधादिवृत्तिः। उपघातपरः परोपहतिप्रवणः। शठो मायावी। कालहिकः कलही।
पुत्रोपाध्यायः पुत्र उपाध्याया यस्‍य स तथा। असत्‍प्रतिगृहीतारस्‍तथैवायाज्‍ययाजकाः। नक्षत्रैर्जीवते यश्र्च सोंऽधकारं प्रपद्यते।
अप्राप्तमकोयश्र्च ब्राह्मणो वृषलीपतिः। गोऽश्र्वोष्‍ट्रहस्‍तिदमको मित्रध्रुक्‌ सूचकस्‍तथा। असिपत्रवने घोरे पतंत्‍यौरभ्रिका नराः। अप्राप्तदमकोयोग्‍यदमकः। गोश्र्वोष्‍ट्रहस्‍तिदमकः सा वृत्ति र्यस्‍य स तथोक्तः। औरभ्रिका मेषाजीविनः।
वृथा प्रव्रजितोयश्र्च सेतुभेत्ता च सूचकः।आश्रमात्‍पतितो यश्र्च सोऽग्रिज्‍वालं प्रपद्यते। कृत्‍याकरा निकृत्‍यंते नरा अनृतावादिनः।
राजा च श्रुतिलोपी च संदंशं नरकं व्रजेत्‌। मृगव्याधस्‍तमोघोरं क्रुरकर्मा च वार्धुषिः। भक्ष्यंते शामशबलै स्‍तीक्ष्णतुंडैश्र्च वायसैः।
ब्रह्मविक्रयिणो येच ब्रह्म वा क्रियते च यैः। क्रयविक्रयकर्ता च वार्धुषिः सोमविक्रयी। गुरूंश्र्चयेऽवमन्यंते वाक्‍करै स्‍तर्जयंति च।
विकर्माणः पापरताः शौचाचारविर्जिताः। अगोप्तारः कूटद्रव्याः परस्‍वानां च नाशकाः। कन्यानां दूषकाश्र्चैव समयानां च दूषकाः।
क्रोधनाः पापलोलाश्र्च लुब्‍धा ये कृष्‍णगामिनः। स्‍कंदंते च दिवास्‍वप्ने व्रतिनो ब्रह्मचारिणः। सर्वे ते नरके घोरे पात्‍यंते पापकारिणः। अगोप्तारोऽवशारक्षणीयानामितिशेषः कुलद्रव्याः छलेनार्जितधनाः। कृष्‍णगामिनः शूद्रारतास्त्रैवर्णिकाः।
‘‘मनुः’’ बहून्वर्षगणान्घोरान्नरकान्प्राप्य तत्‍क्षणात्‌। संसारान्प्रतिपद्यंते महापातकिनस्‍त्‍विह।
‘‘यज्ञवल्‍क्‍यः’’ मृगाश्र्वसूकरोष्‍ट्राणां ब्रह्महा योनिमृच्छति। खरपुल्‍कसवेनानां सुरापोनात्र संशयः। पुल्‍क सवेनौ चंडालविशेषौ। कृमिकीटपतंगत्‍वं स्‍वर्णहारी समाप्नुयात्‌। तृणगुल्‍मलतात्‍वं च क्रमशो गुरुतल्‍पमगः।
‘‘स एव’’ ब्रह्महा क्षयरोगी स्‍यात्‍सुरापः श्यावदंतकः। हेमहारी तु कुनखी दुश्र्चर्मा गुरुतल्‍पगः। योयेन संवसत्‍येषां स तल्‍लिंगोऽभिजायते। फलविशेषा ग्रंथांतरोऽवसेयाः

पाप्यांस पश्चात्ताप होण्यासाठीं कर्मविपाक सांगण्यांत येतो.
पतितांशीं संसर्ग करणें, कृतघ्‍नता, वडिलाच्या स्त्रीशी गमन करणें इत्‍यादि कर्में केली असतां नरक इत्‍यादिकांची प्राप्ति होते.
‘‘यम’’---पतितांशी संसर्ग करणारा, कृतघ्‍न व बापाच्या स्त्रीशी गमन करणारा हे सगळ्या नरकांत अनुक्रमानें पडतात. खोटी साक्ष देणारा, एखाद्यावर खोटा आरोप करणारा, व ज्‍याच्या कुळाचा संशय आहे त्‍याचा पक्ष धरणारा हेही नरकांत पडतील. ‘‘तोच’’ -दुसर्‍यानें ठेवलेल्‍या ठेवीचा अपहार करणारा, वाईट बुद्धीचा, उलट्या वर्तणुकीचा, बहिणीशी गमन करणारा, गाईचा वध करणारा व राजाच्या बळावर दुसर्‍यांस उपद्रव करणारे हे ‘तप्तकुंभांत’ पडतात. मुलगी, सून व आई यांशीं गमन करणारा मोठ्या जाळांत पडतो. मेंढ्या व बकरी पाळून त्‍यांवर आपला निर्वाह करणारा, डुकरांवर आपला निर्वाह करणारा, चोर, रागीट मनुष्‍य, रंगारी, पशूंस मारणारा (कसाई), पक्षी बाळगून त्‍यांवर निर्वाह करणारा, सगळ्या गांवचा उपाध्या, खाण्यास अयोग्‍य अशा पदार्थांचे भक्षण करणारा, वांताशी, अधर्मांत पुढारी असा ब्राह्मण, गमन करण्यास अयोग्‍य अशा स्त्रीशी गमन करणारा व विष देणारा हे ‘‘शबल’’ नांवाच्या नरकास जातात. ‘‘हेमाद्रीत विष्‍णूनें वांताशी सांगितला तो असा’’---जो अन्नासाठी आपला देश, गोत्र, कुळ व विद्या ही सांगतो त्‍यास ‘‘मनूने’’ सांगितलेल्‍या धर्मात ‘‘वांताशी’’ असें म्‍हटलें आहे. आम्‍ही सर्वज्ञ आहों याप्रमाणें अभिमान करणारे व लोचट हे वांताशी होत. यांना श्राद्ध व दान यांत सांगूं नये. वेदाचा विक्रय करणारे, केंसांचा विक्रय करणारे, वेदांची निंदा करणारे, एकत्र जमून ठरलेली व्यवस्‍था हाणून पाडणारे, धर्मशास्त्राची निंदा करणारे व विनाकारण वादाची हौस बाळगणारे हे पातकी ‘‘विहंगम’’ नांवाच्या भयंकर नरकांत पडतात. सर्व प्रकारच्या वस्‍तूंचा विक्रय करणारे, मित्रांची फाटाफूट करणारे, अमर्यादेनें रागीट, कृपणतेनें वागणारे, भाऊबंदांस पीडा करणारे, व वणिक्‌ कर्म करणारे हे कोठीत (कोठारांत) पडतात. जो भयंकर युद्धांतून माघारा फिरणारा किंवा पळून जाणारा, मर्यादा सोडून वागणारा, वानरांस व गाईस मारणारा हे किड्यांच्या भक्ष्यस्‍थानी पडतात. आपले मित्र, मुलगे, बायको, नोकर, पाहुणे व भाऊबंद यांस टाकून आपण एकटाच गोड (पदार्थ) खाणारा, पितर, देव व इष्‍ट यांस टाकणारा, निष्‍कारण जनावरास मारणारा असा मनुष्‍य घाणेरड्या भयंकर अशा लाळेच्या नरकांत पडतो. तोलणारा, कुंभार, सोनार, वैद्य व खोटें नाटें तरकट करणारा हे विशेषें करून भयंकर नरकांत पडतात. देव व ब्राह्मण यांचा द्वेष करणारा, गुरूचा अपमान करणारा व रत्‍नास दूषण देणारा हे ज्‍यांत उलटी डोकी होतात अशा नरकात जातात.

मांस, दारु वगैरे पदार्थ विकल्‍यानें पुयवह इत्‍यादि नरकांची प्राप्ति होते
मांस, मद्य, सुरा, लाख, सुगंधी सामान, वस्त्र, तूप व दूध ही जो विकतो तो पूयवह (ज्‍यांत पू असतो) अशा नरकास जातो. घर व बाग जाळणारा, दुःख देणारा, कृतघ्‍न, व दांभिक (ढोंगी) हे ज्‍यांत अर्धे रक्त आहे अशा नरकांत पडतात. शूद्राची हत्‍या करणारा, गुरूची निंदा करणारा, मधु करणारा, निषिद्ध दंड (काठी) घेणारा, कर्म करणारांचा उपरी, अध्ययन न करणारा, अति तिखट स्‍वभावाचा, मारणें बांधणें इत्‍यादि वृत्ति करणारा, दुसर्‍याच्या नुकसानी विषयी तत्‍पर असणारा, लुच्चा, बाज पक्ष्यावर आपले उपजीवन करणारा, तंटेखोर, ज्‍याचा मुलगा उपाध्याय आहे (आपले मुलास उपाधिक देणारा) तो, द्यूतावर उपजीविका करणारे, प्राण्यांची हिंसा करण्याविषयी तत्‍पर असणारे व आपल्‍या आप्तांचा नाश करणारे हे वैतरणीत पडतात. वाईट दान घेणारे, यज्ञादि कर्मे करविण्यांस अयोग्‍य अशांकडून यज्ञादि करविणारे व  नक्षत्रांवर उपजीवन करणारे हे अंधकारास जातात. योग्‍यांस दंड करणारा, शूद्र स्त्रीचा पति असा ब्राह्मण, गाई, बैल, घोडे, उंट व हत्ती यांस शिकवून त्‍यांवर उपजीवन करणारा, मित्राचा द्रोह करणारा, लुच्चा व मेंढ्यांवर आपला उदरनिर्वाह करणारे हे भयंकर असिपत्रवनांत (तरवारीच्या पात्‍यांच्या रानांत) पडतात. खोटा संन्याशी, पूल मोडणारा, लुच्चा व आश्रमा पासून भ्रष्‍ट झालेला हे विस्‍तवाच्या जाळांत पडतात. जादु करणारे, वा खोटें बोलणारे लोक हे कापले जातात. वेदाचा लोप करणारा राजा संदंश नांवाच्या नरकाला जातो. हरणाची शिकार करणारा भयंकर अंधारांत पडतो. क्रूर कर्म करणारा व व्याजावर उपजीवन करणारा यांस ज्‍यांच्या चोंची तीक्ष्ण आहेत असे शामशबल नांवाचे कावळे खातात. ब्रह्माचा विक्रय करणारे किंवा विकत घेणारे, क्रय विक्रय करणारे, व्याजावर उदरनिर्वाह करणारे, सोम विकणारे, वडिलांचा अपमान करणारे आणि त्‍यांस वाणी वा हात यांनी धिक्‍कारणारे, कर्म न करणारे, पापकर्म करणारे, शौच व आचार यांनी रहित असणारे, रक्षण करण्यास योग्‍य अशांचे रक्षण न करणारे, कपटानें द्रव्य मिळविणारे, दुसर्‍यांच्या द्रव्यांचा नाश करणारे, कन्यांस दूषित करणारे, क्रोधी, पापकर्माविषयी तत्‍पर असणारे, लोभी, शूद्र स्त्रीशी गमन करणारे तीन वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य), दिवसां व रात्रीं ज्‍यांचे रेतस्‍खलन झालें असे व्रत करणारे व ब्रह्मचारी हे सर्व पातकी भयंकर अशा नरकांत पडतात.

महापातक्‍यांस प्रथम नरकाची प्राप्ति होऊन नंतर हरण वगैरेंच्या योनींची प्राप्ति होते.
‘‘मनु’’ ज्‍यांनी मोठी पातकें केली आहेत ते त्‍याच वेळी पुष्‍कळ वर्षें पर्यंत नरकांत राहून नंतर संसारांस (भवचक्राच्या फेर्‍यांस) प्राप्त होतात. ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’---ब्रह्महत्‍या करणारा हरिण, घोडा, डुक्‍कर व ऊंट यांच्या योनीस जातो. दारू पिणारा गधडें, पुल्‍कस व वेने यांच्या योनीस जातो. सोन्याची चोरी करणारा, किडा व मुंगी व पतंग यांच्या योनीस जातो. गुरूच्या स्त्रीशी गमन करणारा क्रमानें घास, झुडूप व वेल यांच्या योनीस जातो. ‘‘तोच’’---ब्रह्महत्‍या करणारा क्षयरोगी होतो. दारू पिणार्‍याचे काळे दात होतात. सोनें चोरणाराची नखें वाईट होतात. गुरूच्या स्त्रीशी गमन करणाराचें शरीरावरील चमडे वाईट होते. जो ब्रह्महत्‍या वगैरे करणार्‍या पतितांशी संसर्ग करील तो त्‍या त्‍या चिन्हानें युक्त होईल. जसे ब्रह्महत्‍या करणाराशी संसर्ग करणारास क्षयरोग होईल. फळांचे विशेष दुसर्‍या ग्रंथांतवरून जाणावे.
अथ पापिनामनुतापार्थं कर्मविपाक उच्यते.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP