मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १४६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘यत्तु सुमंतुः’’ सुवर्णस्‍तेयी मासं सावित्र्याष्‍टसहस्रमाज्‍याहुतीर्जुहुयात्‌ प्रत्‍यहं त्रिरात्रमुपवासस्‍तप्तकृच्छ्रेण च पूतो भवतीति।
‘‘यच्चापस्‍तंबः’’ स्‍तेयं कृत्‍वा सुरां पीत्‍वा संवत्‍सरं चरेदिति तत्‍सुवर्णद्वादशभागापहारविषयं।
‘‘यत्तु सुमंतुः’’ सुवर्णस्‍तेयी द्वादशरात्रं वायुभक्षः पूतो भवतीति तन्मानसापहारविषयमिति प्रांचः निष्‍फलकायिकप्रवृत्तिविषयत्‍वं तु सम्‍यक्‌। मिताक्षरायां इदं मनसि पापं ध्यात्‍वा प्रणवपूर्वा व्याहृतीर्मनसा जपेत्‌। व्याहृत्‍या प्राणायामं त्रिरात्रं चरेत्‌ प्रवृत्तौ कृच्छ्रं द्वादशरात्रं चरेदिति व्याहृत्‍याभिलप्यं। ‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ यवमात्रे सुवर्णस्‍य प्रायश्चित्तं दिनद्वयं। सुवर्णकृष्‍णलं ह्येकमपहृत्‍य द्विजोत्तमः। कुर्यात्‍सांतपनं कृच्छ्रं तत्‍पापस्‍यापनुत्तये। अपहृत्‍य सुवर्णस्‍य प्रायश्चित्तं दिनद्वयं सुवर्णकृष्‍णलं ह्येकमपहृत्‍य द्विजोत्तमः।
कुर्यात्‍सांतपनं कृच्छ्रं तत्‍पापस्‍यापनुत्तये। अपहृत्‍य सुवर्णस्‍य माषमात्रंद्विजाधमः। गोमूत्रयावकाहारस्त्रिभि र्मासै र्व्यपोहति।
सुवर्णस्‍यापहरणे वत्‍सरं यावकी भवेत्‌। ऊर्ध्वं प्राणांतिकं ज्ञेयमथवा ब्रह्महाव्रतं वत्‍सरमिति सुवर्णपरिमाणद्वादशांशमाषाधिकहेमविषयं प्राणांतिकं तु ज्ञानपूर्वकापहारविषयं। ‘‘अज्ञानतस्‍तु द्वादशाद्बं विप्रस्‍य तु भवेदतः। विप्रे तु सकलं ज्ञेयं पादोनं क्षत्रिये स्‍मृतं।
वैश्येर्धं पादशेषस्‍तु शूद्रजातिषु शस्‍यत इति विष्‍णूक्तेः।
क्षत्रियादेः पादपादहानिरिति तदयुक्तं द्विविधं स्‍तेयं बलावष्‍टभेन क्रियमाणं साहसाख्यमेकमपरं च चौर्यं तत्राद्ये पादोनादि बाधके न चतुर्विधसाहसविषयेण पर्षद्या ब्राह्मणानामित्‍यंगिरोवचसोक्तस्‍य द्वैगुणस्‍यैव न्याय्यत्‍वात्‌।
द्वितीयेपि विप्रस्‍वामिकसुवर्णस्‍य ‘देवब्राह्मणराज्ञां तु विज्ञेयं द्रव्यमुत्तममिति नारदेनोत्तद्रव्यतोक्तेस्‍तत्र च दंडभूयस्‍त्‍वात्तथा ‘‘गोषु ब्राह्मणसंस्‍थास्‍वित्‍येनेन’’ विप्रस्‍वामिकगोवधे दंडगौरवाद्विदुषोतिक्रमे दंडभूयस्‍त्‍वमिति वचनाच्चात्रापि क्षत्रियादीनां प्रायश्चित्ताधिक्‍यमेवोचितं न तु पादन्यूनमिति

कर्षाच्या द्वादशांशा एवढें सोनें चोरलें असतां प्रायश्चित्त. यव, कृष्‍णल इत्‍यादिकां एवढें सोने चोरलें असतां प्रायश्चित्त.

 ‘‘जें तर सुमंतु’’ ‘‘सुवर्णाची चोरी करणारानें एक महिनापर्यंत दररोज गायत्रीमंत्रानें एक हजार आठ आहुति द्याव्या, तीन दिवस उपास करावा व तप्तकृच्छ्र करावें म्‍हणजे तो पवित्र होईल.’’ असें म्‍हणतो, आणि जें ‘‘आपस्‍तंब’’ ‘‘चोरी केली किंवा सुरा (दारू) प्याला तर एक वर्षपर्यंत व्रत करावें’’ असें म्‍हणतो, तें सुवर्णाच्या द्वादशांशा एवढ्या सोन्याच्या चोरीविषयीं जाणावें. ‘‘जें तर सुमंतु’’ सुवर्णाची चोरी करणारानें बारा दिवस पावेंतों वायूचें भक्षण करून रहावें म्‍हणजे तो पवित्र होईल’’ असें म्‍हणतो, तें मानसिक चोरीविषयी जाणावें असें ‘‘प्रांच’’ म्‍हणतात. फळावाचून देहाची जी प्रवृत्ति होणें त्‍याविषयी जाणावें हें उत्तम होय. ‘‘मिताक्षरेंत’’ मनांत हें पाप आणून प्रणवपूर्वक व्याहृतींचा मनांत जप करावा. तीन दिवस पावेतों व्याहृतीच्या योगानें प्राणायाम करावा. प्रवृत्ति झाली तर बारा दिवसांचें कृच्छ्र करावें. ‘‘षट्‌त्रिंशन्मतांत’’ यवा एवढ्या सोन्याच्या चोरीविषयीं दोन दिवस प्रायश्चित्त होय. द्विजश्रेष्‍ठानें सोन्याची एक गुंज चोरली असतां, तिचें पातक दूर होण्याकरितां सांतपनकृच्छ्र करावें. जो अधम द्विज एक माशा एवढें सोनें चोरील, त्‍यानें तीन महिने पर्यंत गोमूत्रांत शिजवलेले जवांचा आहार करावा म्‍हणजे तो त्‍या पापापासून मुक्त होईल. कर्षाच्या द्वादशांशा एवढ्या सोन्याची चोरी केली तर एक वर्ष पर्यंत यवांचा आहार करून रहावे. याचे पुढें प्राणांत (प्राण जाई तों पावेंतों) प्रायश्चित्त जाणावें किंवा ब्रह्महत्त्या करणाराचें व्रत करावें. वत्‍सर (वर्षपर्यंत) हें माशापेक्षां अधिक अशा सुवर्णाच्या परिमाणाच्या द्वादशांशा एवढ्या सोन्याविषयीं आहे. ‘‘प्राणांतिक’’ हें बुद्धिपूर्वक चोरीविषयीं जाणावें. कारण ‘‘ब्राह्मणास अज्ञानपूर्वक चोरीविषयीं द्वादशाद्ब (बारा वर्षें) प्रायश्चित्त असावें. ब्राह्मणास सर्व (प्रायश्चित्त), क्षत्रियास तीन चतुर्थांश, वैश्यास अर्धें व शूद्रास एक चतुर्थांश (प्रायश्चित्त) प्रशस्‍त आहे’’ असें विष्‍णूचें म्‍हणणें आहे. क्षत्रियादिकांस चतुर्थांश कमी असें जें सांगितलें तें अयोग्‍य आहे. कारण चौर्य दोन प्रकारचें आहे. पहिलें बलात्‍कारानें करण्यांत येणारें साहस या नावाचें, व दुसरें चौर्य. त्‍यांत पहिल्‍यांत पादोनादिकाचा बाध आल्‍यानें चार प्रकारच्या साहसाचा विषय आल्‍यामुळें ‘‘पर्षद्या ब्राह्मणांना’’ या अंगिरसाच्या वचनानें सांगितलेल्‍या द्वैगुण्यास (दुपटीस) च न्याय्यत्‍व येते. त्‍यावरून आणि दुसर्‍यांतही ब्राह्मणाची ज्‍यावर मालकी आहे अशा सोन्यास ‘‘देव, ब्राह्मण व राजा यांचें द्रव्य उत्तम जाणावें.’’ याप्रमाणें नारदानें उत्तम द्रव्यांत गणावें असें सांगितमलें म्‍हणून त्‍यांत विशेष दंड आहे. त्‍यावरून आणि तसेंच ‘‘गोषु ब्राह्मणसंस्‍थासु’’ या वचनावरून ब्राह्मणाच्या गाईच्या वधाविषयी दंड गौरव (दंडाचा अधिकपणा) येतें म्‍हणून आणि ‘‘विदुषोऽतिक्रमे दंडभूयस्‍त्‍वं’’ या वचनावरून याविषयींही क्षत्रियादिकांस अधिक प्रायश्चित्त असणें हेंच उचित होय पादन्यून उचित नव्हे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP