मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १३० वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३० वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘प्रपादिजलपाने लघुहारीतः’’ प्रपाजलं सीरघटस्‍य चैव द्रोणीजलं कोशविनिर्गतं च।
पीत्‍वावगाहेत सवासा उपोषितः शुद्धिमवाप्नुते च सीरघटः क्षीरवृक्षनिर्यासाधारपात्रं।
द्रौणी नौकाजललिस्‍सारणपात्रं कोशविनिर्गतं कूपादेश्र्चर्मपुटक निस्‍सारितं। एतत्‍कामतः सकृत्‌।
‘‘आपदितु न दोष इत्‍याह स एव’’ द्रोण्यामायसयुक्तायां छन्ने प्रावर्तके तथा।
ग्रामप्रपाजलं चैव पीत्‍वापत्‍सु न दुष्‍यति छन्ने प्रावर्तके मेचकेऽज्ञात इति शूलपाणिः।
‘‘यमः’’ प्रपास्‍वरण्ये घटके च कूपे द्रोणीजलं कोशगतास्‍तथापः।
ॠतेऽपि शूद्रात्तदपेयमाहुरापद्गतो भूमि गतं पिबेच्च आपदि तदेव जलं भूमिष्‍ठं कृत्‍वा पात्रांतरेणोध्दृतं पेयमित्‍यर्थः

पाणपोईचे पाणी, झाडाचा चीक धरण्याचें भांडें त्‍यांतील पाणी वगैरे पाणी प्यालें असतां प्रायश्चित्त.

‘‘पाणपोई वगैरेंच्या उदकाच्या पाना विषयीं लघुहारित’’---पाणपोईचें पाणी झाडाच्या चीक धरण्याचें भांडें त्‍यांतील पाणी, नावेंतील साचलेलें पाणी काढावयाचें भांडें त्‍यांतील पाणी व मोटेनें काढलेलें पाणी हीं जो पिईल त्‍यानें नेसलेल्‍या वस्त्रासह पाण्यानें स्‍नान करून एक दिवस उपास करावा म्‍हणजे तो शुद्ध होईल. हें बुद्धिपूर्वक एक वेळां घडलें असतां त्‍याविषयी जाणावें. ‘‘संकट समयीं तर दोष नाहीं असें तोच म्‍हणतो’’ ---लोखंडानें मढविलेल्‍या द्रोणीतील पाणी, तसेंच छन्न अशा प्रावर्तकांतील पाणी व गांवांतील पाणपोईचें पाणी हीं संकट समयीं दूषित होत नाहींत. ‘‘यम’’---पाणपोईचें पाणी, अरण्यांतल्‍या घड्यांतील व कुव्यांतील पाणी, द्रोणीतलें पाणी व मोटेचें पाणी हीं शूद्रावाचूनही पिण्यास अयोग्‍य आहेत. संकटसमयीं हेंच पाणी भुईवर ओतून तें दुसर्‍या भांड्यानें घेऊन प्यावे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP