मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ८३ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८३ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘अतिधनिकस्‍य तित्तिर्यादौ विशेषमाह मनुः’’ घृतकुंभं वराहं तु तिलद्रोणं तु तित्तिरं। शुकं द्विहायनं वत्‍सं क्रौंच हत्‍वा त्रिहायनं।
‘‘धनिकस्‍य कामतोबलाकादिवधे माधवीये कश्यपः’’ बकबलाकहंससारसकारंडवचक्रवाककुररगृध्रश्येनखंजरीटटिट्टिभोलूकशुकसारिकातित्तिरमयूरमूकामेजनककलविंककपोतपारावतादीनां वधे प्रायश्चित्तमहोरात्रोषितः सर्वबीजानि च दद्यादिति। ‘‘धनिकस्‍याकामतोवधाभ्‍यासे तु याज्ञवल्‍क्‍यः’’ हंसश्येनकपिक्रव्याज्‍जलस्‍थलशिखंडिनः। भासं हत्‍वा तु दद्याद्गामक्रव्यादस्‍तु वत्‍सिकां।
जलशद्बेन बकादयः स्‍थलशद्बेन बलाकादय इति मिताक्षरायाम्‌

पैसेवाल्‍यानें बुद्धिपूर्वक व अज्ञानानें डुकर, तित्तिर वगैरेस मारलें तर प्रायश्चित्त.

‘‘मनु’’ अति धनवानास तित्तिरादिकांविषयी विशेष सांगतो’’---डुकरास मारलें तर तुपाचा घडा द्यावा. तित्तिरास मारलें तर एक द्रोण तीळ, पोपटास मारें तर दोन वर्षांचा वाछडा (पाडा), क्रौंचपक्ष्यास मारलें तर तीन वर्षांचा वाछडा द्यावा. ‘‘धनिकास बुद्धिपूर्वक बगळा इत्‍यादिकाच्या वधाविषयी माधवीयांत कश्यप (प्रायश्चित्त सांगतो)’’---बगळा, बाळढोंक, हंस, सारस, कारंडव, चक्रवाक, कुरर, गिधाड, ससाणा, खंजरीट, टिटवी, घुबड, पोपट, साळुंकी, तित्तिर, मोर, मूका, मेजनक, चिमणी, कपोत व कबुतर इत्‍यादिकांच्या वधाविषयीं एक दिवस उपोषण करून सर्व धान्यें द्यावी, हें प्रायश्चित्त होय. ‘‘धनिकास अबुद्धिपूर्वक वधाच्या अभ्‍यासाविषयीं याज्ञवलक्‍य’’---हंस, ससाणा, वानर, मास खाणारे वाघ वगैरे पशु, जलचर वगैरे पक्षी, स्‍थलचर बाळढोंक वगैरे पक्षी, मोर व भासपक्षी, यांपैकी एखाद्याचा वध केला तर गाय द्यावी. मांस न खाणारे हरिणादि पशु व खंजरीटादि पक्षी यांस मारलें असतां लहान वाछडी द्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP