मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
भीष्माष्टमी

द्वितीय परिच्छेद - भीष्माष्टमी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


माघशुक्लाष्टमीभीष्माष्टमी तदुक्तंहेमाद्रौपाद्मे माघेमासिसिताष्टम्यांसतिलंभीष्मतर्पणम् ‍ श्राद्धंचयेनराः कुर्युस्तेस्युः संततिभागिन इति भारतेपि शुक्लाष्टम्यांतुमाघस्यदद्याद्भीष्माययोजलम् ‍ संवत्सरकृतंपापंतत्क्षणादेवनश्यतीति धवलनिबंधेस्मृतिः अष्टम्यांतुसितेपक्षेभीष्मायतुतिलोदकम् ‍ अन्नंचविधिवद्दद्युः सर्वेवर्णाद्विजातयः सर्ववर्णोक्तेर्द्विजातय इतिसंबोधनम् ‍ तर्पणमंत्रस्तत्रैव भीष्मः शांतनवोवीरः सत्यवादीजितेंद्रियः आभिरद्भिरवाप्नोतिपुत्रपौत्रोचितांक्रियाम् ‍ वैयाघ्रपद्यगोत्रायसांकृत्यप्रवरायच अपुत्रायददाम्येतज्जलंभीष्मायवर्मणे वसूनामवतारायशंतनोरात्मजायच अर्घ्यंददामिभीष्माय आबालब्रह्मचारिणे इति एतज्जीवस्पितृकस्यापिभवति जीवत्पितापिकुर्वीततर्पणंयमभीष्मयोरिति पाद्मोक्तेरितिजीवत्पितृकनिर्णयेपितृचरणैरुक्तम् ‍ एतच्चापसव्येनकार्यमितिदिवोदासीये अत्रश्राद्धंकाम्यंतर्पणंचनित्यम् ‍ ब्राह्मणाद्याश्चयेवर्णादद्युर्भीष्मायनोजलम् ‍ संवत्सरकृतंतेषांपुण्यंनश्यतिसत्तमेतिमदनरत्नेवचनात् ‍ ।

माघ शुक्ल अष्टमी ही भीष्माष्टमी होय . तें सांगतो हेमाद्रींत पद्मपुराणांत - " माघमासांतील शुक्ल अष्टमीस भीष्माच्या उद्देशानें तिलतर्पण व श्राद्ध जे मनुष्य करितील ते संततियुक्त होतील . " भारतांतही - " जो मनुष्य माघ शुक्ल अष्टमीस भीष्माला उदक देईल त्याचें एका वर्षांत केलेलें पाप तत्क्षणीं नष्ट होईल . " धवलनिबंधांत स्मृति - " हे द्विजाति ( ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य ) हो ! शुक्ल पक्षाच्या अष्टमीस सार्‍या वर्णांनीं ( ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र यांनीं ) भीष्माला तिलोदक व अन्न ( श्राद्ध ) यथाविधि द्यावें . " भीष्माला तर्पण करावें म्हणून सांगितलें त्या तर्पणाचा मंत्र तेथेंच सांगतो - " भीष्मः शांतनवो वीरः सत्यवादी जितेंद्रियः ॥ आभिरद्भिरवाप्नोति पुत्रपौत्रोचितां क्रियाम् ‍ ॥ वैयाघ्रपद्यगात्राय सांकृत्यप्रवराय च ॥ अपुत्राय ददाम्येतज्जलं भीष्माय वर्मणे ॥ " ह्या दोन मंत्रांनीं अपसव्यानें तर्पण करुन सव्यानें अर्घ्य द्यावें . अर्घ्यमंत्र - " वसूनामवताराय शंतनोरात्मजाय च ॥ अर्घ्यं ददामि भीष्माय आबालब्रह्मचारिणे ॥ " हें भीष्मतर्पण जीवत्पितृकालाही आहे . कारण , " यमाचें तर्पण व भीष्माचें तर्पण हें जीवत्पितृकानें देखील करावें " असें पद्मपुराणवचन आहे , असें जीवत्पितृकनिर्णयांत आमच्या वडिलांनीं ( रामकृष्णभट्टांनीं ) सांगितलें आहे . हें तर्पण अपसव्यानें करावें , असें दिवोदासीय ग्रंथांत सांगितलें आहे . येथें श्राद्ध सांगितलें तें कामनिक आहे . तर्पण सांगितलें तें नित्य आहे . कारण , " जे ब्राह्मणादिक चारी वर्ण भीष्माला उदक देत नाहींत त्यांचें एका वर्षांत केलेलें पुण्य नष्ट होतें . " ह्या मदनरत्नांतील वचनांत उदक न दिलें तर पुण्यनाश सांगितला आहे .

माघशुक्लद्वादशीभीष्मद्वादशी त्वयाकृतमिदंवीरतवनाम्नाभविष्यति साभीष्मद्वादशीत्येषासर्वपापहराशुभेतिहेमाद्रौपाद्मवचनात् ‍ इयंपूर्वयुता युग्मवाक्यात् ‍ माघीपूर्णिमापरेत्युक्तंप्राक् ‍ तथाहेमाद्रौ ब्राह्मे मघास्थयोश्चजीवेंद्वोर्महामाघीतिकथ्यते तत्रैवज्योतिषे मेषपृष्ठेतथासौरिः सिंहेचगुरुचंद्रमाः भास्करः श्रवणर्क्षेचमहामाघीतिसास्मृता तथाभविष्ये वैशाखीकार्तिकीमाघीतिथयोऽतीवपूजिताः स्नानदानविही नास्ताननेयाः पांडुनंदन तथा तिलपात्राणिदेयानिकंचुकाः कंबलास्तथेति माघपूर्णिमानंतराष्टमीमाघीअष्टका तन्निर्णयः पूर्वेद्युरन्वष्टकानिर्णयश्चपूर्वमुक्तः मलमासेचैतानभवंतीत्येतत्सर्वंमार्गशीर्षप्रकरणेऽभिहितम् ‍ तथाचतसृष्वष्टकास्वशक्तावेपाआवश्यकी हेमंतशिशिरयोश्चतुर्णामपरपक्षाणामष्टमीष्वष्टकाएकस्यांवेत्याश्वलायनोक्तेः तथा माघाष्टकांप्रक्रम्य तामेकाष्टकेत्याचक्षत इत्यापस्तंबवचनाच्चेत्यादिप्रयोगपारिजातेज्ञेयम् ‍ इतिश्रीकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौद्वितीयपरिच्छेदेमाघमासः समाप्तः ।

माघशुक्ल द्वादशी ही भीष्मद्वादशी होय . कारण , ‘ हे वीरा भीष्मा ! हें व्रत तूं केलेंस म्हणून तुझ्या नांवानें प्रसिद्ध होईल . ती ही भीष्मद्वादशी सर्व पाप हरण करणारी कल्याणकारक आहे . " असें हेमाद्रींत पाद्मवचन आहे . ही द्वादशी युग्मवाक्यावरुन पूर्वा करावी . माघी पूर्णिमा परा घ्यावी , असें पूर्वीं सांगितलें आहे . तसेंच हेमाद्रींत ब्राह्मांत - " गुरु व चंद्र हे मघानक्षत्रास असले म्हणजे त्या पौर्णिमेस महामाघी असें म्हटलें आहे . " तेथेंच ज्योतिषांत - " मेषराशीस शनि , सिंहास गुरु व चंद्र , आणि श्रवणनक्षत्रास सूर्य असे असले म्हणजे ती पौर्णिमा महामाघी म्हटली आहे . " तसेंच भविष्यांत - ‘ हे पांडुपुत्रा ! वैशाखी , कार्तिकी आणि माघी ह्या पौर्णिमा अतीव पूज्य आहेत . ह्या तिथींस स्नान व दान केल्यावांचून राहूं नये . " तसेंच - " ह्या माघी पौर्णिमेस तिलपात्रें द्यावीं . आंगरखे द्यावे . धावळ्या द्याव्या . " माघी पूर्णिमेच्या पुढची अष्टमी ही माघी अष्टका , तिचा निर्णय व पूर्वेद्युः श्राद्धाचा आणि अन्वष्टकाश्राद्धाचा निर्णय पूर्वीं मार्गशीर्षांत सांगितला आहे . आणि मलमासांत हीं अष्टकादि श्राद्धें होत नाहींत , हें सारें मार्गशीर्षमासप्रकरणांत सांगितलें आहे . तसेंच मार्गशीर्ष , पौष , माघ , फाल्गुन ह्या चार मासांतील चार अष्टका करण्यास अशक्त असेल त्यानें ही माघी अष्टका अवश्य करावी . कारण , " हेमंतऋतु व शिशिरऋतु यांच्या चार कृष्ण पक्षांतील अष्टमींचे ठायीं चार अष्टका कराव्या . अथवा एका अष्टमीस एक अष्टका करावी . " असें आश्वलायनसूत्र आहे . तसेंच माघी अष्टकेचा उपक्रम करुन " ती एक अष्टका आहे , असें विद्वान सांगतात ’’ असें आपस्तंबवचनही आहे , इत्यादि प्रकार प्रयोगपारिजातांत पाहावा .

इति माघमास समाप्त झाला .

N/A

References : N/A
Last Updated : June 21, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP